Skip to main content

बँकॉक: धावती भेट: २ पारंपरिक थाई घर

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 17/06/2016 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ आता मी चालले होते ती एक 'पारंपरिक थाई घर' पाहायला. एखादी पारंपरिक गोष्ट मुद्दाम जतन करून ठेवावी लागते म्हणजे तिचं अस्तित्व त्या विशिष्ट समाजातून नाहीसं झालं आहे असा एक सरळ निष्कर्ष निघतो – जो नेहमीच खरा असतो असं नाही. ही पारंपारिक गोष्ट (मूल्य असेल, कर्मकांड असेल, उत्सव असेल...) तिची उपयुक्तता नाहीशी झाल्याने नष्ट झाली? की आर्थिक-सामाजिक-राजकीय रेट्यामुळे नष्ट झाली याचा अंदाज घेण्यातही एक वेगळी मजा असते हे मात्र खरं. कोणत्याही ठिकाणच्या पारंपरिक ठिकाणांना भेट देताना माझ्या मनात अनेकदा एक द्वन्द्व असतं.

आल्प्समधील भटकंती

लेखक मिहीर शेठ यांनी शुक्रवार, 17/06/2016 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
दीड वर्षांपूर्वी जर्मनीत आल्यापासूनच आल्प्सच्या पर्वतरांगा मला खुणावत होत्या; मात्र तेथे जाण्याचा योग काही येत नव्हता.

अवघे विश्वचि माझे घर... हे कितपत खरं?

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 17/06/2016 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जन्माला कोणामुळे आणि कोणाच्या पोटी येऊ, कुठल्या वातावरणातल्या घरात वाढू, कोणत्या समाजात राहून लहानाचे मोठे होऊ, कसे निपजू आणि किती जगू या सगळ्यातल्या काही गोष्टी तरी आपल्या हातात नसतात. आपल्या हातात असत्या तर? या कल्पनेला रंगवताना आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्या अवस्थेत आहोत आणि आपली मनस्थिती कशी आहे यानुसार रंगसंगतीत कायम फेरफार होत राहतात.

चिंता!!

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 17/06/2016 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांची डोकी बाकी भारी चालतात! पाऊस लांबल्यानं सारे चिंताग्रस्त आहेत, हे खरंच. आणखी काही दिवस पाऊस पडलाच नाही, समजा उभा हंगामच कोरडा गेला, तर काय होणार या नुसत्या विचारानेही चक्कर येऊ शकते. शरीर शुष्क होऊ शकते, घामही थांबू शकतो... हे खरंय. मग आपापल्या परीने, पाऊस यावा म्हणून काय करता येईल याची उत्तरं शोधायचा प्रयत्न सुरू होतो. काल ट्रेनमधे एक टोळकं गंभीरपणाने याचीच चर्चा करत होतं. एकजण आणखी गंभीरपणाने म्हणाला, 'मला वाटतं, गावोगावी मंडप उभारावेत. सुंदर वातावरण तयार करावेत. मंचावर मंद समया तेवत ठेवाव्यात.

वस्त्रोद्योग-१ : कापसापासून सुतापर्यंत

लेखक प्रदीप साळुंखे यांनी शुक्रवार, 17/06/2016 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपणांस माहित आहेच कि अन्न,वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत. तर धाग्याच्या शिर्षकावरून आपणांस अंदाज आला असेलच कि या तीन मुलभूत गरजांपैकि मी कोणत्या गरजेबाबत लिहणार आहे ते. तर ती महत्वाची गरज म्हणजे "वस्त्र".आदिम काळी मानवप्राणी निर्वस्त्रच फिरायचा,मग कसे कोण जाणे काळानुरूप मेंदू प्रगत होत गेला आणि मानवी मनामध्ये भावनांचा उदय झाला.त्यापैकिच एक भावना म्हणजे "लज्जा". आणि त्यामुळेच शरीराचा काही भाग झाकणे हे गरजेचे होऊन गेले,तसेच ऊन,वारा,पाऊस यापासून शरीराचे रक्षण व्हावे हेही महत्वाचे. पण सद्य स्थितीला आपण "लज्जा" या एका कारणास्तवच कपडे वापरतो असेच म्हणावे लागेल,आणि शरीर

क्लिक! (कथा)

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 17/06/2016 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
तशी गरज नाही. पण आधी हे चॉकलेट खाल्लं तरी चालेल ! ========================================================== हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय? मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्. मग लाल बटन दाबलं क्लिक पक्यानं आणि मी ती सुटकेस खोलायची जाम खटपट केली. मग तशीच घेऊन आलो खोलीवर. जिथं ड्रेनेजचं भोक उघडतं तिथंच आमची खोली. गढूळ पाण्याचे झरे वाहतात चोहीकडे. अर्थात गटारे. दाराला कडी घालून आत बसलो. मांडीवर ब्याग घेतली. पकडीनं लॉक उचकाटलं. पण हे मटरेलंच वेगळं. तोडताबी येईना.

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.

लेखक मोदक यांनी गुरुवार, 16/06/2016 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
मनरावने लेहवारी केली तेंव्हा भरपूर इनो घेतले होतेच. कांही गोष्टी ती लेखमाला वाचतानाच ठरवल्या गेल्या. एक म्हणजे बुलेट घेणे, दुसरी म्हणजे त्यावरून भरपूर भटकणे आणि एकदा लेहला जाणे. तर पहिल्या दोन गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडल्या. लेहला जायचे जायचे असे विचार सतत सुरू होतेच, वरवरची माहिती काढणे, मार्ग कसा असेल त्याचा अंदाज घेणे आणि तेथे काय काय बघायचे याची सतत उजळणी सुरूच होती. मात्र इतकी रजा मिळेल का हा मुख्य प्रश्न होता. एका अर्जंट प्रोजेक्टमुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुफान काम करावे लागले.

बाप हाय मी

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 16/06/2016 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
"बरं मग वकीलसाहेब, आलं समदं ध्यानात? ह्येच्यापुढं मी काय सांगू नये, तुमी इचारु नये" "लका, वकीलसाहेब झालो नंतर, आधी जिगरयार हौत. चड्डी घालता येत नव्हती तवापासून दोस्ती आपली" "म्हणूनच. म्हणूनच... चल लाग आता कामाला, लै लेट बी झालाय, वैनीसाब वराडतील" "झोप तू बी. डोळे लेन्स लावल्यागत झालेत लालभडाक" "झोपेचं तेवढं सोडून बोल. ती ग्येली आता कायमची, निघ तू" ................. "नाग्या, सगळं घीवून ये बे वर" "मालक, वैनीसाब येते म्हणतेत वर, कसं करु?" "झोपा म्हनाव त्येंना. तू ये घीवून. च्यायचं आकरामाशी" ************************** तिज्यायला कोनाय बे आकरामाशी. कोन म्हणतंय? समोर ये उंडग्या.

एक संघ मैदानातला - भाग १४

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 16/06/2016 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री पत्ते खेळत चकाट्या पिटल्यामुळे सकाळी काही वेळेत जाग आली नाही. शेवटी दादांनी येउन उठवल्यावर आमचा सूर्योदय झाला. सकाळचा वाॅर्मअप करण्यासाठी आम्ही तयार होऊ लागलो पण संडास आणि बाथरूम इतर संघांनी अडवल्यामुळे आमची पंचाईत झाली होती. १५ मिनिट कानोसा घेत आत बाहेर केल्यावर आपली इथे डाळ शिजण कठीण आहे हे दिसलं. तोंड धुवून प्रत्येकीने पिशवीमध्ये आपापले अंघोळीनंतरचे कपडे कोंबले आणि आम्हाला दिलेली बादली आणि मग घेऊन आम्ही तशाच हाफ पॅन्ट आणि शूजमध्ये ग्राउंडच्या दिशेने सुटलो. सकाळी सकाळी वाॅर्मअप करायचं सोडून हि सगळी फौज बादली आणि पिशव्या घेऊन कुठे चालली हे बघायला दादा आमच्या मागे पळत आले.

बोट - शिक्षण

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 16/06/2016 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला।' वगैरे बालगीतात ठीक आहे. पण ‘अशा बंगल्यात रहाणार्‍यांना चॉकलेटच्या वासानी मळमळायला लागेल का?’ असे रसभंग करणारे प्रश्न विचारायची जरूरच नाही कारण असा बंगला असणंच शक्य नाही. तसंच एक एक मार्कासाठी डोचकं पिकवलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर सांगितलं की अकरावी एस् एस् सी नंतर असा एक चार वर्षांचा कोर्स आहे ज्याला फी नाही, ज्यात प्रवेशासाठी मार्कांची अट नाही, पुस्तकं बेताचीच आणि समजायला बर्यापैकी सोपी, चार वर्षांच्या संपूर्ण कोर्सभर एकही परीक्षा नाही, कारण शिक्षकच नाहीत! वर दर महिन्याला ऐंशी रुपये पॉकेट मनी मिळेल - तर तो लक्षच देणार नाही. देऊन तरी काय उपयोग?