Skip to main content

भटकंती नागझिऱ्याची - फोटोब्लॉग

लेखक हृषिकेश पांडकर यांनी बुधवार, 22/06/2016 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
जंगलाचे वर्णन या आधी केलं असलं तरी नाविन्य कमी होत नाही.पण या वर्णनाबरोबरच थोडं माहितीपर लिहावे असा विचार मनात आला.

पाऊस

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 21/06/2016 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
तसे पावसाळ्याचे वेध मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच लागलेले असतात. नैऋत्येहून निसटलेले चुकार काळे ढग इकडे लहानसं आकाश व्यापून टाकत असतात. बाजूंनी पांढरे, कापसांसारखे गुंतागुंतीचे, थराथरांचे आणि मध्यभागी काळसर असलेले ढग येथे दिसू लागलेले असतात. हे तसे दरवर्षीच सुरुवातीला दिसतात. मागाहून येणाऱ्या जलाने संपृक्त झालेल्या काळ्याभोर मेघांच्या लाटांची ते जणू वर्दी द्यायला आलेले दिसतात.

कांचीवरम

लेखक किसन शिंदे यांनी मंगळवार, 21/06/2016 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
कांचीवरम! रेशीम धाग्यापासून साडी विणण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले नगर! 'फुलांमधे जति, पुरूषांमधे विष्णू, स्त्रियांमधे रंभा आणि नगरांमध्ये कांची' असे महाकवी कालिदासही संस्कृतामध्ये ज्या नगराचे वर्णन करतो ते कांचीवरम. भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आहे, पण तरीही सामान्याना ब्रिटीशांपासून मिळालेलं स्वातंत्र्य खर्‍या अर्थाने उपभोगता येत नाहीच. याचं मुख्य कारण म्हणजे सावकार-जमीनदारांनी सामान्य लोकांची चालवलेली पिळवणूक. व्यापारी लोकं स्वतःचा नफा वाढवण्यासाठी मजूरांना अगदी कमी मजूरीत प्रचंड काम करवून घेत आहेत.

भाषिक खेळ

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 21/06/2016 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आम्ही भाषेशी, खास करून उच्चारांशी संबंधित खेळ खेळतोय. मागे कधीतरी लेकीने आणि खेळायला घरी आलेल्या भाचे मंडळींनी “कंटाळा आला”चं पालुपद सुरू केलं. मग त्यांना म्हटलं, हे वाक्य सलग दहा वेळा म्हणून दाखवायचं... न चुकता... म्हणा... A good cook, could cook good. हं. करा सुरूवात. झालं. सगळ्यांनी उत्साहात सुरूवात केली आणि मग पहिल्या दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात सगळ्यांचं गुड-गुड-गुड ऐकू येऊ लागलं आणि खिदळायला सुरूवात... आई/मावशी अजून सांग ना... सांगते. पण आधी याचा सराव करा. थोडा वेळ त्यांचे प्रयत्न सुरू राहिले. मोठी भाची सातव्या इयत्तेत. भाचा आणि लेक, दोघंही दुसऱ्या इयत्तेत.

न्यु जर्सी कट्टा - १९ जुन २०१६ - वृतांत

लेखक पिलीयन रायडर यांनी मंगळवार, 21/06/2016 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझं नशिबच थोर आहे! अमेरिकेत पाऊल ठेवलं आणि न्युयॉर्क कट्ट्याचा धागा! भारतात मी एकाच कट्ट्याला गेले होते, ते ही ३.५ मिनिटं. अनाहितात सुद्धा ऐनवळेस टांगारुपणा करण्यात मी फेमस आहे. हा कलंक धुवुन काढायची नामी संधी आली होती. जायचं हे नक्की होतंच. ते ही सहकुटुंब सहपरिवार! कट्ट्याच्या दिवशी सकाळी सकाळी नवरा आणि मुलाने भलताच कार्यक्रम काढला आणि फादर्स डे म्हणुन कुठेतरी उंडारायला गेले. टांगारुपणा घरातच आहे. परंपरा राखली बाप लेकांनी!! अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी एकदम "पंछी बनु उडती फिरुं मस्त गगनमे.." च झाले! ;) आणि ११ च्या कट्ट्याला १०.४० लाच जाऊन पोहचले.

योग दिवस २०१६

लेखक लाल टोपी यांनी मंगळवार, 21/06/2016 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या योग दिवसाच्या सर्वांना हार्दीक शुभेछा!! आपल्यापैकी अनेक जण भारतात किंवा भारताबाहेर आपापल्या शहरात योग दिवसात सामिल होणार असेलच! या धाग्यावर त्यांचे फोटो अनुभव नोंदऊन योग दिव साजरा करावा असे वाटते. सुरुवात माझापासूनच करतो.. सध्या योग प्रशिक्षक म्हणून वास्तव्य बगोटा कोलंबिया येथे आहे.

ब्रेड पॅटीस चाट

लेखक मानसी१ यांनी सोमवार, 20/06/2016 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेड पॅटीस चाट साहीत्य : ब्रेड, हीरवी तीखट चटणी, गोड चटणी दही : साखर मीठ घालुन फेटुन घ्या. वरुन हीरवी मिर्ची व कडीपत्त्याची फोडणी द्या. पॅटीस साठी : ४ बटाटे उकडुन २ कणस ऊकडुन आलं लसुण पेस्ट २ चमचे कोथींबीर बारीक चिरुन तीखट, मीठ , चाट मसाला : स्वादानुसार कॄती: कणसं मिक्सर वर बारीक करुन घ्या. वरील सर्व साहीत्य एकत्र करुन पॅटीस मसाला तयार करुन घ्या . १ ब्रेड स्लायीस घ्या, त्यावर तयार पॅटीस मसाला लावा. तसे सगळे ब्रेड तयार करुन घ्या . तवा गरम करुन दोन्ही बाजुने खरपुस भाजा.

पुन्हा एकदा शामराव : नसत्या उचापती : बैल पण गेला ,आणि झोप पण गेली .

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 20/06/2016 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा शामराव : नसत्या उचापती : बैल पण गेला ,आणि झोप पण गेली . वडगावचा बैलाचा बाजार हा महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे .साधारणपणे पावसाळ्याच्या आधी जून महिन्याच्या सुरवातीला तो वडगावात भरतो . असाच दोन तीन दिवस तो आता भरणार होता . शामराव या बाजाराची फारच आतुरतेने वाट बघत होते . आज शामरावनी बैल आणण्या साठी बाजारात जाण्याचे ठरवले होते .त्यांचे अनेक वर्षा पासून मनांत ठरवलेले इप्सित आज पूर्ण होणार होते. ग़ेली चार वर्षे त्यांनी लोकांचा बैल मागून आणून आपल्या शेतीचे काम चालवले होते. अतोनात दिवस रात्र कष्ट करून ,एक एक पैसा गाठीला बांधला ,तेव्हां कुठे चार वर्षांनी तीस हजार रुपये साठले . आहो !

पॅरिस भ्रमंती: वैभवशाली प्रासाद, संग्रहालये आणि कलाकृती (भाग १: फॉन्तेनब्लो)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 20/06/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
. वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय. संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली. पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (त्या काळातील आठवणी इथे वाचा) शिवाय मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स अधून मधून बघायला मिळायचे.

सद्भावना - हराभरा भारत

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 20/06/2016 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्तामधे प्रकाशित झालेला माझा एक लेख इंग्रजीतही या व्यक्तीबद्दल लिहिलं आणि नुकतंच ते द बेटर इंडिया नावाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झालं वृक्षसंवर्धनाचं कार्य करणार्‍या एका संघटनेचा मी कार्यकर्ता आहे. तसं व्यापांमुळे फार योगदान देता येत नाही पण जी खरोखर मनोभावे हे काम करतायत, ज्यांनी हा वसा खर्‍या अर्थाने घेतलाय त्यांचा परिचय मात्र होतो.