Skip to main content

जुनेरलं नातं...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 05/03/2024 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
जुनेरल्या नात्यामध्ये ऊब गोधडीची; विरलेले धागे तरी जर ओळखीची.. जुनेरल्या नात्यामध्ये अबोल पाऊस; भिजलेले मन तरी डोळा ना टिप्पूस.. जुनेरल्या नात्यामध्ये सल ही जुनीच; गळाभेट नाही परी सय नेहमीच.. जुनेरल्या नात्यामध्ये शब्द हरवले.. जुनेरले नाते आता मुके मुके झाले.. जुनेरले नाते सख्या नशिबाचा खेळ.. पाय निघता निघेना आली निरोपाची वेळ .... आली निरोपाची वेळ.

गूगल ट्रेन्ड्स २०२४

लेखक माहितगार यांनी सोमवार, 04/03/2024 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात दक्षिणेतील मुख्यमंत्री आणि एक राज्यस्तरीय मुख्य विरोधक असा गूगल ट्रेंड शोध घेऊन लेख लिहिला पण अनवधानाने तो माझ्याकडून डिलीट झाला होता. दक्षिणेतील राजकीय नेत्यामध्ये जगन मोहन रेड्डी आंध्रातच नव्हे तर भारतातही अधिक शोधले जात असलेले नेते असावेत असे गूगल ट्रेंड्स दाखवत होते.

अपहरण - भाग ६

लेखक स्मिताके यांनी शनिवार, 02/03/2024 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ५ - https://misalpav.com/node/51976 ८ जूनच्या पहाटे पावणेदोन वाजता, आपली चार विश्वासू माणसं बरोबर घेऊन कर्नल व्हाईट हाऊसमध्ये शिरले होते. यात त्यांचं बेमालूम वेषांतर आणि बग्गीतल्या बॅगेत सापडलेलं व्हिजिटिंग कार्ड यांचा मोठा वाटा होता. ध्येयासाठी त्यांनी आपल्या भरदार दाढीचासुद्धा त्याग केला होता! त्यानंतर जे घडलं, त्यात फारसं कौशल्य नव्हतं. एखादा बावळट नवशिका भुरटा चोरदेखील ते सहज करू शकला असता. शिकागोहून आणलेल्या भूलीच्या मिश्रणाने राष्ट्राध्यक्षांना बेशुद्ध केलं खरं, पण त्यांच्या पत्नीचं काय करायचं?

माझी नर्मदा परिक्रमा

लेखक Narmade Har यांनी शुक्रवार, 01/03/2024 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

पाकिस्तान-६

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शुक्रवार, 01/03/2024 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
“जेव्हा काठीचा मार पडला तेव्हाच देश योग्य मार्गावर आला.” - पाकिस्तानातील एक वयस्क. पाकिस्तानने पहिल्या दशकात सात पंतप्रधान पाहिले. लियाकत अली खान वगळता उर्वरित दोन वर्षांपेक्षा कमी काळ टिकले. कोणत्याही राष्ट्रीय निवडणुका झाल्या नाहीत. प्रांतिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली. बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तानला आपले स्वातंत्र्य हवे होते. पूर्व पाकिस्तानही हातातून निसटणार होता. निरक्षरता आणि गरिबी वाढत होती.

धर्म आपला मार्ग स्वतः निवडतो - धम्मपठारावरून थेट वृत्तांत

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 01/03/2024 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला ज्युरासिक पार्क या सिनेमातला तो जगप्रसिद्ध संवाद आठवत असेल "Life Finds way" तसाच काहीसा अनुभव मला नुकताच आला आणि तो आपल्या सर्वाबरोबर शेअर करावा या साठी हा लेखन प्रपंच. आणि हो या सगळ्या अनुभव प्रापंचात आपल्या मिपाचाही तेवढाच महत्वाचा वाटा आहे हे देखील मला आनंदाने नमूद करावेसे वाटते. फक्त त्या याआधी मला तो संवाद थोडा बदलायचा आहे "धर्म आपला मार्ग स्वतः निवडतो", धर्म आणि जीवन खरेतर एकमेकांना पूरक असे काम करतात म्हणून मी तो संवाद थोडासा बदलायचे धाडस केले.

बेसरकार...

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 29/02/2024 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
17 फेब्रुवारीला पाकिस्तानातल्या रावळपिंडीचे विभागीय आयुक्त असलेल्या लियाकत अली चट्टा यांनी पाकिस्तानातच नव्हे तर आख्ख्या जगात खळबळ उडवून दिली !!! दहा बारा दिवसापासून पाकिस्तानात व्यवस्थेचा नंगा नाच सुरु आहे. राष्ट्रीय निवडणुका झाल्या, त्याची मत मोजणी सुरु झाल्यावर तिकडे धुमाकुळ सुरु झाला. इम्रानखानला आधीच तुरुंगात ठेवले आहे. त्याचा पक्ष मोडीत काढला. चिन्ह गोठवले. पुन्हा कधी निवडणूक लढण्याचे धाडस केले नाही पाहिजे अशी तजवीज करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात भलतंच घडलं. आम जनतेने त्यालाच डोक्यावर घेतले. त्याचे उमेदवार अपक्ष लढले.

"आर्टिकल ३७० चा राजकीय थरार"

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 29/02/2024 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक लोकांनी अलीकडे थिएटर कडे सिनेमा बघायला पाठ फिरवली आहे हे एव्हाना बॉलिवुडवाल्याना नक्की कळले असेल. पण तरीही सिनेमा बनविण्याचे काही धाडसी प्रयत्न होतात. काश्मीरला भारतापासून वेगळे पाडण्याचे सातत्याने प्रयत्न ज्या कलम ३७० मुळे होत होते, ते कलम रद्द करण्याचे अभुतपुर्व कार्य मोदी सरकारने केले. त्या रद्द करण्याच्या प्रक्रियेची माहिती देणारा - Article 370- हा सिनेमा आहे. इतका गुंतागुंतीचा आणि राजकीय वाटणारा पण सामाजिक सुद्धा असणारा हा विषय चित्रपट बनविण्यासाठी निवडला हे प्रचंड साहस आहे. ताबडतोब आव्हान असणार होते ते हा सिनेमा बनवायचा कसा या विषयीचे ; म्हणजे दिग्दर्शनाचे, कथा कथनाचे.

अपहरण - भाग ५

लेखक स्मिताके यांनी बुधवार, 28/02/2024 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ४ - https://misalpav.com/node/51970 दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे एकच गडबड उडाली. जहाजाच्या मूळच्या सुरेख पांढऱ्याशुभ्र रंगावर कळकट करडा रंग चढवण्यात आला. तोही कसा, कोणी नवशिक्या रंगाऱ्याने धब्बे घालून कसातरी फासल्यासारखा. किती गचाळ दिसू लागलं ते जहाज! त्यावर लटकवलेल्या छोट्या बोटी काळ्या-हिरव्या रंगवल्या गेल्या. त्यांचा अवतार एखाद्या कोळशाच्या खाणीतून आल्यासारखा झाला. सर्व उरलेले रंग एकत्र कालवून ते जहाजावरच्या लाँचला फासण्यात आले.. त्या रंगाचं वर्णन करणं केवळ अशक्य!पोकळ लाकडाचं एक खोटं धुरांडं बनवून ते जहाजावर बसवण्यात आलं.

डासबोध

लेखक रम्या यांनी मंगळवार, 27/02/2024 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
गालावरी हसू, मुखावरी दाढी । राजकारणे गुढी, बांधू पाहे ।। दाढीचे वजन, दाढीचेच भजन । करू आम्ही नमन, दाढीचेच ।। दाढीचाच फोटो, दाढीचीच मूर्ती । सांगावी अपकीर्ती, नेहरूंची ।। पाजू आमुचे रक्त, आम्ही अंधभक्त । करू मशागत, दाढीचीच ।। कपिला गाय, करोनिया माय । गळ्यातच पाय, आमच्याच ।। ईडीचाच टेकू, घेऊनिया फेकू । विरोधकांचे दमन, करू पाहे ।। जे का ईडीसी घाबरले, त्यांसी म्हणे जो आपुले । समीप येता म्हणावे, शुद्ध जाहले ।। चोरावे धनुष्य, लांबवावे घड्याळ । हाती द्यावे टाळ, जनतेच्या ।। प्राणप्रतिष्ठेचा कावा, विरोधकांचा चावा । दाढीतल्या उवा, ठेचू पाहे ।। मस्तवाल खोंड, पाळोनिया गुंड । निर्भयांचे तोंड, फोडू