पुन्हा पाऊस
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
चांगली उन्हाची सवय झाली होती ...
तो डबडबणारा घाम
ते काळवंडलेले शरीर
तो कोरडेपणा ... ती रखरख
यांना चांगली लय आली होती ...
कुठून हे काळे ढग आले ... आता सगळ बेताल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ...
आता पुन्हा तो ओलावा
पुन्हा तो हिरवेपणा
पुन्हा त्या कोरड्या डोंगरावर
उमटणार झर्यांच्या रेघा ...
बुजणार पुन्हा ...
पडलेल्या त्या सगळ्या भेगा ...
पुन्हा नव्या आशेनी ... आता मन चल बिचल होणार ...
आता पुन्हा पाऊस येणार अन ...
काव्यरस
मिसळपाव