Skip to main content

द स्टार्क स्टोरी-२

लेखक क्षमस्व यांनी मंगळवार, 16/08/2016 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
"जाणं जरूरी आहे?" "जावं लागेल." "थांब." त्याने आजूबाजूला बघितलं आणि हाक मारली. कॅप्टन..... शेजारच्या दगडावर कॅप्टन आराम करत बसला होता. प्रत्येक वेळी मीच असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. "शीपवर जा" "मला ऑर्डर देऊ नकोस." "मग ही माझी विनंती समज." "डॉ. बॅनर मला विनंती करतांना बघून आज माझ्या जन्माचं सार्थक झालं..." डॉ बॅनरने एक तुच्छ कटाक्ष कॅप्टनकडे टाकला!

आशय - भाग ५

लेखक किंबहुना यांनी मंगळवार, 16/08/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना आणि भाग १ आशय - भाग २ आशय - भाग ३ आशय - भाग ४ मी तसा वर्गातला हुशार विद्यार्थी म्हणून गणला जात होतो. जरी कधीही मी वर्गाच्या मेरिटलिस्टमध्ये आलो नसलो, (त्यात नेहमी मुलीच असायच्या) तरी गणित, संस्कृत, विज्ञान वगैरे विषयात असलेल्या गतीमुळे, तसेच माझ्या भावाच्या तसेच वडिलांच्या रेप्युटेशनमुळे तसी माझी इमेज चांगली होती. याचा मला बर्‍याच ठिकाणी त्याचा फायदा मिळायचा.

सांस्कृतिक भारत : गोवा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 16/08/2016 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे गोमांचल, गोपाकापट्टम, गोपकपुरी, गोवापुरी, गोमांतक इत्यादी प्राचीन गोव्याची पूर्वीची नावे आहेत. गोवा हे ऐतिहासिक संचित स्थान म्हणून ओळखले जाते. उत्तर काळात गोव्याचा उज्वल इतिहास दिसून येतो. इसवी सनच्या पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्य होते. नंतर कदंब, महालखेडच्या राष्ट्रकुट राजाचे अधिपत्त्य. चालुक्य व पुढे सिल्हारांचेही राज्य. 14 व्या शतकाच्या शेवटी यादवांचे राज्य. नंतर दिल्लीच्या खिलजीची स्वारी. गोव्यावर मुसलमानी अंमल सुरू झाला.

सुश्याचं प्रेमपत्र

लेखक निखिल माने यांनी मंगळवार, 16/08/2016 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
"सुश्या फुगाला प्रपोज करणार" हि बातमी संजीवनच्या होस्टेलमध्ये वणव्यासारखी पसरली.सुश्याच्या नेभळटपनाकडे बघून आणि त्याचा पूर्वेतिहास माहित असल्याने मी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही.पण त्याला भेटून त्याचा रागरंग त्या बातमीवर विश्वास ठेवावाच लागला. कॉलेजच्या शेवटच्या वर्षीतरी ती आपल्याला 'हो' म्हणेल या भोळ्या आशेपोटी हा बहाद्दर हे नसतं धाडस करतोय हे मला कळून चुकल.खरतर आमचा सुश्या आणि फुगा दोघेही कॉलेजमध्ये प्रचंड फेमस! अभ्यासात सतत टोप केल्यामुळे सुश्या आणि आपल्या जरा जास्त नखर्यामुळे फुगा कॉलेजमध्ये प्रचंड फेमस झाले होते.

शेयर बाजार आणि आपण

लेखक कमवू यांनी मंगळवार, 16/08/2016 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे केला. निष्कर्ष खालीलप्रमाणे अतिशय धक्कादायक होते. ६७% भारतीय हे इंशुरंसला गुंतवणुक समजतात. सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा अॅसेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही. रिटर्न्स हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके काय? हे सांगणारे फक्त २% भारतीय निघाले. म्युचल फंङ मध्ये गुंतवणुक करणारे २२% भारतीय एसआयपी हे एका योजनेच नाव अाहेअस समजतात. अॅसेट अलोकेशन म्हणजे काय हे ८८% भारतीयांना ठाऊक नाही. ६३% लोक हे म्युचल फंङमध्ये गुंतवणुक केल्यावर म्युचल फंङची पाॅलीसी घेतली अस म्हणतात.

सेकंड लाईफ - भाग ५

लेखक अक्षरमित्र यांनी मंगळवार, 16/08/2016 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
या अगोदरचे भाग : सेकंड लाईफ सेकंड लाईफ - भाग २ सेकंड लाईफ - भाग ३ सेकंड लाईफ - भाग ४ ----------------------------------------------- आज लवकरच उठलो. उठलो म्हणावं तर झोप तरी नीट लागली होती का ? नाहीच म्हणायला पाहिजे. लवकर लवकर आवरुन घराबाहेर पडलो. आई बाबांना रात्रीच सांगीतलं होतं की सकाळी लवकर जाणार आहे आणि २-३ दिवस बाहेरच रहावे लागेल म्हणून. रिक्शा पकडून एसटी स्टँडवर पोहोचलो.

उंच उंच झोका

लेखक जागु यांनी मंगळवार, 16/08/2016 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
झुला, झोपाळा, पाळणा प्रत्येकानेच अनुभवलेला असतो. सुगंधी, रंगीबिरंगी हारा-फुलांनी सजून, फिरत्या भिंगरीच्या खेळण्याच्या गमतीत, ठरलेले नाव फुला-रांगोळ्यांसह गुपित सांभाळत, कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या च्या सुरेल लयीत, बाळाचे नाव पाळण्याच्या कुशीत, पाळण्याच्या साक्षीने बाळाच्या कानात ऐकवून प्रचलित केले जाते. पाळणा गीताच्या सुरांवर बाळाच्या उंच झोक्यांची सुरुवात इथूनच होते. अशा प्रकारे अगदी बालपणापासूनच पाळण्याची संगत प्रत्येकालाच लाभलेली असते. वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे पाहण्यात येतात.