Skip to main content

ऑलिम्पिक !

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 19/08/2016 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
92 सालचे बार्सीलोना ऑलिम्पिक सुरु असतानाची गोष्ट. त्यावेळी बार्सीलोना आणि ऑलिम्पिक ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ कळत नव्हते. कोणीतरी,कुठेतरी,काहीतरी खेळतायेत एव्हढंच कळायचं. दूरदर्शनवर रात्री दिवसभरातल्या सामन्यांचे हायलाइट्स दाखवायचे. त्यात बरोब्बर साडेदहा वाजता संसद अधिवेशनाचे वृत्तांकन करणाऱ्या दहा मिनिटाच्या 'पार्लियामेंट न्युज ' सुरु व्हायच्या. 'आज मी पार्लमेंट नंतर सुद्धा ऑलिम्पिक बघणार' असं म्हणणारा मी बातम्या संपेपर्यंत झोपलेला असायचो.असो. तर त्या ऑलिम्पिकमध्ये मला आवडलेला खेळ म्हणजे उड्या मारण्याचा !

" गुरु "

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 19/08/2016 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
समोर उभा असलेला बाप त्याची सगळी करणी आज उधळून लावत होता , आत्ता मात्र महाडिक पण त्या दुसऱ्या मांत्रिकाकडे पोहोचला , झाली हकीकत सांगितली होम पेटवला गेला आणि आत्ता दोघे मिळून जनार्दन चा बळी घ्याला जोर लावत होते...... " गुरु सठ गुरु हठ गुरु हैं वीर, गुरु साहब सुमिरों बड़ी भांत सिंगी ढोरों बन कहो, मन नाउं करतार। सकल गुरु की हर भजे, छटटा पकर उठ जाग चैत संभार श्री परमहंस। " तिकडे जनार्दन च्या सर्वांगाला टाचण्या टोचल्या जात होत्या श्वास कोंडला जात होता.

जुने चान्दोबा मासिक परत

लेखक गिड्डे यांनी शुक्रवार, 19/08/2016 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते मित्रानो आठबतात का तुम्हाला ते जुने चान्दोबाचे दिवस त्या विक्रम वेताळाच्या गोष्टि रामायण महाभारतातिल गोष्टि खुप काही सान्गन्यासारखे एक अमुल्य ठेवा जो आता हरवला आहे पण मित्रानो मि तो पिडिएफ स्वरुपात जतन करुन ठेवला आहे १९६० ते २००६ पर्यन्त चे सर्व मराठी चान्दोबा तसेच १९४९ ते २००६ पर्यन्त चे सर्व हिन्दि चन्दामामा आणी इतरही खुप सारी पुस्तके कोणाला हवी असल्यास मला सम्पर्क करा माझा भ्रमणध्वनी आनन्द गिड्डे ८०८७५४८१३८ जशी मला आवड होती म्हणुन मी ते तयार केले पण आपल्याप्रमाणेच कोणाला तरी ते हवे असतिल त्याना याचा फायदा व्हावा हाच ही पोस्ट टाकण्याचा उद्देश

कोकोनट पुलाव विथ जिंजर-गार्लिक डॅश अँड क्रिस्पी रोस्टेड स्वीटकॉर्न

लेखक सपे-पुणे-३० यांनी शुक्रवार, 19/08/2016 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे नारळीपौर्णिमेला नारळाच्या वड्या केल्या. आता पुढचा नंबर नारळीभाताचा होता. पण वड्यांच्या गोड वासामुळे अजून काही गोड पदार्थ करण्याची इच्छाच राहिली नाही आणि त्यातूनच हा पदार्थ सुचला. पदार्थाच्या नावावरूनच लक्षात आलं असेल की, ह्याचं स्फूर्तिस्थान 'मास्टरशेफ' चे वेगवेगळ्या देशांतले कार्यक्रम आहेत. त्यामुळे वाचताना पाककृती ओळखीची वाटणे स्वाभाविक आहे. थोडक्यात काय तर ही पाककृती स्वयंपाकातील एकसुरीपणा कमी करण्याचा एक प्रयत्न आहे आणि तो स्वयंपाक करणारीला डोळ्यासमोर ठेऊन केलेला आहे.

दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखनिक हवे आहेत.

लेखक सई कोडोलीकर यांनी शुक्रवार, 19/08/2016 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेकर मित्र मैत्रिणिंनो, दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी तातडीने ४० लेखनिकांची (स्क्राईब्ज) आवश्यकता आहे. २३, २४, २६ आणि २७ ऑगस्ट ह्या तारखांना दुपारी १२ ते १ आणि २ ते ३, तर २४ ऑगस्टला दुपारी २ ते ४ अशा परिक्षांच्या वेळा आहेत. लेखनाचे माध्यम मराठी असून लेखनिकांसाठी वयाची अट नाही. ज्यांना शक्य होणार असेल, त्या इच्छूक मंडळींनी कृपया तातडीने माझ्याशी संपर्क साधावा.

इंग्रजी व्यायामशाळा

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 18/08/2016 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी-इंग्रजी शब्दकोष असं सांगतो की ‘व्यायामशाळा’ याचा समानार्थी इंग्रजी शब्द आहे ‘जिम्नॅशियम’. मात्र बोली भाषेत ह्या दोन्हीमध्ये फारच तफावत आहे. पूर्वी व्यायामशाळा असायच्या. व्यायामशाळा म्हणजे जिथे दंड, जोर, बैठका, मुद्गल, डंब-बेल्स आणि तत्सम उचलण्याची वजने हे मुख्य व्यायामप्रकार. थोडक्यात म्हणजे गुरुत्वाकर्षणाविरुद्ध सगळे व्यायाम. सिंगल बार, डबल बार, शिवाय जागा असली तर आखाडा आणि मलखांब. चपला बूट बाहेर काढायचे. व्यायाम अनवाणी करायचा. लॉकर्स वगैरे नाहीत. काढलेले कपडे अडकवायला भिंतींवर खिळे. बहुतेक जण बनियनवर व्यायाम करायचे. काही उघडबंबही असायचे आणि त्यात कोणालाही काही गैर वाटत नसे.

“प्रवास” त्या दोन दिवसांचा,,,,,,,,,,,

लेखक Bhushan chandrakant Ghadi यांनी गुरुवार, 18/08/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
कसं भेटायचं, कुठे भेटायचं, वेळ काय, सर्व काही आदल्या दिवशी ठरलं. अन अखेरीस तो दिवस उजाडला. पहाटेचा गजर झाला वेळतच तय्यारी झाली. घोंगावणाऱ्या वाऱ्यासोबत अल्लड पावसाने पण हजेरी लावली. ठरलेल्या ठिकाणी अन दिलेल्या वेळेत भेटणे जरुरी होतं. नाहीतर शिव्या हमखास पडणार हे माहीत होतं. स्टॉप वर पोचलो, रिक्शा-ऑटों-रिक्शा-ऑटों-रिक्शा ओरडत हातवारे करत होतो. समोरच्या व्यक्तीचा चेहरा पण स्पष्टपणे दिसत नव्हता एवढा पाउस. फक्त गाड्यांचे चमकणारे दिवे तेवढे दिसत होते. त्यावरून समजे की चारचाकी, तिनचाकी अन दोनचाकी वाहने कुठची आहे. इतक्यात एक रिक्शा पुढ्यात येउन थांबली. साहेब कुठं जाणार..?
काव्यरस

बादलीयुद्ध ९

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 18/08/2016 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
[ सातव्या भागातला बराच मजकूर वगळला आहे. त्या स्टोरीचं वळण वेगळं होतं. या स्टोरीचं वेगळं. ] ------------------------------------------------------------------------------------------------------------- मनी आपली कोण नाय आणि आपण मनीचा कोण नाय. छ्या. बराच वेळ मी नुसताच झाडूकडे बघत ऊभा होतो.

अतिरेक !

लेखक इल्यूमिनाटस यांनी गुरुवार, 18/08/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
विचारांचा अतिरेक झाला की मग मी कोणासोबत तरी बोलून मन मोकळं करतो, पण आज विचार केला की लिहून मन मोकळं करावं! वर्तमान पत्रात जाहिराती येतात , म्हणजे खूपच येतात. 'वर्तमान पत्रातील जाहिरातींचा अतिरेक' या विषयावर एक वेगळा लेख लिहावा लागेल! पण अधून मधून बातम्या सुद्धा येतात! नाही असं नाही! कसल्या असतात या बातम्या? दहशतवादाच्या आणि बलात्काराच्या. या दोन भयंकर समस्यांनी भारतालाच काय सगळ्या जगाला ग्रासलंय. दहशतवाद! हिंसेचा अतिरेक झाला की माणूस दहशतवादी होतो. आता या विषयावर बोलायला लागलं की आपसूकच एक वाक्य ऐकू येतं की "दहशतवादाला धर्म नसतो"! नसतोच मुळी.

माझा सायकल प्रवास….

लेखक नपा यांनी गुरुवार, 18/08/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
सेमिस्टर नंतर आपल्या गावी आपण सायकल वर जाऊया..!! का?...उगाच अभियांत्रिकीच्या तिसऱ्या सेमिस्टर ला हा किडा आम्हा मित्रांना चावला. अति उत्साहात बरेच जण तयार झाले. पण दर वेळी परीक्षा देऊन थकलेलो आम्ही, या ना त्या कारणाने आपापल्या गावी (अर्थातच केलेल्या संकल्पाला फाट्यावर मारून) विनासायास आणि विनासायकल पोहचायचो. अधून मधून तो किडा पुन्हा पुन्हा डोकं वर काढायचा, चावायचा आणि पुन्हा गायब व्हायचा. नंतर अचानक लक्षात आला कि आता हे तर शेवटचे वर्ष, मग मात्र मी पुन्हा एकदा सगळ्यांना विचारले कि कोण कोण तयार आहे सायकल सवारीला ला? फक्त एक मित्र तयार होता. सातव्या सेमिस्टर नंतर जायच ठरलं.