Skip to main content

दिवाळी अंक २०१६ - आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 22/08/2016 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत. रहस्यकथा वाचायला कोणाला आवडत नाही! लहानपणापासून आपण सगळेच शरलॉक होम्स, ब्योमकेश बक्षी, फेलूदा, काळा पहाड, बॅ० अमर विश्वास आदिंच्या रहस्यकथा वाचत / ऐकत / पहात आलो आहोत. याच अनुषंगाने यंदाच्या दिवाळी अंकात रहस्यकथांसाठी एक वेगळा कोपरा, वेगळा विभाग आपण ठेवणार आहोत. या दालनासाठी तुमच्याकडून रहस्यकथा हवी आहे. स्वतंत्रपणे रहस्यकथा लिहिलीत तर सोन्याहून पिवळं, पण अन्य भाषांतली भाषांतरित / रूपांतरित कथाही चालेल!

दर्द - भाग १

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 22/08/2016 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
दर्द . --- भाग १ ----------- कथा --------- काल्पनीक ---------------- कॉलेजमध्ये गॅदरिंगची धामधुम चालु झाली होती . सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते . संध्याकाळची वेळ झालेली होती . हळुहळु अंधार पडु लागला होता . थोड्याच वेळात फॅशन शोचा कार्यक्रम चालु झाला . या फॅशन शोच्या वेळी आणी एकुणच पुर्ण गॅदरींगमध्ये काही गैरप्रकार घडु नये म्हणुन कमिटीने कॉलेजमधल्याच काही धट्ट्या कट्ट्या मुलांना बाउन्सर कम व्हॉलेंटिअर म्हणुन नेमले होते . हे कार्यकर्ते आपल्या खिशाला व्हॉलेंटिअरचा बॅज सगळ्यांना दिसेल असा ठळकपणे लावुन ऐटीत इकडुन तिकडे हिंडत होते . अधुन मधुन उगाचच इतरांवर गुरकावत होते .

रणथंभोर ची राणी

लेखक लोनली प्लॅनेट यांनी रविवार, 21/08/2016 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
राजस्थान मधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यान १९९७ चा जुलै महिना, जंगलातील एका भागात एका वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला, हि अतिशय आनंदाची घटना पाहण्यासाठी भारतीय व्याघ्र तज्ज्ञ डॉ वाल्मिक थापर व आयरिश माहितीपट निर्माता कॉलिन स्टॅफर्ड जॉन्सन हे दोघे गेले होते, त्यांनी पहिले कि तिन्ही बछडे मादी आहेत. काही दिवस त्यांनी बछड्यांचे निरीक्षण केले, तेंव्हा त्यांना दिसले कि एक मादी बछडा इतर दोन बछड्यांपेक्षा जास्त आक्रमक व खेळकर आहे. त्यांनी पहिले कि तिच्या चेहेऱ्यावर एक माशाच्या आकाराचा पट्टा आहे , कॉलिन नि वाल्मिक थापर ना विचारले FISH ला हिंदीतून काय म्हणतात ?

घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कुंभार्ली घाट (भाग १)

लेखक मोदक यांनी रविवार, 21/08/2016 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
घाटवाटांची पहिली सायकल राईड मी वरंध्यात अर्धी सोडली असली तरी तशी बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाली होती. त्यावेळी अनेकांनी सुचवल्या प्रमाणे आणि आमच्या एक एक घाट सर करत जाण्याच्या नियोजना प्रमाणे पुढील घाटवाटांची ट्रीप काढण्याचे ठरले. १५ ऑगस्टची जोडून सुट्टी आणि पावसाळा यांमुळे फारसा वेळ न जाता प्लॅन ठरला. यावेळी अजेंड्यावर होता कोयना-चिपळूणला जोडणारा कुंभार्ली घाट. मात्र कुंभार्ली घाटाचा प्लॅन ३ दिवसात बसत नव्हता. पुण्यापासून कोयनानगरचे अंतर साधारणपणे २०० / २१० किमी आहे.

दूधसागर - एक अविस्मरणीय अनुभव!

लेखक समीरसूर यांनी रविवार, 21/08/2016 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
जून 2016 च्या एका दुपारची चारच्या आसपासची कंटाळवाणी वेळ. रणरणतं ऊन. डोळे घड्याळावर. कधी एकदाचे संध्याकाळचे सहा वाजतात आणि कधी एकदाची "ऑफीस सुटले, मन मोहरले, चकाट्या पिटाया, मोकळे जाहले" अशी परमानंदाची अवस्था येते असे झालेले. मी आणि माझा उत्साही मित्र नितीन चहा प्यायला गेलो. हे ही एक कर्मकांड! एरवी बाहेरच्या टपरीवर निवांत चहा प्यायला काय मजा येते! पण ऑफीसात चहा पिणेदेखील काम करण्याइतकेच शुद्ध कर्तव्यभावनेतून जन्मलेले एक कर्म असते. आम्ही चहाचे प्याले घेऊन कुठेतरी बूड टेकवतो. आमच्या अजून एका उत्साही मित्राचा, सारंगचा, फोन येतो. त्याचे बोलणे ऐकून आमचे डोळे चमकतात.

गावाकडची गोष्ट (भाग 3)

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 21/08/2016 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ पुजारीबुवा देवळाच्या बाजूलाच फर्लांगभर अंतरावर राहात होते. घराच्या आजूबाजूला बरीच फुलझाडं होती. पेरू, चिक्कू, आवळे अशी थोडी बहुत फळझाड देखील दिसत होती. ते बघून मी म्हणालो,"बुवा झाडं बरीच आणि छान आहेत. बाग छान ठेवली आहे तुम्ही." त्यावर ते हसत म्हणाले,"अहो मी काही करत नाही. मालिनीला झाडांची खूप आवाड आहे. फुल झाडं आणि फळझाडं सगळी तिनेच लावली आहेत. मागे विहीर आहे त्यातून दहा-पंधरा बादल्या पाणी काढावं लागत रोज या झाडांसाठी. नाहीतर इथल्या हवेला कसली जगतात ही झाडं. पण मालिनीला अजिबात कंटाळा म्हणून माहित नाही. रोज सकाळी उठून ती फुलं काढते आणि सगळ्या झाडाना पाणी घालते.

बादलीयुद्ध १०

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 21/08/2016 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
काळवंडून गेलेल्या आभाळात नुसत्याच विजा चमकत असतील तर ते एक मनोहरी दृष्य असते. आता पाऊस येणार. लगेच पडणार. मात्र तसं काही होत नाही. आभाळात पाऊस दबून बसतो. भक्ष्याच्या प्रतिक्षेत. विजा कडाडतात. भर संध्याकाळी अंधारुन येतं. वारासुद्धा पिसाळलेल्या डुकरासारखा सैरभैर. टेकडीपासून डाव्या बाजूला, उतारावर वाळलेल्या वाहत्या गवतात वसलाय एक वाडा. जीर्ण. युगे लोटली. पण वाडा चिरेबंदी. त्याला वाडा म्हणावं किल्ला हा ही एक प्रश्न आहे. उसवलेल्या छतातला एक पत्रा वाऱ्यावर डुलतो आहे. त्याचा भयानक चिरका आवाज आसमंतात घुमतो आहे. मी झपाझप पाऊले टाकत वाड्यावर जातो आहे. गेटवरुन जाण्यापेक्षा मी कुंपणावरुनच उडी टाकली.

जेवण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 21/08/2016 07:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुतल्यावर नेहमीप्रमाणे विचारू नकोस की जेवण तयार आहे का.. आज मी जेवण तयार केलं नाही.. आज मूड नाही रे... महाबळेश्वर हून आपण आणलेल्या सा~या स्ट्रा बेरी मी टेबलवरच्या ग्लास बाऊल मध्ये ठेवल्या आहेत.. त्या मूठभर मी तोंडात घेणार आहे.. अन तू तुझ्या ओठांनी त्याचा सारा रस चोखून घ्यायचा आहे.. होय मला माहीत आहे ओठातून सारा रस वक्षावर अन ओटी पोटावर ओघळतोय, पण तो तू ओठांनी हळुवार पणें टिपून घ्यायचा आहेस.. ह्या बेधुंद संध्याकाळी.

कावळे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 21/08/2016 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
स्वताचा मुलगा अमेरिकेत वेल सेटल्ड असताना...शेजाराच्याना "राहुल ला लागली का नोकरी? नाहि बरेच दिवस घरीच दिसतो म्हणुन विचारले..... . स्वताची मुलगी सुस्थळी पडल्यावर.." यमी च जमतय की नाहि? बघा हो..वय उलटुन गेले कि अवघड होते... . स्वताच्या मांडीवर नातवंड खेळवत बाजुच्या जोशी काका च्या सुनेला काहि कोम्पिकेशन्स आहेत हे माहित असताना..."काय रामभाऊ? पेेढे कधी देणार..३ वर्ष झालीत तुमच्या राहुल च्या लग्नाला........... . अश्या चोचा मारणारे कावळे आपल्याला समाजात..नात्यात नेहमी पहायला मिळतात...चोचा मारण्या साठी हे कावळे जखमा शोधत असतात..दिसली जखम मार चोच..कर घायाळ.... संवेदना हीन लोक्स

YZ (परिक्षण दुरुस्ती)

लेखक तर्राट जोकर यांनी रविवार, 21/08/2016 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
(समीर_happy go lucky हे मिपावर नेहमी चित्रपट परिक्षण लिहित असतात. दर्जाच्या बाबतीत थोडंफार हुकत असले तरी त्यांची चिकाटी व आवड पाहून मला फार छान वाटले. त्यांच्या नुकत्याच आलेल्या http://misalpav.com/node/37050 ह्या वायझेड मराठी चित्रपटाच्या परिक्षणामधे बरेच काही खटकले. एक उत्तम चित्रपट परिक्षक होण्याची योग्यता असलेल्या लेखकास केवळ हुर्यो उडवून पळवुन लावावे हे मला योग्य वाटले नाही. त्यापेक्षा त्यांच्या परिक्षणातल्या खटकलेल्या बाजू वगळून, शब्दरचना सुधारून तेच परिक्षण संपादित केले तर कसे वाटेल अशी कल्पना मनात आली.