Skip to main content

आल्प्स च्या कुशित आम्ही खुशित !!! भाग १

लेखक सुहास बांदल यांनी शनिवार, 27/08/2016 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
स्वित्झर्लंड आपल्या भारतीय पर्यटकांच्या मनातील एक गोड कोपरा.जिथं बहुतेक प्रत्येकाला जायची इच्छा असते. कुणाला एकटे जायचे असते तर कुणाला एका खास व्यक्ती बरोबर जायचे असते. नुकतंच ऑगस्ट च्या मध्याला स्विस आणि फ्रेंच आल्पस च्या निसर्ग सानिध्यात भटकायचा योग् जुळून आला.तसा हा कार्यक्रम २ महिन्यांपुर्वीच ठरला होता पण काही कौटुंबिक कारणानं मुळे बारगळायची वेळ आली होती आणि त्याला कारण पण मीच होतो. असो असे समर प्रसंग येत च असतात. शुक्रवारची रजा टाकल्या मुळे आमच्याकडे पुर्ण पणे ३ दिवस हाताशी होते त्यामुळे असलेल्या वेळेचा १००% उपयोग करायचे ठरले होते.

केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग १

लेखक पद्मावति यांनी शनिवार, 27/08/2016 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही गावं, जागा आणि शहरं वर्षानुवर्षे भेटूनसुध्दा आपल्याशी फटकून वागतात तर काही अगदी तटस्थ, अनोळखी राहतात. काही मात्र आपल्याला पहिल्या भेटीमधेच स्वत:च्या धाडकन प्रेमात पाडतात..... केप टाउन हे शहर हे निर्विवादपणे या तीसरया प्रकारात येतं. स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाश, भर वस्तीत असूनही सतत असलेली निसर्गाची साथ, सभोवताली उधाणणारा महासागर, एका हाकेच्या अंतरावर असलेले द्राक्षांचे मळे, तर श्वास घ्यावा इतक्या सहजतेने या शहरात भिनलेला आणि रमलेला देशाचा मानबिंदू असा एकमेवाद्वितीय टेबल माउंटन!!! आयुष्यात कधीतरी साऊथ आफ्रिकेला जायला पाहिजे अशी माझी खूप वर्षांपासून इच्छा होती.

सरहद पर

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 26/08/2016 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
फाळणीच्या कथा तश्या वेदनादायकच असतात. गेले खूप दिवस हि कथा मनात घर करून होती, काल जयंत काकांच्या मंटोच्या कथा वाचतांना पुन्हा आठवली. उर्दू कथा : नन्दकिशोर विक्रम __________________________________________________________________________ "सोड रे मला सामान बांधून आवरू दे पटापट", शाहिदा पदर सोडवत म्हणाली. "मग सांग ना अम्मी ??

एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/08/2016 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले. मुखपृष्ठ : . माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.

‘तुला’

लेखक शंतनु _०३१ यांनी शुक्रवार, 26/08/2016 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
‘तुला’ तुला मानण्यात काहीच अर्थ नाही, तू आहेस ही जाणिव मुळात नकोशी आहे. इथे तू हवाच कुणाला आहे. तुझ्या आदर्शांचा न्याय जगात सर्वत्र लावता येत नाही. तूला स्मरायचे ते फक्त मन:शांती साठी ? मन:शांती ती फक्त योग्य निर्णयासाठी. आणि योग्य निर्णय तो फक्त आपल्या फायद्यासाठी ? पिडीत, उपेक्षित, अन्याय सहन करणारे अश्या ढाली घेवून जगणार्यां, समानतेची मागणी करणार्यांना तुझ्यावरच विश्वास नाही. तुझ्या तत्वांचे उपदेश देणार्यांमध्ये ‘मी’ पणाचा वास येतो. असे दोन्हीही सतत तुलना करत असतात. तुझ्या चांगल्या वाईटची. आस्तिक नास्तिकाच्या विचारांची. यश अपयश – चढ उतार सगळ्याचं पाहावे लागतात.

मी पा सदस्यांची मदत अथवा मत हवे आहे....

लेखक भम्पक यांनी शुक्रवार, 26/08/2016 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... खरे तर खूप कंटाळा आला आहे या नेहेमीच्या रुटीनचा. अस्मादिक स्थापत्य अभियंता असल्याने तरी बरे आहे दरवेळी नवीन आव्हाने येतात अन स्वानंद भेटतो. परंतु आता मात्र वैताग आला आहे . असो. सध्या अँप ची चलती आहे. आमच्याही मनात असाच एक विचार आहे . सर्व बांधकाम संबंधित सेवा ( छोट्या स्केल वर.,म्हणजे जशी घर टू घर डिलिव्हरी ) एका छत्राखाली आणण्याचा मानस आहे. मग त्यात प्लम्बिंग, इलेक्टरीफिकेशन, फ्लोरिंग, सुतारकाम , रंगकाम , वॉटर प्रूफिंग , फर्निचर , किरकोळ बांधकाम , छोटे बदल , तोडफोड इ . तसेच इतर सेवा जसे व्हाल्यू एशन, प्लॅनिंग , देखरेख इ . समाविष्ट असेल .

आमचे समूहगान....(?)...

लेखक भम्पक यांनी शुक्रवार, 26/08/2016 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
काल मुलाला घेऊन शाळेत गेलो होतो. आज सुट्टी होती परंतु त्याची शाळेत समूहगीताची स्पर्धा होती . त्यांच्या शाळेची 10-12 मुले आलेली होती. अन स्पर्धा रामकृष्ण मठात होती. त्यांचा सर्वांचा व्यवस्थित गणवेश पाहून आणि तयारी पाहून मला माझ्या समूहगीताच्या स्पर्धेची आठवण आली. 1985-86 सालची गोष्ट असेल. त्यावेळी मी बहुधा 6 वीत होतो. आणि सांस्कृतिक स्पर्धेत तेव्हा मी नेहमी भाग घेत असे. कोणताही कार्यक्रम असो माझे गाणे अथवा भाषण ठरलेले असायचे. अश्याच एका तालुका लेव्हल स्पर्धेसाठी आमचा एक गट बनवला होता. माझ्यासारखेच वयक्तिक गाणी म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरांनी गट बनविला होता. जोर्वेकर सर होते .

"तडफड" की "तोडफोड"

लेखक विशुमित यांनी शुक्रवार, 26/08/2016 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
तू सांगितलंस म्हणून मी लिहलं "त्यानं " सांगावं अन सृष्टी ने हलावं तसं..!! शब्दांची तोडफोड केली पण काळजाची तडफड झाली भावनांचं झाड झडलं थोडक्यात लिहिण्याच्या नादात मन पार कोरडं पडलं मी लिहलं माझ्या परीने माहित नाही त्यातून तुला काय समजणार आहे कारण तू वाचणार आहेस तुझ्या नजरेने याला "तडफड" म्हणू की "तोडफोड"...!! ==>> विशुमीत

न्यु यॉर्क "सफर"!

लेखक पिलीयन रायडर यांनी शुक्रवार, 26/08/2016 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
म्हात्रे काकांनी न्यु यॉर्क सफरीला सुरवात केली आहेच.काकांच्या विमान प्रवासापेक्षा थोsssडासा वेगळा माझा प्रवास होता. आमचीही सफरच, फक्त हा "सफर" वेगळ्या अर्थाने आहे! भावना अगदी ओथंबुन वहात आहेत म्हणुन ही वीट धागा म्हणुन वेगळी काढत आहे. ;) अर्थातच ही वीट म्हात्रे काकांच्या चरणी अर्पण! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ वीट पहिली! कधी कधी माणसाचं नशिबच जोरात असतं. मागच्या वर्षी माझंही होतं. नवरा अमेरिकेला आल्याने मलाही २ महिने अमेरिका पहायला मिळाली. दोन महिने शुद्ध तुपातली निव्वळ ऐश!! पण त्याहुनही महत्वाचं म्हणजे नवरा!!! गेले पाच महिने आम्ही भेटलो नव्हतो.

अमेरिकेत मी काय वाचतोय ? भाग २ रा

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी शुक्रवार, 26/08/2016 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
असाही एक अजब गजब दिन ! ! नुकताच भारतात व येथे अमेरिकेत सुद्धा, सर्वच भारतीयांनी १५ ऑगस्ट २०१६ ला " भारतीय स्वातंत्र्य दिन " मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.त्याचे ' चलचित्रण ' ( म्हणजे व्हिडिओ ) मी सुद्धा, येथे अमेरिकेत बसल्या बसल्या, दुरून दर्शन करून ( दूरदर्शन संचावर ) अनुभवले. आणि सहज विचार केला कि आपण वर्षभरात किती तरी दिन साजरे करीत असतो.