Skip to main content

प्रत्येक नगरात एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरणपथ आणि मैदान

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 29/03/2024 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय योध्यांचे स्मरण असण्यासाठी प्रत्येक नगरात एक भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ आणि मैदान असावे यासाठी नगर नियोजन केले जावे. - असा कायदा व्हावा ही मागणी आहे. भारतीय युद्धवीरांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी एक भव्य समर्पित असा किमान पाच किलोमिटर्सचा भव्य मार्ग असावा. याच्या दोन्ही बाजूंना भव्य वृक्ष असावेत. हा पथ एका किमान दहा एकर क्षेत्रफळ असलेल्या भारतीय युद्ध वीर स्मरण मैदानाला जाऊन मिळावा. हे मैदान मुलभूत सुविधायुक्त असावे. मैदानात स्थानिक वीरांचा फलक असावा. युद्धातील वीरांनी भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण बलिदान दिले आहे.

मानस- धुळवड

लेखक आर्या१२३ यांनी शुक्रवार, 29/03/2024 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
मानस - धुळवड स्थळ: गोंदवले दिवस : फाल्गुनाचे. होळीपौर्णीमेचा दुसरा दिवस! वेळ : साधारण पहाटे पावणे पाचची श्रीमहाराज तसे नेहमीप्रमाणे ब्राम्ह मुहूर्तावरच उठले होते. आन्हिक आटोपून थोडा वैखरीने नामजप करून पुन्हा थोडे आडवे झालेत...आदल्या दिवशीच्या दगदगमुळे! अर्थात आत हृदयात अखंड नाम सुरू आहेच! आदल्या दिवशी पौर्णिमा, अन् होलिकादहन! इतके लोक गोंदवल्यात येणार! सगळ्यांची व्यवस्था लावणे. त्यात सध्या पाणी टंचाई! स्वयंपाकघर बांधकामासाठी काढलेले. बराच मोठा व्याप.

जेव्हा माशाचं पिलू पोहायला शिकतं!!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 28/03/2024 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
✪ अदूचं सायकल चालवणं- आनंद सोहळा! ✪ छोटे "मैलाचे दगड" पण आनंद अपरंपार ✪ अरे, मला वाटलं तू मागून धरलं आहेस, पण तू तर केव्हाच हात सोडला होतास! ओ येस्स! ✪ समवयस्क सायकल सवंगडी नसल्याने लागलेला वेळ ✪ तिला सायकलिंग व ट्रेकिंग करताना बघणं! ✪ आपल्याला मिळालेल्या गोष्टी शेअर करण्यातला आनंद ✪ चिमुकल्या रोपट्याचा वृक्ष होणं अनुभवणं सर्वांना नमस्कार. माझी नऊ वर्षांची मुलगी अद्विका- अदू नुकतीच सायकल चालवायला शिकली आणि सायकलिंगचा आनंद घ्यायला तिने सुरूवात केली! हा आनंद आपल्यासोबत शेअर करत आहे. त्या निमित्ताने मनात आलेले विचार शेअर करत आहे.

भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग ३

लेखक गोरगावलेकर यांनी बुधवार, 27/03/2024 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ येथे वाचा आज गणपतीपुळ्याहून हरीहरेश्वरसाठी प्रवास सुरु केला. साधारण पंधरा मिनिटातच कवी केशवसुतांचे गांव मालगुंड येथे पोहचलो. केशवसुतांचे जन्मस्थान असलेले घर आज त्यांचे स्मारक म्हणून उत्तम प्रकारे जतन केलेले आहे.

अधिकार

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 27/03/2024 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात माझ्या बायकोच्या आजी देवाघरी गेल्या. बातमी कळताच आम्ही सर्व तातडीने पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला निघालो. गाडीमध्ये मी माझी बायको आणि माझे सासु सासरे होते. पूर्ण प्रवासात सतत आम्ही संभाजीनगरला आजींच्या राहत्या घरी गोळा झालेल्या नातेवाईकांशी संपर्कात होतो. एरवी पुण्याहून निघालो, नगरला पोहोचलो, नगर क्रॉस झालं, जवळ पोहोचलो एवढे अपडेट पुरेसे असतात. अशा प्रसंगी मात्र कोणालाच स्वस्थ बसवत नसतं, सतत बोलत संपर्कात रहावं वाटतं. जवळची एक व्यक्ती गेलेली असताना इतर जवळच्या व्यक्तींच्या सहवासात रहावं वाटतं. आणि यावेळेस सतत चर्चा करण्यासाठी आणखी एक विषय होता. दिवंगत आजींना मुलगा नव्हता.

बग आली माझ्या कोडा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 26/03/2024 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
धाव धाव टीम लिडरा बग आली माझ्या कोडा किती आता गुगलावे? एआय मदतीला घ्यावे? डेडालाईन मृत्यू भासे चहा कॉफी नरडी डाचे आता उद्धरण्या केवळ तूच येई धावत सबळ पाषाणाच्या चुकल्या कोडी टेस्टर, क्यू.ए. इग्नोर करी - पाभे २६.०३.२०२४

पुस्तक प्रकाशन

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 25/03/2024 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
२५ मार्च २०२० या दिवशी कोरोनामुळे लॉक डाउन करण्यात आले . त्यानंतर अनेक लोकांनी त्या काळात सेवा किंवा समाजसेवा केली , पण त्यांच्यामध्ये असेही काही लोक होते की ज्यांनी विशेष कार्य केलं . प्रेरणादायी !अगदी हटके ! अशा २७ लोकांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून विवेक स्पार्क फाउंडेशन या संस्थेनं , एक पुस्तक निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आणि तो आता पूर्ण झाला देव पाहिलाय आम्ही असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि ते कार्य कथा रूपात मांडण्यात आलंय . त्याचं प्रकाशन आज संध्याकाळी होत आहे - २५ मार्च २०२४ ६.

डोंगरवाटा , पुस्तक परीचय

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 25/03/2024 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
अजून वाचतोय...या पुस्तकाने भूरळ पाडली, गारुड केलं जणू, मंत्रमुग्ध झालो. --------------------------------------- डोंगरवाटा लेखक : शेखर राजेशिर्के प्रकाशन: सृजनरंग प्रकाशन मुद्रक : प्रमोद घोसाळकर संपादक : श्रीरंग पटवर्धन मुद्रीतशोधन : उदय शेवडे किंमत : रु.900 असं म्हणतात कि वीरांचे पोवाडे,वीरांनीच गावेत... त्याच न्यायाने, ह्या पुस्तकाचा परीचय लिहीण्याआधी पात्रता निकष ( क्लालीफीकेशन राऊंड ) पास करणे मला आवश्यक वाटले, म्हणून कनकेश्वर (अलीबाग) ट्रेक केला, काल पुण्यात पहाटे वेताळटेकडी वर जाऊन आलो.

पॉलीअनाची कथा

लेखक भागो यांनी सोमवार, 25/03/2024 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो मी अलीकडेच एक कथा वाचली. ती मला एव्हढी भावली की वाटलं कि ह्या कथेची मिपाकरांना ओळख करून द्यावी. म्हणून हा लेख, १९१३ साली अमेरिकन लेखिका एलेनोर पोर्टर ह्यांनी “पॉलीअनाची कथा” नावाची कादंबरी लिहिली. ही पॉलीअना नावाच्या तेरा वर्षाच्या अनाथ बालिकेची आणि तिच्या “शाश्वत आनंदा”च्या खेळाची कथा आहे. ह्या कथेने जनमानसाची एव्हढी पकड घेतली की अमेरिकेत ठिकठीकाणी ह्या कथेत सांगितलेल्या तत्वज्ञानावर आधारित “आनंदी क्लब” सुरु झाले. ह्या क्लबातून पॉलीअना चा सुप्रसिद्ध खेळ खेळला जाऊ लागला. ही कथा जगाच्या अनेक भाषात भाषांतरित झाली. ह्या कादंबरीच्या लाखो प्रती खपल्या.

प्रश्नाच्या उत्तरातल्या प्रश्नाचं उत्तर..

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 24/03/2024 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक सांगू? उत्तरात नं, अलगद एक प्रश्न ठेवून द्यावा.. बासुंदीच्या वाटीवर कसं हलकं केसर पेरतो ना तसा. मग संवादाला लाघवी स्वाद येतो, मोहक रंग चढतो, दिवसभर चेह-यावर कळत नकळतसं एक हसू खेळत रहातं! म्हणून तर! एक तरी प्रश्न उत्तरात असूच द्यावा ... कारण हम्म् शी हम्म् असं किती वेळ चालणार? स्माईली ला स्मायली असं किती वेळ खेळणार? मारून मुटकून कवितेच्या, सुविचारांच्या मोळ्या तरी कुणी किती बांधणार ? त्यापेक्षा उत्तरात अलगद एक प्रश्न असूच'च' द्यावा ... मग कारण मिळतं, अकारण दार खटखटवायचं. नाहीतर "बोलू की नको, आत्ता की मग?