Skip to main content

ब्रायनिंग (Brining)

लेखक केडी यांनी बुधवार, 31/08/2016 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
चिकन, हा माझा विकपॉइंट आणि त्यात तंदुरी म्हंटल कि मग बघायलाच नको. बऱ्याचदा मात्र चिकन हे असं तंदूर किंवा ओव्हन मध्ये भाजल्यावर कोरडं पडतं, आणि मग खाण्याचा मज्जा निघून जातो. ह्या पुढे मात्र अश्या कोरड्या चिकनला आपण टाटा बाय बाय करूयात! ह्या लेखात ब्रायनिंग बद्दल सविस्तर लिहिणार आहे. ब्रायनिंग म्हणजे काय, ते का करावे, नक्की ह्या मागे शास्त्र काय आणि शेवटी ते कसे करावे हे आपण आज जाणून घेऊ. ब्रायनिंग का करावे? आधीच आम्हाला थारा नसते, कधी एकदा चिकन खातोय, आणि त्यात हा बाबा अजून एक स्टेप करायला सांगतोय! अहो का करू आम्ही हे नसते उपद्व्याप?

पिंपरी चिंचवडची खाद्ययात्रा

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 31/08/2016 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच. १. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत, ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्‍याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं. २. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार ३.

अता खेळी महाराष्ट्रातील कामाची

लेखक नाखु यांनी बुधवार, 31/08/2016 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या "खासदारांनी गाव दत्तक घेऊन आदर्श खेडे" या संकल्पने अंतर्गत सचिन ने (खासदार असून्ही आपुलकीने एकेरी ऊल्लेख करावासा वाटतोय त्या बद्दल क्षमस्व्)आंध्रामधील पुत्तमराजूकन्ड्रिगा ईग्रजी नाव Puttamrajuvari Kandrika दत्तक घेतले होते साल २०१४ नोव्हेंबर. त्याचा झालेला कायापालट गोषवारा असा: पहिली भेट२०१५मध्ये दिली नंतर वारंवार कामाचा आढावा व प्रगती यांचा पाठपुरावा केला. खासदार निधीतून २.७

झिंग झिंग झिंगाट....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 31/08/2016 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
झिंग झिंग झिंगाट.... १९७३ च्या दुष्काळानंतर एवढा भीषण दुष्काळ बीड जिल्ह्याने पाहिला नव्हता. राम पोंढेच्या पोरांच्या शाळा केव्हाच सुटल्या. मोठा कुठेतरी बिगारी काम करीत होता तर छोट्याचे कळण्याच वय नव्हते. त्याला बिचाऱ्याला फक्त एवढेच कळत होते की आता भूक लागल्यावर मागच्याप्रमाणे खायला मिळत नव्हतं. जास्त रडारड केल्यावर धपाटं मात्र मिळत होतं. दररोज एका तरी शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी वर्तमानपत्रातून झळकू लागल्या. राम्याने मनाशी प्रतिज्ञा केली की तो असलं काही करणार नाही. ‘‘वेळ आली तर म्या गाव सोडल, चोऱ्या करल, पण आत्महत्या करणार नाही.

पाऊस-प्रवास

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 31/08/2016 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
हे लिखाण भटकंती सदरात टाकावे की जनातलं मनातलं या सदरात, या संभ्रमात होतो शेवटी इथे लिहायला सुरुवात केली. सकाळी साडेसात-आठची वेळ म्हणजे हातघाईची, जणू काही रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. मुलींची शाळेला जाण्याची घाई, माझी आणि माझ्याहून चांगल्या अर्धांगिनीची (Better-half हो, तीही हा धागा वाचणार ना, म्हणून लिहिलं!) कामाला जाण्याची घाई. आजचा दिवसही काही वेगळा नव्हता, except रिपरिप पडणारा पाऊस आणि गच्चं भरलेलं आभाळ. हैद्राबादचा पाऊस हैद्राबादी लोकांसारखाच आळशी आहे पण जनरली तसा शहाणा आहे.

बरे नाही

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 31/08/2016 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
टपोरे पाणीदार नयन, त्यावर रेघ काजळाची, वर असे रोखून बघणे, बरे नाही * भिवया कोरलेल्या, शर नजरेचे घातक ह्या पारध्यास,असे घायाळ करणे, बरे नाही * ओष्ट पाकळ्या गुलाबी,खट्याळ हास्य शराबि, बहकवलेल्यास, बहकावणे साजणे, बरे नाही * रेशमी कुंतल,त्यावर गजरा,काय नखरा, लाविली आग,अंगास फुलांनी, हे, बरे नाही * गुलाबी रेखीव जिवणी, त्याचे विभ्रमी चाळे होतो जीव चोळा मोळा, असे करणे बरे नाही * तुझे अल्लड वय,वाट अशी नीसरडी अस भेटणं वेळी अवेळी,प्रिये बरे नाही. * खवळला तो सागर, सुटले पिसाट वारे तरी लोटतेस होडी वादळात ,सखे बरे नाही

सरसगड सुधागड अवचितगड

लेखक चेतन पडियार यांनी बुधवार, 31/08/2016 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
'पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकून देऊन पावसात जाऊन भिजायचं!' महाराष्ट्रात भटकंती करणाऱ्या प्रत्येकाला हि कविता शोभते, कारण आपला सखा सह्याद्री त्याला साद घालत असतो. मग आपल्या शहरातल्या रस्त्यावर पावसात किंवा घराच्या गच्चीत जाऊन भिजायचं कि सरळ सह्याद्रीला जाऊन भिडायचं?? हा प्रश्न आपल्या सर्वांना उद्भवतो आणि अर्थातच त्याच होकारार्थी उत्तर हि आपलं तयारच असतं. मग आपल्या सारखे डोंगर भटके, निसर्गप्रेमी किंवा नुकताच फोटोग्राफी चा छंद बाळगणाऱ्या मित्रांची यादी समोर येते अन फोनाफोनी सुरु! कुणाच्या तरी आईला पटवून सांगावं लागतं तर कुणाच्या मोठ्या भावाला कटवून जावं लागतं.

हिमालय, रॉली आणि मी. भाग २ : लेह - त्सो मोरीरी

लेखक किल्लेदार यांनी बुधवार, 31/08/2016 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय, रॉली आणि मी. भाग १ : लेह - तुर्तुक माझा एक आवडता चित्रकार आहे, व्हिन्सेंट वॅन गॉग. सढळ हाताने आणि अतिशय कल्पकतेने केलेला रंगांचा वापर ही याची खासियत. कॅफे टेरेस ऍट नाईट हे त्याचे तैलचित्र बघितले आणि त्यावर फिदाच झालो. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर केलेला पिवळ्या रंगाचा वापर अफलातून आहे. याची चित्रे अतिशय ओबड-धोबड असली तरी एकंदर मांडणी आणि रंगसंगतीमुळे काळजाचा ठाव घेतात. फ्रांस मधल्या या चित्रकाराची चित्रं प्रत्यक्ष बघण्याचा योग आजतागायत कधी आला नाही पण माझी ती हौस हिमालयाने नेहमीच पूर्ण केली.