सासवडची यादवकालीन मंदिरे
सासवड तसं ऐतिहासिक गाव. इथे अनेक जुने पुराणे वाडे आहेत. पुरंदरेंची भली मोठी गढी आहे, सोपानकाकांची समाधी आहे, वीरगळ आहेत. गावच्या पाठीमागे भला मोठा पुरंदर त्याचा जोडीदार वज्रगडासह दिमाखात उभा आहे. ह्या सासवडाचा वारसा मात्र शिवकाळाच्याही आधी जातो तो थेट यादवकाळात. तत्पुर्वीचा त्याचा इतिहास मला ज्ञात नाही. खुद्द पुरंदर हा यादवकालीन किल्ला. गडावरील पुरंदरेश्वर आणि केदारेश्वर ही तत्कालीन मंदिरे त्याची अजूनही साक्ष देतात.
ह्याच सासवडात दोन यादवकालीन मंदिरे आहेत आणि पुरंदरच्या पायथ्याच्या पूर गावात एक.
मिसळपाव
