तीन दिवस दोन रात्री : भाग १
(अनुभव खरा, नावे खोटी)
त्या नोटांच्या बंडलातून सराईतपणे एक एका नोटेवर अंगठ्याचे बोट फिरत होते. ती दहाची नवी कोरी करकरित नोट हळुवार निसटली. अंमळ झटका घेऊन तीच्या डोक्यावरुन खाली घरंगळली. मऊसूत खांद्यावरुन येऊन उभारलेल्या वक्षावर क्षणभर स्थिरावली, पुढच्या क्षणी फिरून खाली ओघळली. घागर्याच्या निर्यांमधून लपत-छपत कार्पेटवर पडली. त्या निर्जीव नोटेवरल्या हसर्या गांधीजीच्या चष्म्यावर तिच्या टोकदार हायहिलची टाच पडली. गांधींचा चष्मा फुटला नाही पण माझ्या आतमधे खोल कुठेतरी, काहीतरी खळ्ळंकन फुटलं.
मिसळपाव