Skip to main content

तू

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 20/09/2016 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
अग्नीशलाका म्हणू तुजला की नवदुर्गेची ओळख तू झाशीवली राणी तुझ्यात चन्नमाची आठवणं तू सीता तू, द्रौपदी तू कुंती... गांधारी ती तू जिजाऊचा वास तुझ्यात माधवाची रमा ही तू तू न अबला... तू सबला कणखर मनाची..भाऊक तू तू आता न प्रवाह पतिता प्रवाहाचा मार्ग तू तुझ्या करी बळ सहस्त्रांचे मनी दयाभाव प्रेषितांचे निर्णयक्षम् आत्मा तुझा गे जगाचा एक आधार तू
काव्यरस

एक क: पदार्थ

लेखक शंतनु _०३१ यांनी सोमवार, 19/09/2016 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी मी एक क: पदार्थ चंचल, स्वैर नि चिकित्सक, सौंदर्याच्या व्यर्थ व्याख्या, भावनांचे बेकार प्रवाह, आघात करताहेत कशावर ? कुणावर ? झीज, झीज, अपक्षय, अपक्षय, एक सुरुकुती, पांढरा केस, तिशी, चाळीशी हे दिसतं, जाणवतं, पण भावना त्या का पिकात नाहीत ?????
काव्यरस

हर हर महादेव !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 19/09/2016 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
नुसताच फुत्कार नको...आता डसून दाखवा..... भारतभूच्या सुपुत्रांनो ...आता करुनच दाखवा......! शब्दाचा मार फक्त शहाण्यालाच...मूर्खांना लाथाच घाला.... लाखो अश्राप मातापित्यांचे अश्रू, त्याविना कसे थांबती बोला ? आताही काही बोललो नाही... तर उरणार नाही कणा.... आता नजरा तुमच्यावर आहेत... हर हर महादेव म्हणा...!
काव्यरस

भास...

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 19/09/2016 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
ओलावत नाहीत पापण्या, भिजून जातात... तुझे-माझे-आपले क्षण नव्याने रूजून येतात... संधिप्रकाश पसरतो मनभर, आभाळभर... समुद्रही उसळतो स्वार होतो लाटांवर... दिसू लागतो एक पुल समुद्रात आकार घेणारा... जाणवतो एक स्पर्श हात हाती देणारा... भास कुठला हा की तो कळत नाही... नशीबाच्या मुर्ख रेषा काही केल्या जुळत नाहीत... उरतो उद्वेग, शरणागती... वर्षं वर्षं उलटून जातात तरी उरतात कशी नाती...

बाप्पामुळे एकत्र आणलेली लोक मंडळांमुळे वेगळी तर झाली नाही आहेत ना ?????

लेखक सतिश२५१० यांनी सोमवार, 19/09/2016 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी येणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोर 3 -3 वेळा नमस्कार करून जाणारा मी , देवासमोर खूप खाबरून जणू त्याला मी केलेल्या सगळ्या लहान लहान चुकांची माफी मागून पुढे जात होतो .....शाळेतून घरापर्यंत येताना लागणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोरून मागंन तेच असायचं फक्त त्या मध्ये जास्त कळकळ आणायचा प्रयत्न करायचो.

उरीचा घाव

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 19/09/2016 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
छप्पन इंचाच्या ह्या 'उरी' भोसकली अठरा इंची सुरी बधिर मन ऐकून शब्दफुरफुरी मानवत नाही श्रद्धा अन सबुरी नेहमीच का आमच्या हातावर तुरी का सहन कराव्या ह्या कुरबुरी फोडून टाका तो जबडा आसुरी चमकवा तोफा, बंदुका, कुकरी माजवा हल्लकल्लोळ शत्रूच्या पुरी न ठेवावी कोणतीच मोहीम अधुरी होउदे जयघोष दाखवा बहादुरी लढाईच ही अछ्छी वा बुरी पुरे झाल्या हो त्या चर्चा संतुरी मागतो अखंड विजयाची कस्तुरी -संदीप डांगे
काव्यरस

दिवस रिहॅब चे !!!!!!

लेखक वरुण मोहिते यांनी सोमवार, 19/09/2016 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
अँब्युलन्स मधून खाली कोण तरी उचलत आहे .आता आठवत नाही कोण होता तो .वर कोणीतरी न्हेलं ते हि आठवत नाही .डायरेक्ट जाग १५ तासांनंतर ,इंजेकशन दिलं असावं .बहुधा झोपेचं असावं आता हे हि आठवत नाही आता पिक्चर प्रमाणे फ्लॅश बॅक सांगतो .. सुरवात साधी सरळ छान घर मज्जा मज्जा अश्या टाइप . नीट शिक्षण कॉलेज पोस्ट डिग्री हा सगळा प्रवास (त्यात काय झालं हे परत कधीतरी )सगळंच चांगलं असला की घरचेही फार विचार करत नसावेत बहुधा .कारण कोणाला काय माहित कधी काय होता ते.कारण थोडं ड्रिंक परत कॉलेज मध्ये g.s होतो बाकी मजा मस्ती हे सगळं घरी माहित होतं त्यात काही विशेष पण नाही.

बैदा रोटी आणि इतर...

लेखक झुमकुला यांनी सोमवार, 19/09/2016 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय सर, "गणपती साठी गावी जात असल्या कारणाने मी आज अर्ध्या दिवसाच्या रजेवर जात आहे" , असे इ पत्र साहेबाला पाठवून अस्मादिक तडक आमिर चिकन सेंटर ह्या दुकानासमोर जाऊन प्रकटले, 2-3 कोंबड्यांचे निरीक्षण करून एका कोंबडीचा माझ्यासमोर बळी द्यायला सांगितला, आणि मग सर्व पाहिजे ते अवयव पाहिजे त्या आकारात कापून घेऊन, खिमा मनासारखा बारीक झाल्यावरच दुकानदाराला सोडले. आणि सुरु झाला एका पाकृ चा प्रवास. श्रावण संपला आणि मग मग वेध लागले ते बैदा रोटी चे. तसंही गणपा यांनी हि पाकृ टाकून आमचा श्रावण संपण्याची वाट बघत असलेला चातक करून टाकलाच होता,त्यातच सौ.

इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा

लेखक निनाद यांनी सोमवार, 19/09/2016 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा इलेट्रॉनिक्स विषयात असलेले प्रश्न विचारण्यासाठी हा सदाभारीत धागा आहे. 'कोणताही प्रश्न येऊ द्या - चालेल!' असा. मी इतक्यात अ‍ॅड्रुनोचा (अ‍ॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच.

रंजीश ही सही ...

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी रविवार, 18/09/2016 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिवसांनी "रंजीश-ही सही " ही मेहंदी हसन साहेबांची अजरामर गज़ल ऐकायचा योग आला . "गज़ल" .. खरं तर हा असा गायन प्रकार आहे की हा न आवडणारा प्राणी विरळाच सापडेल . मग ती जगजीत ची "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो " असो किंवा अगदी अलिकडची हरिहरन ची "मरीज-ए- इश्क " असो . गज़ल हा प्रकारच गारुड करणारा आहे . तर अश्या अनेक गझलांपैकी एक अत्यंत आवडणारी गज़ल म्हणजे अहमद फराज साहेबांची "रंजीश ही सही ". अहमद फराझ यांच्या तशा खूपश्या गज़ल , रचना अत्यंत सुरेख आहेत. पण अत्यंत लोकप्रिय अशी म्हणावी ती ही गज़ल. ओघवतं काव्य अत्यंत सोपी सुरेख मांडणी , समजायला सोपं आणि एक "कशीश” असलेलं लेखन म्हणजे अहमद फराज.