रडू
"आमच्या घरी ना , मला एक छोटा दादा मिळाला आहे. त्याला दोनच काम असतात. मुठ आवळून इकडेतिकडे पाहत बसण , आणि भोकाड पसरण.
आता उद्या माझा पेपर आहे आणि हा सकाळपासुन रडतोय. थांबा आजोबांनाच विचारतो तो का रडतो ते.."
"आजोबा..आजोबा.. अहो बघा ना तो कसा रडतोय सारखा. बोलून का टाकत नाही काय पाहिजे ते ?"
" अरे मानवी भाषेबद्दल पुर्ण अनभिज्ञ आहे तो. भुक लागली मग जिवाच्या आकंताने तो टाहो फोडतो. टाहो फोडला ,की आई जवळ करते हा अनुभव ते गाठीशी बांधून घेतो."
" आजोबा , मग डॅडा का कधी रडत नाही ? "
" आपण मोठो झालो की मानवी भाषाविश्वात आपला प्रवेश होतो. काना मात्र्ा वेलांटी उकार आपल्याभोवती फेर धरून नाचु लागतात.
मिसळपाव
पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो, ट्रेनमध्ये एकटी बाई बघून लुटले आणि चालत्या गाडीतून ढकलून दिले. आपण हळहळतो, चुकचुकतो.आजकाल साधं जगणंही कसं सगळं अनसेफ झालंय अशा चर्चा करतो आणि पेपरचे दुसरे पान उघडत अजून एक चहा पितो.