Skip to main content

अत्तराच्या कुपीतून दरवळणारा सुगंध. . .

लेखक मार्गी यांनी रविवार, 28/04/2024 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या जगण्याच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा गोष्टी विसरून जातो. वर्तमानाच्या धामधुमीमध्ये जुन्या सुगंधी आठवणींचा दरवळ विसरून पुढे जातो. आणि मानवी स्वभावच असा आहे की, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या आपल्याला कमी लक्षात राहतात आणि जे खटकत असतं, जे त्रासदायक असतं तिकडेच जास्त लक्ष जातं. जे चांगलं आणि उत्तम होतं ते आपण लक्षात ठेवत नाही. आणि पुढे जाताना मागची वाटसुद्धा आपल्या नजरेसमोरून दिसेनाशी होती. आपली मुळं आणि आपला आरंभ आपल्या डोळ्यांसमोर नसतो.

जय रायरेश्वर

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 27/04/2024 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
जय रायरेश्वर ------------------------------------------------------------------------------------------------------------- सकाळची प्रसन्न वेळ. रायरेश्वराचं अफाट पठार. पठारावरून ऊन हळूहळू खाली दरीत उतरत होतं. तर शिवाजीराजे किल्ल्यावर जात होते. सारीकडे पिवळं पडलेलं गवत. त्यामुळे पठार सोनेरी भासत होतं. आणि तो सोन्याचाच दिवस नव्हता काय ? आज राजे आणि त्यांचे सहकारी किल्ल्यावर चालले होते, ते रायरेश्वराच्या देवळात शपथ घ्यायला. साधीसुधी शपथ नाही, तर स्वराज्य स्थापनेची ! तो दिवस होता - २७ एप्रिल १६४५. राजांनी देवळात प्रवेश केला आणि त्यांच्या सवंगड्यांनीही.

काही आम्ही आणि एक म्हातारा.

लेखक भागो यांनी शुक्रवार, 26/04/2024 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
काही आम्ही आणि एक म्हातारा. आजचा दिवस आमच्या गँगसाठी खास होता. कारण आमच्या गँगच्या एका मेंबराची म्हणजे पक्याची कसोटी होती. पक्याने शाळेत असतानाच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. बोले तो शाळेच्या टीम मधून खेळायला सुरवात केली. तसं तर आम्हीपण क्रिकेट खेळत होतोच कि. पण पक्या म्हणजे राजहंस होता आणि आम्ही म्हणजे बदकं. आमची थेरी अफाट पण पक्या प्रॅक्टिकल. एकदा का क्रिकेटवर चर्चा सुरु झाली कि पहा सापळ्या तुम्हाला स्विंग बॉलिंगचे फ्लुइड मेकॅनिक डायग्रामसकट समजावून सांगणार. स्पिन बॉलिंग म्हणजे आम्हाला वाटायचे कि टप्पा खाल्यावर चेंडू इकडे वळतो नाहीतर तिकडे वळतो.

दर्शननं केला प्रवास

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 25/04/2024 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
मिरजेत दर्शन दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं.

डॉ. ब्रायन वाईस ह्यांचं पुस्तक!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 23/04/2024 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्‍या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात. तिने अधिक बोलतं व्हावं आणि हलकं व्हावं म्हणून ते तिला ट्रान्समध्ये नेतात आणि तिच्या आठवणी सांगायला सांगतात. कॅथरीन तिचे अनुभव- आठवणी सांगत जाते. थेरपीचे काही सेशन्स होऊनही तिची अस्थिरता थांबत नाही. म्हणून डॉ. वाईस तिला आणखी लहानपणीचे अनुभव विचारतात.

एक अनुभव

लेखक अहिरावण यांनी मंगळवार, 23/04/2024 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य कधी कधी गंमतीदार वळण घेतं. पण ज्यावेळेस अशा घटना घडत असतात त्यावेळेस असं काही वळण येईल, किंवा असं काही घडेल जे कदाचित चांगले असू शकेल असे त्यावेळेस वाटत नसतं. दिवस काढणं तर अवघड असतंच पण रात्र सुद्धा अंगावर येत असते. काय करावे, कसे करावे काही म्हणता काही सुचत नसते. फक्त आपल्याच आयुष्याचा आपण मांडून ठेवलेला तमाशा पहायचा आणि जमेल तितकी पडझड थांबवायचा प्रयत्न करायचा. दोन हात थिटे पडतात. आणि अवशेष दणादण डोक्यावर कोसळत पडतात. खिशात मोजून ४०० रुपये. घरात सामान आणायचे तर दोन हजार तरी लागतील. मोबाईल वगैरे तेव्हा नव्हते पण दूरध्वनीचे बील भरणे भाग. करंट खात्यावर शेवटचे साडेचार हजार पडलेले.

माझे खाद्य प्रयोग: बिन ऑईल कढ़ी

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 22/04/2024 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
दोन एक महिन्यांपूर्वी यू ट्यूब वर झिरो ऑइल गोळ्यांची कढ़ी कशी करतात वाचले होते. सौ.ला अनेकदा बिना तेलात तळलेल्या गोळ्याची कढ़ी करायला विनंती केली होती. आजकल तुम्हाला खाण्याचे डोहाळे खूप लागतात म्हणत, माझ्या विनंतीला तिने व्हिटो केला. अर्थात केराच्या टोपलीत टाकले. पण आज सोन्याचा दिवस उगवला. सौच्या बीसीची वेळ सकाळी 11 ची असते. आज तिची बीसी होती. अर्थातच जिच्या घरी जमतात तिथे जेवणाचा कार्यक्रम असतो. या शिवाय गप्पा-टप्पा, तंबोला इत्यादी. मुख्य कार्यक्रम मनाला आनंद देणारा सांस्कृतिक आदान - प्रदान,. याशिवाय आज चिरंजीव ही ऑफिसला जाणार होते.

आजचा मेन्यू -४ मोड आलेल्या मेथी दाण्यांची भाजी

लेखक Bhakti यांनी सोमवार, 22/04/2024 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
A मला जादूचा डब्बा मिळाला.आणि डाळींना मोड आणणे हा कंटाळवाणा कार्यक्रम आनंददायी झाला.खाकराचे जे पसरट गोल डब्बे मिळतात ते वापरून मूग आणि मेथी दाणे याला मस्त मोड आले.भिजलेले दाणे टाकून दर रात्री पाण्याचा थोडा शिपका त्यावर मारायचा.तिसर्या दिवशी डब्याला खुलजा सिम सिम केलं की छान छान मोड दिसतात. १.वाटीभर मे