Skip to main content

निसर्ग सृष्टीचं सादरीकरण

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 11/05/2024 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी एकटाच घरी होतो. रिकाम टेकड्या मनात निसर्गाच्या आणि निसर्ग-सृष्टीच्या सादरीकरणाचे विचार माझ्या मनात आले. लाल, पिवळा, नारिंगी, हिरवा - मला दिसणारं हे रंगांचं विविध स्वरूप आकाशात पाहून मला वाटतं, हे दृष्य माझ्या कल्पना करण्याच्या क्षमतेच्या पलिकडंच आहे. जांभळ्या आणि पिवळ्या फुलांच्या मधोमध एक केशरी फूल फुललेलं मला दिसतं. हे उघड आहे की आता वसंत ऋतू आला आहे आणि त्याचं सौंदर्य मला मोहित करत नाही असं कदापि होणार नाही. आकाशाचा स्वच्छ निळा पोत पण मला आकर्षित करतो. मला माझ्या शरीराला स्पर्श करणारा वारा जाणवतो.

शिकार...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/05/2024 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी वाचलेले पहिले पुस्तक होते Drums along the Mohwak. ज्या काळात युरोपियन लोकांनी अमेरिकेची जमीन पादाक्रांत केली, ज्या काळात इंग्लंडच्या राजाच्या सैन्याविरुद्ध अमेरिकन जनता लढली, त्या काळात घडलेली ही गोष्ट. मी जेव्हा वाचली तेव्हा माझ्या मनात, संताप, दुःख, इ. भावना उफाळून आल्या कारण त्याच काळात मी रेड इंडियन्सची गोऱ्यांनी कशी ससेहोलपट केली यावर पुस्तके वाचली होती. असे असले तरीही हे पुस्तक वाचताना, मला मोठी मौज वाटली हे मला नाकारता येणार नाही. आता एवढ्या वर्षांनंतर या पुस्तकाचा मी अनुवाद करायला घेतला आहे.. सहज.

संगीत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 11/05/2024 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी श्री. समर्थां बरोबर तळ्यावर फेरफटका मारत असताना एक प्रश्न केला. आणि तो त्यांनाच करण्याचा माझा उद्देश हा होता की,ते पेटी आणि व्हायोलिन वाजवतात. त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला मी पूर्वी गेलो आहे. मी त्यांना म्हणालो, “संगीत म्हणजे काय? संगीत नसेल तर लोक कसे जीवन जगतील? हे विचार माझ्या डोक्यात येतात आणि हे संगीतात रस नसलेल्या लोकांना कसं लागू होतं? ते मला म्हणाले, “संगीताशिवाय "जीवनातील दिवसाची" ​​ कल्पना करूया. संगीताशिवाय जीवन भावनाहीन, रंगहीन आणि अनावश्यकपणे रेखाटलेलं होईल . संगीताची व्याख्या अशी करता येईल, “वेळेत आवाजाची मांडणी करण्याची कला” म्हणजे संगीत.

लागट बोलणं

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 11/05/2024 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
का कुणास ठाऊक,त्या दिवशी मी एकटाच शांत बसलो असताना माझं मन माझ्या शाळेतल्या दिवसात रममाण होत गेलं.आणि माझ्या मनाला लागलेली एक घटना मला आठवली . धमकावलं,चिडविलं,जात असताना शक्तिशाली शब्द एखाद्याला कृतींपेक्षा जास्त दुखवू शकतात, असं मला वाटतं. तुम्ही लोकांना जे शब्द बोलू शकता ते तुमच्यावर परिणाम करू शकत नाहीत पण त्या शब्दांचा खोलवर परिणाम ज्यांना बोललं जातं त्यांच्यावर नक्कीच होतो. एकदा लोकांनी एका व्यक्तीला चिडवायला,धमकावायला, सुरुवात केली की प्रत्येकजण त्याचं अनुकरण करून त्याचा पाठपुरावा करतो. जेव्हा तुमचा एखादा मित्र तुम्हाला चिडवतो, धमकावतो तेव्हा तुमचे प्रत्येक मित्र त्यात सामील होऊन त

“आनंदी असणं म्हणजे काय हो भाऊसाहेब?”

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/05/2024 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रश्न मी काल प्रो. देसायांना विचारला. ते म्हणाले, “ सामंत, तुम्ही छान प्रश्न मला विचारला आहे. आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमतील त्या घडण्णऱ्या गोष्टींचा आनंद घेणं. हे आनंदी असणं कार्यसिद्ध होण्यासाठी निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे मार्ग असूं शकतात. त्यांच्याकडे विविध नैतिकता, मूल्यं, कर्तव्यं आणि कार्य सूची असूं शकतात. आपल्या जीवनातील सर्व कृती या एकाच उद्देशाकडे, आनंदी असण्याकडे,या मुख्य ध्येयाकडे,नेमस्त होतात. माझ्यासाठी, म्हणाल तर मी जगत असलेल्या जीवनाचा आनंद घेणं कठीण होईल, जर मी सर्व काही मला त्रास देत आहे अशी समजूत करून राहिन.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श(भाग २)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/05/2024 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तिला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची. सुम्या आपल्या नवर्‍याबरोबर पुण्यात रहायची.तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा.सुम्याला खूप आनंद व्हायचा. कोकणात आईकडून चवदार स्वयंपाक कसा करायचा ते शिकल्यामुळे तिच्या जेवणावर तिचा नवरा खूष असायचा. सुम्याला एकटी असताना गुरूनाथची खूप आठवण यायची.गुरूनाथसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायचा.पण ते प्रेम बालीश तरूण वयातलं होतं.भविष्य कसं असेल त्याची त्या वयावर पर्वाही नसते आणि जाणीवही नसते.

अक्षय्य तृतीया

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 10/05/2024 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
घ्या कविता.... सोनार आठवण करुन देतात, पेपरमधे पानभर जाहीराती देतात... अलीबाबाची गुहा, सापडल्यासारखे, दागिन्यांचे फोटोज । कंगन हार कर्णफूलं कंठे तोडे नाणी कलश, चळत बिस्किटोज ।। कुणालाच आठवत नाहित । घामटलेले खाणकामगार,त्यांचे कूपोषित अशिक्षीत बायकामुलं ।। भट्टीत तापून सुलाखून । कामगार तारवटलेल्या डोळ्यांनी, घडवतोय बारीक नक्षी फूलं।। मालक गुलजार हसतोय । पेठेत अजून एक नवे, दालन उघडतांना दिसतोय ।। #कवी नेहमीचा..... हार के जितनेवाला....बाजीगर
काव्यरस

आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 10/05/2024 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट प्रकाश नारायण संत यांचं लंपन कादंबरीवर दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी "लंपन" https://www.youtube.com/watch?v=Urf8cvCo5Ws झलक बघून फक्त एक शंकेची पाल मनात चुकचुकली ती म्हणजे लंपन जिथे वाढतो ते महाराष्ट्र्र कर्नाटक सीमेचं भागातील गाव आणि तेथील भाषा या चित्रपटात कितपत तशीच उतरली आहे ??

समुद्राच्या लाटांवर माझ्या विचारांची खलबल.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/05/2024 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी अ-वास्तव विषयावर लिहिणं सुद्धा मनोरंजक असू शकतं.माझा खालिल लेख तसाच काहिसा नमुना आहे. मला समुद्राजवळ बसून निळ्या काळ्या लाटांकडे पाहयाला आवडतं. मला असं वाटतं की जर मी तिथे बराच वेळ बसलो आणि माझ्या “मनाला” खरोखर इकडे तिकडे फिरू दिलं तर लाटांपर्यंत पोहोचेपर्यंत वाळूमध्ये, कमी झालेल्या पाण्यात पडून, माझं मन वाळूत रूतलं जाईल. आणि पुन्हा एखादी मोठी लाट येऊन पाण्याबरोबर फरफटत जाईल. आणि माझे विचार पुन्हा एकदा समुद्रात नेले जातील. किनाऱ्यावर माझं शरीर खारट वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन, माझ्या विचारांना मंथन करणाऱ्या लाटांच्या आवाजाचा आनंद घेत राहिन .मी अनेकदा माझ्या विचारांना उभारी देतो.

( लपविलास तू तगडा खंबा – डोम्बलडन )

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 09/05/2024 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
“सहा महिन्यापूर्वी बाबूनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला. हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.” आता मुंबईत लवकरच थंडी पडायला सुरुवात होईल. उत्तरेत थंडी पडली सुद्धा. वीस डिसेंबरपर्यंत मुंबईत गारवा येईलच. वाईनबाजारात निरनिराळ्या प्रकारच्या रम दिसत असतील. पण थंडी पडायला लागल्यावर वाईनबाजारात ओल्ड मन्कचा तुटवडा निर्माण होणार आणि त्या ओल्ड मन्कचा आस्वाद हवाहवासा वाटत राहणार. म्हणून उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ओल्ड मन्कची चव घेऊन घेऊन तृप्ती करून घ्यावी म्हणून थंडी संपण्यापूर्वी शेवटचा ओल्ड मॉन्कचा क्रेट मी" अपना वाईन शॉप" मधून विकत घेतो.