Skip to main content

पाऊले चालती … विडंबन

लेखक OBAMA80 यांनी शुक्रवार, 17/05/2024 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊले चालती बीजेपीची वाट सद्य पक्षाची सोडूनिया साथ गांजुनिया भारी इडी चौकशीने पडता हातात बेड्यांची माळ पाऊले चालती … अण्णा आबा नेते कार्यकर्ते ते पाहुनिया सारे फिरविती पाठ पाऊले चालती … येता होकार श्री पक्षश्रेष्ठींचा तसा चौकशीचा व्हावा नायनाट पाऊले चालती … सारे शांत होता पुन्हा लागे ओढ तस्सा वाहू लागे भ्रष्टाचाराचा पाट पाऊले चालती …

कोपनहेगन-पॅरीस भटकंती-६

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शुक्रवार, 17/05/2024 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नऊ वाजता उठलो चित्रगुप्त काकांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा मिनिट चालत गेलो, मला T3 ट्रॅम पकडायची होती. तिथून तिकीट काढून ट्रॅम धरली आणि शेवटच्या स्टेशनला पोहोचलो तिथून दुसरी पकडायची होती. एक कृष्णवर्णीय फ्रेंच कर्मचार्याला मला या स्टेशनला जायचंय असा एका इंग्लिश येणाऱ्या मुलीच्या मदतीने सांगितलं. त्याने मला यापुढे ट्रॅम जाणार नाही कारण काम चालूय, त्यासाठी ट्रॅम ने वेगळी बस सुविधा दिलीय ती सुविधा वापर आणि त्या समोरच्या स्टेशनला जाऊन उभा रहा. तिथून ट्रॅम ची बस पकड. मी स्थानकावर जाऊन उभा राहिलो बराच वेळ गेला तरी ट्रॅमची कुठलीही बस आली नाही.

ढगाळ वातावरण

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 17/05/2024 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
शेतात रोज उन्हाळी वातावरण पाहून,कंटाळा आल्यासारखं होतं. आणि ढगाळ पावसाळी वातावरणाची आठवण येत राहते. ढगाळ दिवसांत शेतावर काम करत असल्याची अनुभवून गेलेली आठवण,मी माझ्या वहीत एकदा कधी लिहून ठेवली होती ती वाचत होतो. “कधीकधी मला ढगाळ दिवस पण आवडतात त्यांचं सौंदर्य मला मोहित करतं. सर्वसाधारणपणे बरेच लोक उन्हाळी दिवसांचं कौतुक करताना दिसतात.आनंद आणि उच्च उत्साह मिळतो असं त्यांना वाटत असतं. निळ्या आकाशात आनंद निर्माण होतो असं वाटणं स्वाभाविक असू शकतं, परंतु माझ्यासाठी ते अगदी उलट आहे: जेव्हा सूर्य ढगाळ पडद्याआड सुरक्षितपणे दूर जातो तेव्हा मी सर्वात समाधानी असतो.

जाळं

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 17/05/2024 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
जाळं ---------------------------------------- रात्र झाली होती .मस्त गार वारं सुटलं होतं. दिवसभराची लग्नाची चाललेली धामधूम हळूहळू मंदावत चालली होती. पण ते लोकांचं . बन्सीकिशनच्या डोक्यातली गडबड मात्र हळूहळू वाढत चालली होती . गावाकडची मोकळी हवा . तो मित्रांबरोबर कडुनिंबाच्या झाडाखाली बसला होता. बाजेवर हवा खात . पलीकडे पोरंटोरं खेळत होती . मित्र काहीबाही सांगत होते. वात्रट बोलत होते ,एकमेकांना टाळ्या देत होते. बन्सीकिशन मात्र अवघडला होता. तो कसंनुसं हसत होता. तो वाट पाहत होता ... सुहागरातीची ! तिच्या घरचे बोलणी करायला आले होते . एकतर अलीकडे मुलगी मिळायची मुश्किल . तशात एवढी सुंदर मुलगी ! ...

आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 17/05/2024 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
“एकटं मन वैरी असतं “ असं म्हणतात,पण आज माझ्या एकट्या मनात जे विचार सुचले, ते माझ्या मनाला पटणारे वाटले.ते असे, “मला असं वाटतं की, आनंदी न राहता मजा करण्यात काही अर्थ नसतो. आनंदी लोक आशावादी असल्यामुळे उत्तम जीवन जगतात. माझं एक आवडतं म्हणणं आहे आनंदी लोक निरोगी असतात. मला असं वाटतं की, आनंदी राहिल्याने बरंच काही मार्गस्थ करता येतं. जीवनाचा उद्देश काय आहे असा प्रश्न बहुतेकांना पडतो.जेव्हा मी वेगवेगळ्या मूडमध्ये असतो, तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला वाटतं की जीवन व्यर्थ आहे.

निसर्गरम्य शांतता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 16/05/2024 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी मी शेतात खूप काम करत असे. चोहीकडचा परिसर म्हणजे अर्थात निसर्ग असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आता ह्या वयात त्या परिसरात अनुभवलेल्या गोष्टींची आठवण येऊन निसर्गाबद्दल थोडंफार लिहावं म्हणून केलेला हा प्रयत्न. मला वाटतं निसर्गाचं सामर्थ्य अफाट आहे. मी निसर्गाच्या आपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेचा संदर्भ देत नाही, तर उलट - त्याच्या ठीक करण्याच्या,बरं करण्याच्या शक्ती, बद्दल म्हणत आहे. सूर्यप्रकाशात भिजणं आणि ताज्या, शुद्ध हवेत श्वास घेणं यापेक्षा मनाला आणि शरिराला आरामदायक, सुखदायक करणारं दुसरं काहीही नाही.

कबूतरावरचं असंही एक पुस्तक

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 16/05/2024 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. माझ्या मुलीचं पाचवीचं हिंदी पुस्तक वाचताना एका पुस्तकाची माहिती मिळाली. उत्सुकता वाटली म्हणून हे पुस्तक विकत घेतलं आणि लवकरच वाचूनही झालं. अमेरिकन बाल साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेलं आजवरचं एकमेव भारतीय लेखकाचं पुस्तक! धान गोपाल मुकर्जींनी लिहीलेलं 'गे-नेक: द स्टोरी ऑफ अ पिजन!' 'गे-नेक' पिजन म्हणजे रंगीत मानेचं कबूतर आणि हे पुस्तक म्हणजे ह्या कबुतराची कहाणी! १९२५ मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या समृद्ध भावविश्वामधील प्रत्यक्षातील अनुभवांचं वर्णन आहे. आज आपण "त्या काळापासून" खूप दूर आलो आहोत.