सद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा!
तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात?
तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात?
सालस आणि आज्ञाधारक आहात?
आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे?
तर मग आजच सावध व्हा!
ते कौतुक यासाठी आहे की तुम्ही तसेच सद्गुणाचे पुतळे राहावे म्हणजे जग तुमचे शोषण करू शकेल!
तुमच्या अंगात ठाण मांडून बसलेला हा सद्गुणाचा पुतळा निर्धाराच्या घट्ट दोरखंडाने बांधा, एका भक्कम लोखंडी पेटीत टाका, पेटीला भलेमोठे इच्छाशक्तीचे लोखंडी कुलूप लावून ती पेटी हेलिकॉप्टरमधून मिसाईलला बांधून समुद्राच्या मध्यभागी खोल तळाशी भिडेल इतक्या जोरात फेकून द्या आणि चाबी वितळवून टाका.
मिसळपाव
पिरॅमिड चौक .