Skip to main content

एक ट्रेक ---- झपाटलेला (भाग १)

लेखक अमर विश्वास यांनी शुक्रवार, 09/06/2017 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
वीस वर्षापुर्वीची गोष्ट आहे.. 1995 च्या डिसेंबरची एक रात्र,, साधारण आठची वेळ... स्थळ : आनंद नगर मधला एक फ्लॅट... चार मित्र कोंडाळ करून बसले आहेत.. कुणीच काही बोलत नाही... प्लॅंचेट वगैरे काही नाही.. तसाही माझा असल्या गोष्टींवर विशवास नाही.... हो.. पण आधी आमची ओळख करून देतो.. आम्ही चौघ... विन्या, सुन्या, मन्या आणि मी म्हणजेच अम्या किंवा अमर्या किंवा.. जाउदे सगळीच टोपणनावे सांगण्यासारखी नाहीत. चौघही इंजिनियरिंगचे विद्यार्थी. परिक्षा, व्हायावा नुकत्याच संपलेल्या.. त्यामुळे श्रमपरिहार करायला आम्ही एकत्र जमलो होतो. या सुट्टीत काय करायचे हाही विषय होताच. च्यायला..

एक भुताचा अनुभव

लेखक खट्याळ पाटिल यांनी शुक्रवार, 09/06/2017 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : लेखा चा उद्देश अंधश्रद्धा ला खतपाणी घालणे नाहि. तेव्हा मी महाविद्यालय मध्ये शिकत होतो तेव्हाची हि माझी गोष्ट आहे. पहाटे लवकर उठून व्यायाम शाळेत जाण्यासाठी मी माझे गजराचे घड्याळ एक तासाने पुढे करून ठेवत असे, जेणे करून ५ वाजता गजर वाजला तर मी ४ वाजताच उठून एक तास अभ्यास करून फ्रेश होऊन मग ५ वाजत व्यायाम शाळेत जाईल असा होता. सकाळी लवकर ४ ला उठणे खूप जिकरीचे आणि अवघड वाटे म्हणून हि खटाटोप केली होती. असो, त्या दिवशी पण मी नेहमी प्रमाणे ५ वाजताचा गजर वाजताच उठलो, पण आदल्या रात्री मित्रांसोबत चिवडा खात खात खूप खमंग भुतांच्या गप्पा मारल्या होत्या.

निव्वळ गर्दी

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 09/06/2017 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : पुण्यातील रेसकोर्स काळ : १९७१-७२ दरम्यानचा एक दिवस प्रसंग : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची जाहीर सभा त्यावेळी मी शालेय विद्यार्थी होतो. १९७१ च्या भारत-पाक युद्धात आपण विजयी झाल्यानंतर काही काळाने इंदिराजींची जाहीर सभा तेथे आयोजित केली होती. आपल्या पंतप्रधानांना पाहणे हे एक जनतेचे जबरदस्त आकर्षण असते. त्यामुळे सभेला तोबा गर्दी झालेली. एवढी प्रचंड गर्दी अनुभवण्याचा तो माझ्या आयुष्यातील पहिला प्रसंग होता. त्या गर्दीत आम्ही लहान भावंडे एकमेकांची बोटे घट्ट धरून आमच्या पालकांसमवेत तेथे वावरत होतो. सुमारे तीन तास आम्ही तेथे घालवले असावेत.

फिक्सींग

लेखक रघुनाथ.केरकर यांनी गुरुवार, 08/06/2017 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
राजा: हळु रे .... कित्या इतको राग काढतय... शिवा: मेल्या तुका आदी मी वळखाकच नाय मरे.... राजा: सांगतय काय...? तेवाच मायझया ह्यो वाकर काढलय मानेर शिवा : सॉरी सॉरी हा.... चुकान झाला रे.... राजा: मेल्या भगभगता कसला.... कितकी ती धार काढलय शींगांका. येक दिवस शाप झरान जातली. इतक्यात शिवा ने जोर कमी केला. राजा बैल अजुन तसाच मस्तक रेटत शिवा बैलाला पुढे ढकलत राहीला. दोन्ही बैलांचे मालक हातात कासरे धरुन झुंज बघत होते.

त्या तिथे, पलीकडे... टेकाडे

लेखक सरनौबत यांनी गुरुवार, 08/06/2017 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा भरायच्या एक-दीड तास आधी घरून निघणारी 'इंटरनॅशनल स्कूल' ला जाणारी मुलं पाहिली कि आपला 'बालपणीचा काळ किती सुखाचा' होता ते जाणवतं. पुण्यात एरंडवणे भागात बालपण गेलं. शाळा सायकलने ५ मिनिटे आणि कॉलेज १५ मिनीटांवर. अर्थात शाळा, कॉलेज, ऑफिस इ. गोष्टी घरापासून अगदी जवळ असणारे इतरही अनेक भाग पुण्यात आहेत. मात्र ह्याचबरोबर अजून एक ठिकाण ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. ते म्हणजे माझी लाडकी 'हनुमान टेकडी'. कर्वे रस्त्यासारख्या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यालगत हे एक अदभुत जग वसलेलं आहे. अगदी लहानपणी आमच्या सोसायटीतल्या ठाकूर काकांबरोबर आम्ही सगळी लहान मुलं संध्याकाळी टेकडी वर जायचो.

३-१३ आणि १७६० .......

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 08/06/2017 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्लेमर =====> खालील लेख हा निव्वळ टाईमपास म्हणून लिहिला आहे. आमच्या एका गुरुंच्या कृपेने, आम्ही बर्‍याचदा (खासकरून शनिवारी रात्री) सुक्ष्मात जातो. गेली ३०-३२ वर्षे गुरु शोधण्याची खूप पराकाष्ठा केली. सुरुवातच फार दणक्यात झाली. आमच्या काकांच्या कृपेने घरात बाटलीबंद गुरु बरेच असायचे. काळ्या कपड्यातला चालणारा जॉनी, लाल कपड्यातला चालणारा जॉनी, पांढरा घोडा, सोनेरी गरूड हे त्यापैकीच. तसे हे सगळेच गुरु उत्तम पण हे रोज-रोज भेटायला आम्हाला भेटत नाहीत.असो..... पुढे लंडन मधील पिल्सनर येथे राहणार्‍या गुरुंची ओळख झाली.

'विश्वास'कार श्वेता भट्टड : मुलाखत भाग १ (पर्यावरण दिनानिमीत्त)

लेखक मंजूताई यांनी गुरुवार, 08/06/2017 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गायण मंडळाच्या मार्च महिन्यात सभेला परगावी असल्यामुळे जाता आलं नाही व उपस्थित मंडळींकडून कळलं की एक अफलातून काम करणार्‍या महिलेशी ओळख झाली व तिच्या कामाचा परिचय झाला. कलेच्या माध्यमातून ती समाजजागृती, समाजसेवा करते एवढंच जाणून घेतलं,जास्त खोलात न जाता , उत्कंठा दाबून ठेवत. नागपूरल्या परतल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊनच तिच्या कामाची सविस्तर माहिती घ्यायचं ठरवलं. कोर्‍या पाटीने भेट घ्यायला तिच्या घरी पोचले अन अवाकच झाले. एकतर आपल्या मनामध्ये एखाद्या समाजाविषयी आपले पूर्वग्रह असतात, ते मोडीत निघाल्याने अन दुसरे म्हणजे तिचं धारिष्ट्य!

पेने पास्ता इन व्हाइट सॉस

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी बुधवार, 07/06/2017 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
या रविवारी काय करायचं ? काय करायचं असा विचार करत असताना “पेने पास्ता इन व्हाइट सॉस ” करावा असं एकमत झालं . म्हणजे मत बायकोने व्यक्त केलं , त्याला मी आपली मान्यता दिली. (न देऊन सांगतो कुणाला बापडा ?) . तर असो पेने पास्ता .... “पेने पास्ता इन व्हाईट सॉस” हे खरं तर एक अत्यंत राजेशाही अन “ईत्मिनाsssssssन से” असं बनवायचं व्यंजन आहे. भरपूर प्रमाणात चीज , दुध , भाज्या वगैरे. त्यामुळे डायेट वगैरे पाळणाऱ्या अभाग्यांनी याच्या वाटेला जाऊ नये . (आधीच सांगितलेलं बरं ... ) तर पास्ता हे एक इटालियन व्यंजन असून , फार मसालेदार वगैरे नसतं. त्यामुळे कोणत्याही ऋतू मध्ये हे तुम्ही बनवू शकता.

तूरडाळ टंचाई

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी बुधवार, 07/06/2017 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
तुरडाळ शेतात पिकली अन बाजारात येऊन भडकली कोण लागणार तिच्या नादी तशी ही स्वस्त नव्हती कधी गिऱ्हाईक नुसतेच लांबून जाई भाव विचारण्याची सोय नाही फोडणीशिवायच तडतडू लागली व्यापाऱ्यांची फाटू लागली तरीही मख्ख व्यापाऱ्यांनी साठेबाजी चालूच ठेवली सरकारने डाळीला मुक्ती दिली पण फक्त गोदामे बदलली अधिकाऱ्यांची चंगळ झाली सामान्यांची कोंडी वाढली मोर्चे, आंदोलने करुनही सरकार घट्ट बसून राही वरण भातालाही जनता महागली समोर दिसेल ते मुकाट खाऊ लागली आता भाव पाहत नाहीत जमले तरीही घेत नाहीत इतर डाळींची खिचडी करून सामान्यांनी भूक भागवून घेतली
काव्यरस

नवी पा.कृ.: ब्रह्माण्डाचे ऑम्लेट

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 07/06/2017 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
नका डोळयांसी वटारू | नका काना॑सी टवकारू शीर्षक योग्यची "पा.कृ."| वाटे जरी अस्थानी प्रथम ब्रह्माण्ड फेटावे | स्थल-काल कुपीत ठेवावे चांदण-चुऱ्याचे लवण घालावे |चवी पुरतेच फेटणी अणु-गर्भाचे सोलीव कांदे | (बारीक चिरायचे वांदे) फोडुनी तयांची पुष्ट दोंदे |ढकलावे फेटणी आदि-स्फोटाचा अग्नी पेटवा |आकाश-गंगेचा चढवा तवा तेजोमेघांचे तेल उडवा |दोन थेंबुटे त्यावरी फेटण त्यावरी हळू ओता | गुरुत्व-कालथ्याने अरता-परता ऑम्लेट होईल बोलता बोलता |कल्पांता पर्यंत या पा.कृ. चे प्रकाश-चित्र | देखू न शकती चर्म-नेत्र म्हणोनी तिचे रेखा-चित्र | सत्वर टाकावे कुणीतरी