Skip to main content

वेगातला बदल – वाढता (त्वरण) वा घटता (मंदन) (Acceleration and Deceleration)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी सोमवार, 24/07/2017 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
घनदाट जंगल, कीर्र अंधार, श्वापदांच्या हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या आरोळ्या, शिकार होणाऱ्यांच्या आर्त किंकाळ्या, जंगली पाणवठ्यावर पाणी पिण्याचे आवाज सारं मागं जात होतं पण विक्रमाचे मन मात्र वारा पिलेल्या घोड्याप्रमाणे विचारांच्या मागे धावत सुटले होते. हे वेताळाचे प्रश्न एकातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्याच ठिकाणी घेऊन जात होते. “काय राजा आज पुन्हा आलास सज्ज होउन आपल्या कोड्यासाठी? तर मग ऐक. मागील एका प्रश्नात मी तुला सर्वाधिक वजनाचा गोळा ठरविण्यास सांगितले होते. आता हाच गोळा घेऊन तू एका जादुई प्रदेशात गेलास. तिथे जमीन सर्वत्र गुळगुळीत आहे. हवा एका दिशेनेच वाहते. बाकी कोणतीही बले कार्यरत नाहीत.

पावसाळी पिकनिक

लेखक फुंटी यांनी सोमवार, 24/07/2017 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी पिकनिक हिरवाईच फ्याड धबधबे, डोंगर चिकन,भुजिंग , पोरींची परमिशन असेल तर दारू पोरी भिजलेल्या जाकीटातल्या खेड्यातली उघडीनागडी पोर त्याशिवाय कारुण्याचा टच नाही आमच्या फिलिंग ओवसमला... वरती अवसान न्याचरल अपलोडिंग ..... ट्याग कर रे मला ... सत्राच लाईक अजून..... शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....

श्रावणसाद

लेखक Swapnaa यांनी सोमवार, 24/07/2017 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणसाद ~~~~~*~~~~~ वर्षभर सोसून, उन्हाचे चटके, अवनी होरपळून, उष्मात निजते, हस्त जोडून, निसर्ग अभिषेक, मुक्त करेल, वेदना व्याकूळ, स्वागत श्रावणाचे, साद मखमली, श्रावण पाळे, साक्ष इंद्रधनू, सृजन सोहळा, वसंत नाचे, कवी- स्वप्ना..

चित्रपट परिक्षण : डंकर्क

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 24/07/2017 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
शक्यतो मी इंगजी चित्रपट कमी पाहातो. पण तोच जर ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक असेल तर मी जरुर पाहातो. असाच मागच्या आठवड्यात डंकर्क चित्रपट पाहाण्याचा योग आला आणि माझा वेळ आणि पैसा वसुल! हा चित्रपट दुसर्‍या महायुध्धातील एका सत्यकथेवर आधारित आहे. जर्मनी च्या नाझी फौजानी फ्रान्सच्या समुद्र किनार्‍यावर ब्रिटिश आणि फ्रेन्च फौजांना जमीन , वायु आणि समुद्र या सर्व ठिकाणाहुन प्रचंड हल्ले करुन सळो की पळो करुन सोडले असताना हे मित्र देश कसे आक्रमणातुन वाचतात आणि हजारो सैनिकांचे जीव कसे वाचवले जातात याचे सुन्दर चित्रण या चित्रपटात आहे.

लहानपण देगा देवा!

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 24/07/2017 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।। तुकाराम महाराजांच्या या अभांगाच्या पहिल्या दोन ओळी अनेक मोठी माणसे म्हणताना आपण बघतो. विशेषतः जेव्हा जुने मित्र-मैत्रिणी भेटतात त्यावेळी जुने दिवस; लहानपणच्या आठवणी जागवल्या जातात; तेव्हा हमखास परत एकदा लहान व्हावं असं आपल्याला वाटतं. किंवा मग कामाचा, भावनांचा खूप भार होतो तेव्हा या जवाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन परत एकदा लहानपणच निरागस आणि जवाबदारी नसणार आयुष्य जगावं असं वाटतं. पण आपल्याला खरंच आपलं लहानपण हव असत का? की फक्त त्यावेळचा निरागसपणा आणि जवाबदारी नसणं जास्त भावत? आज आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या निर्णयासाठी कोणावरही अवलंबून नाही आहोत.

मला भेटलेले रुग्ण - २

लेखक डॉ श्रीहास यांनी सोमवार, 24/07/2017 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला भेटलेले रुग्ण त्या बाईंच्या चेहेऱ्यावर ईतकं मोठं प्रश्न चिन्ह होतं की प्रश्न छोटा पडावा !! बाई : डॉक्टर हा दमा नाही म्हणून सांगा (बोलतांनाही दम लागतोय ) मला दमा नकोय हो.... मी : अहो तपासणी तर करू द्या ना , मगच ठरेल दमा आहे किंवा नाही ... आणि १००% आटोक्यात आणू तुमचा त्रास .. बाई : मला ते inhaler वगैरे काही नको नुसत्या गोळ्या औषधी द्याल हो... (परत दम लागतोय) मी : बरं बघू ,रिपोर्टस् आल्यावर ...

गटारी स्पेश्यल : अ‍ॅबसिन्थ - एक हरिताप्सरा

लेखक सुनील यांनी सोमवार, 24/07/2017 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक श्वान आणि एक कच्छप वगळता सांप्रत काहीही पाळत नाही, श्रावण तर दूरची गोष्ट. सबब, "गटारी" साजरी करण्याचे काहीही कारण असण्याची आवश्यकता नाही, नसावी. तरीही "गटारी" साजरी होतेच! म्हणजे कसं आहे की, आपण चवथीला मोदक किंवा होळीला पुरणपोळी खातो ती काय त्या दिवसांनतंर बराच काळ मोदक वा पुरणपोळी खायला मिळणार नाही म्हणून नव्हे, तर एक रिवाज म्हणून. तसेच माझ्या "गटारी"चेही! एक रिवाज म्हणून साजरी करायची. खेरीज, यंदा खास आकर्षण होते ते म्हणजे - अ‍ॅबसिन्थ. चेक रिपब्लिकमध्ये बनलेले हॅप्सबर्ग अ‍ॅबसिन्थ.

फ्यूज

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 24/07/2017 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
मरणाची थंडी पडली हुती. म्या श्याल गुंडाळून चौकीवर गेलो. इनस्पेक्टरला म्हणलं मर्डर झालाय लवणावर. मग त्यनं गाडी काढली. फटफटी. दोघंच निघालो लवणावर. लय रात झालती. त्यो म्हणला, फुकणीच्या कुठं झालाय मर्डर? म्या म्हणलो, फुलाच्या खाली. मग त्याला घेऊन खाली गेलो. एक बाई पडली हुती तिथं नागडी. म्या ब्याटरी मारून त्यला दाखवलं. बघ म्हणलं. त्यो म्हणला, रेप झाला का हिच्यावर? म्हणलं, कुणाला म्हाईत. त्यो म्हणला, तुला कसं कळलं? म्या म्हणलं, लिंबं आणायला गेलतो. ही दिसली फुलाखाली जाताना. बघितलं तर ह्ये आसं. मग त्यानं ब्याटरी मारून नीट तिला बघितली. टकुरं फुटलं हुतं. नुसतं रगात.

लेडी-ओरियेंटेड चित्रपट

लेखक पिशी अबोली यांनी रविवार, 23/07/2017 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
सेन्सॉर बोर्ड जेव्हा एखाद्या चित्रपटाची जातीने जबाबदारी घेऊन प्रसिद्धी करतं, तेव्हा एरवी कुठेतरी फेस्टिवल्समध्ये वगैरे अडकून पडू शकला असता असा चित्रपटही जवळच्या थियेटरला लागला का, हे आवर्जून बघितलं जातं. तसा तो बघितला, आणि ‘फिलिंग फास्ट’ असल्याने लगेच तिकीट घेऊन टाकलं. तरीही चित्रपटगृहात एवढी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं.. पूर्ण भरलेल्या चित्रपटगृहात ‘ए’ रेटिंगवाला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ बघण्याचं धाडस केलं, तर आता लिहिण्याचंही करूनच टाकावं म्हणते. एका वाक्यात कथा सांगायची, तर चार स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यातून आलेलं आत्मभान हा या चित्रपटाचा विषय.

ये कश्मीर है - दिवस नववा - १७ मे (अंतिम भाग)

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 23/07/2017 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमचा काश्मीरमधला शेवटचा दिवस. आमचे परतीचे विमान ११:५५ ला होते, तेव्हा लवकर उठायची काही गरज नव्हती. आम्ही आरामात उठलो. हाउसबोटीतला आमचा शेवटचा चहा घेतला आणि सज्ज्यात बसून सरोवरात येजा करणारे शिकारे न्याहाळत बसलो. श्रीनगरमधले आमचे सगळे मुक्काम हाऊसबोटींमधेच होते. आतमधे असलेल्या सजावटीमधे अधिक-उणे असले तरी आम्ही राहिलेली प्रत्येक हाऊसबोट सुंदरच होती. आमची आजची हाऊसबोट देखील साधी असली तरी कमालीची आकर्षक होती.