Skip to main content

मोरया

लेखक रवि बदलापूरेकर यांनी गुरुवार, 31/08/2017 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
मोरया मोरया मोरया ओमकारा मोरया मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया भरली सुखाची ओंजळ बाप्पा तुझ्या आगमनाने, जाहलो मी धन्य देवा तुझ्या दर्शनाने तू गजराज, तूच गणनायक तू विघ्नहर, तूच विनायक, तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता मोरया तू मंगलमूर्ती मोरया तू दिसे सारे ब्रह्मांड तूज नयनी वसे चारीधाम तूझ्याच चरणी, चराचरातील रूप तुझे देई भक्तांना दर्शन आपुले चुका भक्तांच्या घेई तू उदरा येता शरण देई तूच आसरा, धरी तू छताची सुख सावली अशी तू माझी माय माउली आला सोडूनी तू कैलास सोबतीला तुझ्या मुषकराज, कसे थांबवू सांग तुला तू आईबाबांचा बाळ सुकुमार तू तू गजराज, तूच गणनायक तू विघ्नहर, तूच विनायक, तू सुख
काव्यरस

बाप्पाचा नैवेद्य : आमरसाच्या सांजोर्‍या

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 31/08/2017 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना गेणेशोत्सावाचा हार्दिका शुभेच्छा!! घरोघरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले आहे आणि त्यांच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ बनवले जात आहेत. मीसुद्धा अशीच एक पारंपारीक पाककृती बाप्पांसाठी येथे देत आहे.

कडबू

लेखक गम्मत-जम्मत यांनी गुरुवार, 31/08/2017 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
कडबू हा पदार्थ आमच्याकडे पुराणपोळ्यांसह गौरीच्या जेवणाला करतात. म्हणजे साधारण पणे पश्चिम महाराष्ट्रातला नेहमीचा मेनू.. पुपो, कटाची आमटी, वरणभात , लोणकढं तूप, काकडीची गोडसर कोशिंबीर, बटाटा भाजी, मटकीची उसळ, कुरडया सांडगे वगैरे.. यात पुपो करायचा कुणा गृहिणी ला कंटाळा आल्याने कडबू चा शोध लागला असावा असं माझं लॉजिक!!