Cheesy Hashbrown अर्थात बटाट्याचे थालीपीठ
माझ्या बाबतीत नेहमी घडणारी गोष्ट म्हणजे नाले साठी घोडा खरेदी... कुणी तरी घरी येणार म्हणून कोणत्या तरी सँडविच साठी घरी cheese इटालियन हर्ब्स, चिली फ्लेक्स अशा आणलेलं होत, अर्थात सँडविच न बनवता बुर्जी पाव खाल्ल्याने हे सर्व फ्रिज मध्ये शोभिवंत होऊन पडलं. त्याचा सदुपयोग करण्या साठी हि पाकृ केली.
(मी ऋजुता दिवेकर ची पंखी असल्याने ब्रेड, बिस्कीट घरी दुर्मिळ!! त्यामुळे ब्रेड का नाही आणला हा प्रश्न बाद!!
जगण्यासाठी पुरेसे
भूतकाळाला निरोप देवून ,भविष्याकडे वाटचाल कर
सारे कटू अनुभव सोडून, प्रकाशाची वाट धार
विषारी अशा भूतकाळाला, पाण्यामध्ये बुडवून टाक
दंश करण्या भविष्याला, संधी त्याला देवू नको
भूतकाळ चांगल असो वा वाईट, त्याला परत आणता येत नाही
भविष्य असते आपल्या हातात, ही संधी गमवू नको
लोकांना दे सोडून नि, सोड त्यांच्या विचारांना
ते काय विचार करतात, याशी तुझे कर्तव्य नाही
तुझ्याबद्दल कितीही चुकीचे विचार असतील त्यांचे
पण स्वतःला चांगले ओळखणारा, तुझ्याशिवाय दुसरा कोण
लोकांच्या मनाचा ताबा घेण, अवघड निश्चितच असेल
पण स्वतःच्या मनाशी संवाद साधण, किती बर कठीण असेल
वेळ ही दवा आहे , प्रत्येक दु:खासाठी प्रत्येकाच्या
घड
नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं
नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं । अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ॥
तसा मी रोमॅंटीक वगैरे नाही, आणि नाही कधी वरील गाणे मन लावुन ऐकले किंवा पाहीले आहे. पण नभातुन वाहणारे मेघ जेव्हा माझ्या अंगावर आले तेव्हा ह्या गाण्याच्या ओळी उस्फुर्त पणे आठवल्या. काळ कितीही पुढारलेला असला तरी सार्वजनिक जीवनात प्रेमास्पद आणि प्रेमिका (पती पत्नी देखील) प्रेमभावनेची अभिव्यक्ति करणे जड जाते, हे आपल्या अंगवळणी नाहीये अजुन.कर्करोगाचा विळखा
कर्करोगाचे प्रमाण जगभर झपाट्याने वाढत आहे. यासंबंधी ‘यु.के.’ मधील एक मजेदार अहवाल वाचनात आला.
२०१५ मध्ये त्या देशात ७०,०००हून अधिक नवीन निदान झालेले कर्करोगी आढळले होते. हा आकडा नक्कीच धक्कादायक आहे.
खिडकी
चार कोनांची, सुरक्षेसाठी बाहेरून लोखंडी ग्रिल लावलेली आणि पारदर्शकतेसाठी काचेची स्लायडींग असलेली, हवा आत बाहेर खेळवणारी अशी खिडकी आपल्या घराचा एका अर्थाने श्वासच असतो. अर्थात प्रत्येक घराच्या खिडक्या वेगवेगळ्या आकाराच्या, काचेच्या, लाकडाच्या, ग्रिलच्या असतात. हॉल बेडरूम च्या खिडक्यांवर आकर्षक पडद्यांची सजावट करून खिडकीला आकर्षक पोषाख दिला जातो त्याने खिडकीच्या सौंदर्य अधिक खुलून दिसते. हल्ली ग्रिलमध्ये झाडे लावूनही खिडकीला बगिच्याच रूप दिल जात. मग हळू हळू ही खिडकी बाहेरील निसर्गातील जीवांनाही आपल्या कवेत घेऊन त्यांना आसरा देते.
राजांचे मावळे - १
घोडखिंड : खाशाबा
खाशाबाला वाटायला लागलं की छातीचा भाता आता फुटतो की काय, त्याला आठवतच नव्हतं की पळायला सुरुवात करून किती तास झाले होते ते. चन्द्र काही कामाचा नव्हता कारण पावसाने धिंगाणा चालवला होता. हातातले पलिते विझत होते ते परत पेटवायला लागत होते. भाला पकडून पकडून हाताची बोट सरळ व्हायची विसरली होती, ढालेने पाठ धरली होती नि तलवार कमरेला खुपत होती. हा सगळा विचार मनात चालू असतानाच बाजींनी थांबण्याचा संकेत दिला. राजांच्या पालखीचे भोई दमले होते.
माझी पहिली अहीराणी कविता
बठा चालना गयात
ज्या वट्टावर बठी बठी आमि भयाण गप्पा मारुतं
ज्या लाइंग न खांब खाले एक दुसरांनी टेस्ट लेउत
जो वट्टा झिजाई मन्या साऱ्या सुट्या खपी जाऐल शेतं
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
फोनवर कितलक बोलुत आमि ?, बीजी राहतस आणी बिलं बी येस
फेसबुक वर बी कितलक chat करुत , बोलणं कयस पण चेहरा याद येस
ऑनलाईन राहतस चोवीस तास, पण गावमा ऑफलाईन दीखेल शेत
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
सावन जाई बठेल शे दुसरा गावमा, तर मह्याना अभ्यास चालू शे
ननूनी MPSC नि तयारी , ते कुलदीपले चांगला जॉब शे
मी बी शे आपला काममा , पण डोया गाववर लागेल शेत
पण तो वट्टा
काव्यरस
'किनारा'यण!
एकदा एक बिनशिडाचं तारू भक्कम जहाजाचा आधार सोडून समुद्रात भरकटलं. मग तगण्याचा एकाकी प्रयत्न करू लागलं. त्यावर फक्त तिघे प्रवासी होते. प्रत्येकजण प्रचंड आशावादी, स्वाभिमानी! होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा! होडी भरकटत चालली तरी, हाच आपला मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण कि'नारा' गाठणार यावर मात्र तिघांचही एकमत होतं. अशातच समुद्र खवळला. वादळ उठलं. होडी हेलकावे खाऊ लागली. आता आपण काही तरत नाही, या भयानं तिघंही हादरले. लांबवर एक भव्य जहाज खवळलेल्या समुद्रातही संथपणे पुढे सरकत होते. तिघांनी त्याकडे पाहून हातवारे सुरू केले. शिट्ट्या वाजवल्या. 'आम्हाला वाचवा' असा आक्रोशही सुरू केला.
उरले जगणे, मरणासाठी !
परवा एसटीच्या मुंबई सेंट्रल ऑफिसात एका मित्राला भेटायला गेलो होतो. खूप गप्पा मारल्या, आणि निघालो.
बाहेर पॅसेजमध्ये लवाटे भेटले.
तोच उत्साह, तीच घाई, तोच, काहीतरी शोधणारा चेहरा आणि तीच भिरभिरती नजर...
मला समोर पाहून दिलखुलास हसले. आणि पिशवीत हात घातला. एक कागदाचं भेंडोळं समोर धरलं.
हा नवा पत्रव्यवहार... ते उत्साहानं म्हणाले, आणि मला, दोन वर्षांपूर्वी भेटलेले लवाटे आठवले.
तेव्हा माझ्या ऑफिसात त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर खूप अस्वस्थता आली होती.
मग एक लेखच तयार झाला, आणि त्यावर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला.
परवाच्या भेटीमुळे तो लेख पुन्हा आठवला
उरले जगणे, मरणासाठी...
‘‘नमस्कार. मी लवाटे.
मिसळपाव