लेखकडॉ सुहास म्हात्रेयांनी शुक्रवार, 29/09/2017 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
हिरवाईच्या गप्पा - भाग १
हिरवाईच्या गप्पा - भाग १ बराच मोठा झाल्याने हा दुसरा भाग सुरू करत आहे.
काही दिवसांपूर्वी पडून गेलेल्या पावसामुळे मिरचीला नवीन फुलोरा सुरु झाला आहे.
लेखकऔरंगजेबयांनी शुक्रवार, 29/09/2017 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,
आज सकाळची बातमी आपल्या सगळ्यांनाच हलवून गेली आहे. २२ बळी! आणी अनेक जखमी. परेल-एलफिंस्टनचा ब्रिज म्हणजे साक्षात यमाने टाकलेला फासच होता आज.
मुळात ही दोन्ही स्टेशन्स ब्रिटिशकालीन आहेत. सदर पूल हा सुद्धा खूप जुना आहे. या दोन्ही स्टेशनचा फलाट आपण बघितला तर तो आयलंड प्लॕटफाॕर्म आहे. ( परेल ला तर आहेच आहे) अशा परिस्थितीत दोन्ही फलाटांवर गाड्या आल्या तर पुलावर खूपच गर्दी होते.
त्यात आज पाऊस होता. त्यामूळे लोकं पुलावरुन हललेच नाहीत. पुलाचा पत्रा तुटला. त्याचा मोठ्ठा आवाज झाला. आणी मग पळापळी सुरु झाली. त्यात लोकांचा चेंगरुन जीव गेला.
रेल्वेचा हा गलथानपणा आहेच.
लेखकशब्दानुजयांनी शुक्रवार, 29/09/2017 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 (http://www.misalpav.com/node/40857)
भाग 2 (http://www.misalpav.com/node/40953)
आॉस्टिनामधली गुप्त बैठक संपवुन मायकल कॉर्लिगला परतला. नव्या धर्माची घोषणा करण्याआधीची संपुर्ण वातावरण निर्मीती झाली होती. ब-याच लोकांच्या मनात आपण कॉर्लिगचे पुरते तारणहार बनलो आहोत हे मायकलने चाचपुन पाहिले होते.
मायकलला भेटणा-या लोकांचा अोघ वाढतच जात होता. व्यवसायिकांशिवाय सामान्य लोक येऊन आता मायकलला काहीतरी करण्यासाठी गळ घालत होते. एकंदरित मायकलच्या मनासारखे घडून येत होते.
लेखकसावत्यायांनी शुक्रवार, 29/09/2017 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांच्या विविध सायकल मोहीम वाचून खरंतरं खूप आधीचं धागा काढायचं ठरवलं होतं. पण या ना त्या कारणाने राहून जायचं. पण मोदक यांच्या बाईक सवारीमध्ये कन्याकुमारी वाचलं आणि थोडासा (बराचसा) भूतकाळात गेलो.
साधारण १९९७ ला नुकतंच कॉलेज संपलं होतं आणि मी बेकार बसलो होतो घरी. नाही म्हणायला १५-२० दिवसांचे १-२ जॉब्स केलेत पण नीट काही जमलं नाही. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्या दरम्यान माझ्या कॉलेज मधल्या ज्युनिअरचा फोन आला. ते ७-८ जण मिळून मुंबई ते कन्याकुमारी 19 दिवसांची सायकल मोहीम करणार होते जानेवारीमध्ये . येणार का म्हणून विचारलं. मी सहज हो म्हटलं. खरी पंचायत पुढे होती.
लेखकसावत्यायांनी शुक्रवार, 29/09/2017 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांच्या विविध सायकल मोहीम वाचून खरंतरं खूप आधीचं धागा काढायचं ठरवलं होतं. पण या ना त्या कारणाने राहून जायचं. पण मोदक यांच्या बाईक सवारीमध्ये कन्याकुमारी वाचलं आणि थोडासा (बराचसा) भूतकाळात गेलो.
साधारण १९९७ ला नुकतंच कॉलेज संपलं होतं आणि मी बेकार बसलो होतो घरी. नाही म्हणायला १५-२० दिवसांचे १-२ जॉब्स केलेत पण नीट काही जमलं नाही. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्या दरम्यान माझ्या कॉलेज मधल्या ज्युनिअरचा फोन आला. ते ७-८ जण मिळून मुंबई ते कन्याकुमारी 19 दिवसांची सायकल मोहीम करणार होते जानेवारीमध्ये . येणार का म्हणून विचारलं. मी सहज हो म्हटलं. खरी पंचायत पुढे होती.
लेखकदुर्गविहारीयांनी शुक्रवार, 29/09/2017 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्नर तालुका म्हणजे प्रचंड टोलेजंग शिखरांचे भरलेले संमेलनच जणु. यात काही दुर्ग आहेत, पर्वतांचे पोट पोखरून तयार केलेली काही लेणी आहेत.नाणेघाटासारखे प्राचीन घाटमार्ग आहेत, कुकडेश्वरासारखी जागती देवालये आहेत, तर कड्याकपार्यात वसलेले लेण्याद्री पर्वतात वसलेले अष्टविनायकापैकी एकमेव स्थान आहे.
लेखकट्रेड मार्कयांनी शुक्रवार, 29/09/2017 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांचे (मुलगा आणि मुलगी दोन्हीचा यात समावेश आहे) डीएनए त्यांच्या जैविक मातापित्यांशी जुळतात हे विज्ञानाने सिद्ध झालेले आहे. त्यातही एखाद्या वेळेस पिता कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्ट लागेल पण जन्मदाती आई तर कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्टची सुद्धा गरज भासू नये.
पण लिडिया फेअरचाईल्ड नावाच्या एका आईच्या बाबतीत एक अविश्वनीय घटना घडली. तिला २ मुले होती आणि तिसऱ्या वेळेला ती गर्भवती असताना तिने आणि तिच्या नवऱ्याने घटस्फोट घ्यायचे ठरवले. कोर्टाने मुलांच्या पालनपोषणाचा हक्क ठरवण्यासाठी आई वडील आणि मुलांची डीएनए टेस्ट करायचे आदेश दिले.
लेखकआदित्य कोरडेयांनी गुरुवार, 28/09/2017 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज लताचा ८८वा वाढदिवस. ह्या निमित्ताने मागे मराठी पिझ्झावर लिहिलेला लेख परत इथे टाकत आहे.
लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका!
लता मंगेशकरला सर्वश्रेष्ठ गायिका मानणारे असंख्य लोक आहेत म्हणून मग लताला शिव्या घालणारे हि काही लोक आहेत. मी लताचा भयंकर चाहता असलो तरी अंध भक्त नाही. आणि लताची गाणी आवडतात म्हणजे इतर गायिकाकडे ढुंकूनहि पाहायचे नाही असले दळभद्री विचारसुद्धा माझ्या मनात येत नाहीत.बऱ्याचदा आपण चाहते लोक असाच सारासार विवेक हरवून बसतो आणि स्वतःची गोची करून घेतो असं मला वाटतं.