Skip to main content

एक्सपायरी डेट.

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 31/10/2017 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
रेशमी साड्यांच्या बासनात मोरपिशी साडीच्या घडीत अलगद ठेवलेलं, ते पत्र.. तिथून बाहेर नाही काढत कधी हलकेच चाचपडते अधूनमधून त्याचं तिथं असणंच पुरेसं आहे... त्यातला शब्दंशब्द पाठ आहे लिहून खोडलेला , पाण्याने पुसटलेला... किती मिनतवा-या. हट्ट, रुसवे फुगवे काय अन् काय हातानं लिहिलेल्या त्या एका कागदासाठी.. आपल्यामधे जे काही होतं नव्हतं, (नव्हतं तेच जास्त खरंतर) ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र... तू शिताफीने न लिहिलेलं तुझं नाव (ते तेव्हांही खटकलेलं थोडं) एका अधमु-या नात्याची एकमेव खूण.. का कोण जाणे पण आज अचानक वाटलं, हर रिश्ते की एक उमर होती है तशी, पत्राला पण एक्सपायरी डेट असते का?

काही कविता अशा..तर काही तशा! - भाग २

लेखक पद्मावति यांनी मंगळवार, 31/10/2017 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही कविता अशा..तर काही तशा...भाग १ काही कविता स्वप्नात जगतात, हलकेच हसतात, प्रेमात पडतात... काही कविता पटकन समजतात, चालीत बसतात आणि लयीत गातात! काही कविता शब्दांचे पोकळ डोलारे, बिन मूर्त्यांचे देव्हारे असतात भावनांचे उगाच कढ आणि ढसढसा ग्लिसरिनचे अश्रू सांडतात! काही कविता उन्मुक्त अवखळ आपल्याच मस्तीत तर काही नाकासमोर चालणार्या..

|| विठ्ठल अभंग ||

लेखक वैभवदातार यांनी मंगळवार, 31/10/2017 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मी लिहिलेला अभंग ... विठ्ठला रे विठुराया रे पूजितो मी तुला चातुर्मास समाप्त आजि आलो दर्शनाला ||धृ || सावळे सुंदर रूप गोजिरे पाहतो मी डोळा विटेवरी उभा हात कटेवरी तुळशीहार गळा ||१ || दामाजीसाठी तू महार होसी जनाबाई चे दळण दळसी तुकारामांच्या गाथा तू तारिसी संत सज्जनांचे रक्षण करिसी ||२ || कार्तिकी एकादशी वारी येई भक्त मंडळींना दर्शनाची घाई पांडुरंगा तुझी अर्धांगी रखुमाई विठुमाऊली तू जगाची आई ||३ || चंद्रभागा तरी स्नान जे करिती त्यांची सर्व दुःखे पापे नष्ट होती षड्रिपूंपासूनि मुक्त ते होती टाळ मृदुंगांचा गजर करिती ||४|| अठ्ठावीस युगे उभा विटेवरी दु

व्हेरिएशन-२ फुलवर/ फुलकोबी /कॉलीफ्लॉवर

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 31/10/2017 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ मध्यम कॉलीफ्लॉवरचा गड्डा बारीक गुच्छ काढलेला, कांदा (लिंबाएवढा छोटा), लसूण (४ मोठ्या पाकळ्या), आलं (१ इंच), १ शहाळ्याची मलाई (मॉर्निग वॉक ला जाताना मलईवाला नारळ घ्या, पाणी प्या, नारळवाल्याला मलाई पार्सल करून मागा) १ टीस्पून धने, १/२ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून मोहोरी, ४ दाणे मिरी, ४ दाणे मेथ्या, १ टीस्पून लाल मिरची पावडर, थोडी हळद (तुमच्या जजमेंटनुसार ), थोडं मीठ (तुमच्या जजमेंटनुसार ), कोथम्बीर गार्निशसाठी (तुमच्या जजमेंटनुसार ) फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १ कढीपत्त्याची डहाळी ============================================================== पूर्वकृती : एका उघड्या पातेल्यात (कॉलीफ्ल

तू!

लेखक OBAMA80 यांनी मंगळवार, 31/10/2017 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम तुज पाहता क्षणी काळजाचा ठोका चुकला प्रीतीच्या रंगात रंगूनी जीव माझा भुलला न दिसता तू जीव होई कासावीस दिसता क्षणी तू फिरे अंगावरी मोरपीस टाकावा तू प्रेमळ कटाक्ष लाभावा तुझा सहवास रहावीस तू मजसमीप हीच या मनीची आस जवळी असता तुला एकटक पहावस वाटत डोळ्यात माझ्या तुला साठवून घ्यावस वाटत मोहक तुझ्या हास्यान होई जगाचे विस्मरण मधाळ त्या शब्दांनी गळूनी पडे माझे मीपण तुझ्याविना रित माझे जीवन अपूर्ण भासे आयुष्याचे ईक्वेशन माझ्या आयुष्यात तुझ असण करील परिपूर्ण माझ जगण कविता ह

य मजा आणणारा फाफे!

लेखक हर्मायनी यांनी सोमवार, 30/10/2017 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
टॉक करत डोक्यातील विचारचक्रे फिरवणारा, लोकांच्या मदतीला धावून जाणारा, आपल्या हुशारीने गुंडाना, देशद्रोह्यांना पकडून देणारा हा सहावी-सातवीत भेटलेला हा सुपरटॅलेंटेड सुपरहिरो विदाउट सुपरपॉवर पुन्हा येतोय हे कळल्यावर पहिली प्रतिक्रिया होती अर्थातच टॉक!! नवरा देखील फाफे फॅन असल्यामुळे चित्रपट पाहायला जायचा निश्चितच होतं. मग पहिल्या दिवशीच जाऊन आलो. आपल्याला भेटलेला बन्या आता मोठा झालाय. आत्ताच्या पिढीतल्या कोणत्याही मुलाप्रमाणे तोही मोबाइल, इंटरनेटचा पूर्णपणे वापर करतोय. मेडिकलची प्रवेश परीक्षा द्यायला तो पुण्याला भा. रा. भागवतांकडे येतो.

बीबीसीआय ला जीआयपीचा डबा - रेल्वे ब्लूपर्स

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 30/10/2017 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपले दिग्दर्शक रेल्वेचे सीन्स दाखवताना अनेकदा तपशीलांकडे दुर्लक्ष करतात. एरव्हीच्या सहज जाणवणार्‍या अचाटपणापेक्षा हे थोडे वेगळे आहे. रेल्वे सीन्स मधे जर ढोबळ पणे एक गाडी दाखवत आहेत इतक्याच इण्टरेस्ट ने तुम्ही हे सीन्स पाहिलेत तर कदाचित काहीच खटकणार नाही. पण जरा 'रेल फॅन च्या नजरेतून' नीट पाहिलेत अशा सीन्स मधल्या तपशीलाच्या चुका लगेच जाणवतील आणि पटतील. काही वेळा खूप तपशीलात न शिरता सीन असतो. फक्त एका रॅण्ड्म गाडीच्या टपावरून. तेथे काही गोची असण्याची शक्यता कमी असते. काही जुन्या गाण्यांमधे डब्याच्या आतले सीन्स आहेत.

उजाडताना उल्कांचे व्रण

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 30/10/2017 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
शिवधनुष्य एका हाताने सहज उचलले भात्यामध्ये शब्दच होते, नंतर कळले कवितेच्या दरबारी नवशब्दांची मनसब मिळता कोठे झुकायचे ते नाही कळले शब्दप्रभूंना वाट विचारीत इथवर आलो शब्द कधी रक्तातच भिनले, नाही कळले पुन्हा पुहा मी अंधाराशी केली सलगी उजाडताना उल्कांचे व्रण शब्दच झाले
काव्यरस

यत्र यत्र फास्टर फेणे तत्र तत्र सन्कट येणे

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 30/10/2017 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
यत्र यत्र फास्टर फेणे तत्र तत्र सन्कट येणे बनेशच्या जिगरी दोस्त शरद शास्त्रीने म्हटलेली ही ओळ ह्या चित्रपटालाही तन्तोतन्त लागू पडते. मुळात फास्टर फेणेची कथा चित्रपट स्वरूपात मान्डणे हे मोठे धाडसाचे काम आहे. धाडसाचे अश्यासाठी की मध्यम वयीन आणि सत्तर ऐशीच्या दशकातील पिढीच्या डोळ्या मनात फास्टर फेणे ही व्यक्तीरेखा ठसलेली आहे त्यामुळे त्या व्यक्तीरेखेला जरा जरी धक्का लागला तरी हा प्रयोग फसण्याची भिती होती. तसेच हॅरी पॉटर च्या जमानातल्या नव्या पिढीला फास्टर फेणे ही व्यक्तीरेखा तितकीशी माहीत नाही. त्यामुळे ही व्यक्तीरेखा चित्रपटात उभी करणे हे मोठे धाडसाचे काम होते.