Skip to main content

वडोदरा,पावगढ-चंपानेर-३

शनिवार, 27/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
वडोदरा,पावगढ-चंपानेर-१ https://www.misalpav.com/node/52359 वडोदरा,पावगढ-चंपानेर-२ https://www.misalpav.com/node/52364 श्री क्षेत्र गरूडेश्वर भरपुर नाष्टा झाला होता. सहलीचा पहीला दिवस, उत्साह ओसंडून वहात होता. साधी वेषभूषा,कॅमेरा,दुर्बीण,मोबाईल घेऊन खाली पार्किंगमधे आलो.चालक वाट पहात होता. संभाषणाला वाचा फोडण्या साठी मी "जय श्रीराम", म्हणालो तर उत्तरादाखल तो "जय कुबेर",म्हणाला,हाडाचा गुज्जुभाई.

परबची अजब कहाणी---५

लेखक भागो
शुक्रवार, 26/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
परबची अजब कहाणी---५ ( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367) फ्रेनी, मी तुम्हाला सांगितले का? नाही? माझा बिल्डींग मटिरिअल सप्लाय करायचा बिझिनेस आहे. पोटापुरतं कमावतो. एक छोटसे ऑफिस आहे. त्या ऑफिसातच माझ्याशी संपर्क साधला गेला.

X/0 = ∞ ? !

गुरुवार, 25/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
अगाधा भागाया -शून्य माझ्यातले घेता- भेटी आले अनंतत्व अनंत जोखण्या - हाती मोजपट्टी नव्हती- हिंपुटी नाही झालो धून अनंताची झंकारली गात्री अनंताचा यात्री तेव्हा झालो

कृष्णाच्या गोष्टी-८

लेखक Bhakti
बुधवार, 24/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
*धर्मराज्य स्थापना देशात धर्मसाम्राज्य निर्माण व्हावे सांस्कृतिक जीवन मूल्यांची प्रतिस्थापना व्हावी. राजमंडळाने लोककरंजनात् राजा ही त्याग पूर्ण निस्वार्थ भूमिका मान्य करून राज्य करावे ,हे कृष्ण जीवनाचे ध्येय होते. ते साध्य करण्यासाठी देशातील राज्यसंस्थांचे शुद्धीकरण हाच उपाय आहे हे कृष्ण जाणत होता. हे शुद्धीकरण दोन प्रकारांनी होण्यासारखे होते. एकतर भ्रष्ट राज्यसंस्थेत शिरून आपल्या आदर्श वागणुकीने तिला पुन्हा नियंत्रित व धर्मन्मुख करणे किंवा संपूर्ण तयारी शुद्ध तत्वावर आधारलेली धर्माधिष्ठित नवी राज्यसंस्था निर्माण करणे.

**भूत त्याचे ठार काही होत नाही**

बुधवार, 24/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
घोट घे रे यार काही होत नाही जीव जातो फार काही होत नाही. एकदा रक्ताळली बेधुंद झाली. म्यान ही तलवार काही होत नाही. बांधता घर एकदा कळले उन्हाला सावली मग पार काही होत नाही. भूत नसते सिध्द करण्या ठार मेला. भूत त्याचे ठार काही होत नाही. गंजलेल्या जिंदगीला धार देतो आणि मी भंगार काही होत नाही. पोरसवद्या बालिकेची माय होते. स्वस्थ ती घार काही होत नाही. एकदा तिज आपुलेसे मानले कि वेदनेचा भार काही होत नाही. +कानडाऊ योगेशु

पुराच्या पाण्यातला थरार

मंगळवार, 23/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पुराच्या पाण्यातला थरार ******************* पाऊस जोरात होता. मुसळधार ! संभा तशा पावसात भिजत होता . बरोबर राजा होता. त्याचा दोस्त . त्याचा कुत्रा . असा पाऊस त्यांनी कधी पाहिला नव्हता. त्यामुळे दोघेही तो आश्चर्याने पाहत होते . समोरचा परिसर उन्हात नेहमी स्वच्छ दिसायचा . तो आता पावसाने झाकला गेला होता . डोक्यावरून पदर घेतलेल्या गावातल्या बाईसारखा . संभा येळवंडी नदीच्या काठावर रहायचा. म्हशिवली गावाजवळ . त्याच्या जवळपास दुसरी घरं नव्हती .त्याचे वडील मासे धरायचे आणि विकायचे . तो एक लुकडा पण चुणचुणीत मुलगा होता . आणि राजा ?

परबची अजब कहाणी---४

लेखक भागो
मंगळवार, 23/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेत मी कार्जाच्या निमित्ताने गेलो होतो. तिथे हा गजानन सदावर्ते नावाचा मच्छर मॅनेजर होता. “साहेब, मला पैशाची गरज आहे, लोन पाहिजे आहे.” मी त्याला विनम्रपाने सांगितले. माझ्याकडे लक्ष न देता तो फायलीत डोकं खुपसून बसला होता. “लोन माझ्याकडून पाहिजे आहे कि बँकेकडून?

Alien Contact

रविवार, 21/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
The amount of 290 crores INR has been deposited in your account by Tesla Incorporated USA हा मेसेज माझ्या मोबाईलवर आला आणि मी आनंदाने आश्चर्य मुग्ध झालो. आज तारीख 15 सप्टेंबर 2025. दोन महिन्यापूर्वी मी माझ्या ICOM 500 XR setup वर shortwave FM TV FM DXing करत असताना एक अजब संदेश माझ्या रेडिओवर झळकला. तो संदेश गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून होता. मी माझ्या transceiver कडून ताबडतोब रिप्लाय केला. आपण कोण आहात व माझ्याशी का संपर्क करू इच्छिता? त्यावर उत्तर आले की आम्ही गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून बोलतोय आम्हाला पृथ्वीवरील जीवनाबद्दल जिज्ञासा आहे पृथ्वीवरील लोकांना मदत करायची आहे.

परबची अजब कहाणी---३

लेखक भागो
रविवार, 21/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) “हे पहा – काय तुमचे नाव बरं- परब नाही का, हा तर परब, मी औषधं लिहून देतो. ती वेळच्या वेळी घ्यायची. चुकवायची नाहीत. काळजी घ्या.” औषधाचे नाव होते अरीस्ताडा(Aristada). “घ्या हे महिनाभर. जर रिलीफ मिळाला नाही तर मग पुढे बदलून पाहू. महिन्यानंतर भेटा.” त्यानंतर इन्स्पेक्टरची आणि डॉक्टरांची माझ्या अपरोक्ष चर्चा झाली असावी. इन्स्पेक्टरने माझी बंदिवासातून सुटका केली आणि घरी जायची परवानगी दिली.