Skip to main content

मैत्रिणीचा नवरा

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी रविवार, 12/11/2017 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मैत्रिणीकडे गेलो होतो, तिचं लग्न ठरल्याचं कळलं होतं. तीने भेटायला सहजचं बोलावलं होतं, पण गाठ पडली तिच्या भावी नवऱ्याशी. बऱ्याच गप्पा झाल्या. इकडच्या तिकडच्या. मला फार प्रश्न पडतात बोलताना, की हं, हे झालं; आता काय बोलायचं? त्याला तसले काही प्रश्न पडत नव्हते. मुळात स्वत:बद्दलच फक्त बोलायचं असेल तर असले प्रश्न पडत नाही साधारणपणे. तिच्या वडिलांना भेटलो नंतर. काका एकदम खुश. माझ्या पाठीवर गुद्दा मारत म्हणाले, “मग? कसा वाटला आमचा जावई?” जे वाटलं ते सांगण्यासारखं नव्हतं आणि त्या ऐवजी वेगळं काही सांगण्याइतकी प्रतिभा नव्हती.

पुणे ते लेह (भाग १ - पूर्वतयारी)

लेखक अभिजीत अवलिया यांनी शनिवार, 11/11/2017 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
कुठून बरं सुरवात करावी ? हां. साल २०११. पुण्यातील एका टूर ऑपरेटरने लडाख भागातील फोटोंचे प्रदर्शन भरवले होते. लडाख हा भाग तोपर्यंत मला ऐकून माहित होता. इंटरनेट वापरत असलो तरी त्याचे तितके ऍडिक्शन झाले न्हवते. त्यामुळे कधीच गूगल मध्ये 'लडाख फोटोज' असे सर्च पण केले न्हवते. लडाख भाग किती सुंदर आहे हे तेव्हा पहिल्यांदा फोटोंचे प्रदर्शन बघितल्यावर समजले आणि लवकरच इकडे जायचे हे मनाशी पक्के ठरवले. सर्वप्रथम २०१२ साली कंपनीतील आम्ही काही जणांनी मिळून लडाखला जायचे ठरवले. दिल्ली पर्यंत विमानाने जाऊन तिथून बसने मनालीला जायचे आणि मनालीतून बाईक भाड्याने घेऊन लडाख पालथा घालायचा आणि विमानाने परत यायचे.

हिवाळी भटकंती: सुधागड, भोरपगड( Sudhagad, Bhorapgad)

लेखक दुर्गविहारी यांनी शनिवार, 11/11/2017 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगजेबाच्या कराल मगरमिठीतून महाराजांची सुटका झाली आणि राजगडावर परतल्यानंतर त्यांनी एकुणच जयसिंगाचे आक्रमण आणि आग्रा भेट याचा सकल विचार करून काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले. स्वराज्याची राजधानी राजगडावरून हलवणे हा त्यापैकी एक महत्वाचा निर्णय. राजगड बेलाग तर होताच, पण तो पठारी प्रदेशात वसलेला. मागे शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी मोगली फौजानी काही पायथ्याच्या गावात जाळपोळ केलेली. त्यात जसा पुरंदरला वेढा पडला, तसा भविष्यात एखाद्या सरदाराने राजगडाला वेढा घातल्यास, अडचणीचे होईल, हे ओळखून एखाद्या बेलाग आणि शत्रुला सहजासहजी पोहचता येणार नाही अश्या गडावर राजधानी हलवने आवश्यक होते.

काही सांगायचे आहे

लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 11/11/2017 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
काही सांगायचे आहे, सांगावया जमेल का? ज्यांनी ऐकायचे, त्यांना ऐकावया जमेल का? अनुभव टिपताना, मन शब्दबंबाळले शब्द त्यातला शहाणा, वेचावया जमेल का? रेष असो ललाटीची, वा असो तळहाताची नसणार सरळ, हे मानावया जमेल का? चित्रमय जग सारे, काय सोडू? काय भोगू? मयसभा कोणती ते, ओळखाया जमेल का? हाती लागला परीस, सर्वांच्याच हाती सोने धूर पिऊन सोन्याचा, जगावया जमेल का?

म्हैसुर सहल (पूर्वतयारी)

लेखक सुकामेवा यांनी शुक्रवार, 10/11/2017 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षी प्रमाणे दिवाळीची सुट्टी संपल्यावर नेहमी सारखे कुठेतरी जायचे म्हणून विचार चालू केला. ऑफिस मध्ये १५ दिवसांची सुट्टी आधीच राखून ठेवली असल्यामुळे वेळेचा प्रश्न निकालात निघाला होता. दिवाळीच्या सुट्टीत ऑफिसमधील सहकारी सुट्टीवर असल्यामुळे सहलीचे नियोजन करायला वेळ कमी मिळत होता. तरीपण हो नाही हो नाही करत ठिकाणाची यादी बनवायला घेतली. अगदी रणथंबोर, कन्याकुमारी, ताडोबा, मध्य प्रदेश (इंदोर, रावेरखेडी इ.) पासून ते म्हैसूर पर्यन्त.... ठिकाण कसेबसे नक्की झाले तिथून पुढे पुढची तयारी सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोन कन्यांना घेऊन जायचे कसे आणि कधी..

शिवकाल-निर्णय

लेखक सरनौबत यांनी शुक्रवार, 10/11/2017 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
शिवकाल-निर्णय दिनांक १० नोव्हेंबर, २०१७. आज अफ़जलखानाच्या वधाला ३५८ वर्षे पूर्ण झाली. सहज म्हणून 'कालनिर्णय' पाहिलं तर ह्या दिवशी 'कालभैरव जयंती' असल्याचं समजलं. ह्या 'कालभैरव जयंती' खेरीज अफजलखान नावाच्या ‘काळभैरवाची पुण्यतिथी' देखील नमूद करायला हवी होती असं वाटलं. 'कालभैरव जयंती' शिवाय 'पाटीलबुवा गोविंद झावरे पुण्यतिथी' देखील कालनिर्णय मध्ये ह्याच दिवशी लिहिली आहे. गावो-गावच्या लहान-मोठ्या महाराजांच्या जयंती, पुण्यतिथी आणि सणवार इतपत मर्यादित माहिती आपल्या कॅलेंडर्स मध्ये असते.

हिंदू लोकांना ८ राज्यांत अल्पसंख्यांक दर्जा ?

लेखक साहना यांनी शुक्रवार, 10/11/2017 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाजपचे अश्विन कुमार उपाध्याय ह्यांनी अल्पसंख्यांक दर्जा आणि त्यातून शैक्षणिक संस्था चालवण्याचे विशेष अधिकार ह्यांचे महत्व लक्षांत घेऊन भारतातील ८ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा मिळावा ह्यासाठी सुप्रीम कोर्टांत अपील केले होते. पण न्यायालयाने ते मंजूर नाही केले आणि उलट उपाध्याय ह्यांनी NCMEI ह्या संस्थेकडे हा विषय न्यावा असे सूचित केले जाते. NCMEI हि एक घटनात्मक संस्था असून देशांत कुणाला अल्पसंख्यांक दर्जा असावा हे ठरवण्याचे अधिकार ह्या संस्थेकडे आहेत. कायद्या प्रमाणे कुणीही हिंदू ह्या संस्थेचा पदाधिकारी असू शकत नाही.