Skip to main content

'एका खेळियाने' आता पुस्तक स्वरूपात!

बुधवार, 07/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनी भरभरून प्रेम दिलेली लेखमाला 'एका खेळियाने' आता सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात उपलब्ध झाली आहे. त्याचं झालं असं की दोन एक वर्षांपूर्वी सकाळने एक स्पर्धा घेतली होती. त्यात 'एका खेळियाने'ला सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. त्याचेच फलित म्हणून सकाळ ने एका खेळियानेचे लेख पुस्तकरूपात प्रकाशित केले आहेत. मिपावर आधी प्रकाशित झालेले काही आणि काही नवीन अश्या तीसेक लेखांचा त्यात समावेश आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे पॅरिस ऑलिंपिक्स सुरु झाले त्याच दिवशी, २६ जुलै ला हे पुस्तक वेगवेगळ्या ई-दुकानांमध्ये उपलब्ध झाले. पुस्तकाचे ई-बुक देखील लवकरच उपलब्ध होईल.

पूर

सोमवार, 05/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पूर सकाळची वेळ . संततधार पाऊस . पावसाला कंटाळलेलं धुरकट आकाश. उदास ! पण खाली नदीला पूर आला होता . धरणांमधून पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात होता . मुठेला उधाण आलं होतं . पूर बघायला हे गर्दी ! शनिवारवाड्याच्या समोर कट्टयावर ओळीने बसलेली माणसं . अनेक प्रकारची . अनेक ठिकाणची . भुकेलेली . काही कामाच्या शोधातली . काही थेट भिकारी . जगाने नाकारलेली सगळी फौजच जणू .त्यांचा तो रोजचाच अड्डा . कोरोना काळापासूनचा . पावसाने हवेत गारवा आणला असला तरी त्याने पोटातली आग काही विझत नाही . तीच आग विझवण्याच्या विवंचनेत असलेली ती गरीब बिचारी माणसं . पाऊस चालूच होता . नशीब त्याने थोडा जोर कमी केला होता .

पट नीटस स्थळकाळाचा

शनिवार, 03/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
निवडुंग वनांतरी फुलला पाहील मग कुणी कशाला धगधगली बघ शेकोटी धुरकट मग धुनी कशाला फड तुऱ्यावरी बघ आला गोफण मग जुनी कशाला मी याचक नच, तरी देसी राहीन मग ऋणी कशाला क्षण अगणित संभाव्यांचा शंका मग मनी कशाला पट नीटस स्थळकाळाचा त्यावर मग चुणी कशाला

शशक- विद्यार्थी.

शुक्रवार, 02/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
“सुभेदार, “त्या” तिथल्या सुभेदाराने, गावातल्या एका मुलीचे अपहरण केलेय, तिचं टक्कल केलंय, नी तिच्यावर “ते” सर्व मिळून अत्याचार करताहेत.” “सुभेदार, त्यानी एका मुलाचही अपहरण केलय नी त्याच्यावरही अत्याचार सुरूय.” “सर्वाना जमा कर, किती जमलेत? १६? बंदुका घ्या, आज त्यांचा काटा काढूच, हे असले प्रकार चालणार नाहीत. चला.” “ते पन्नास आहेत, हरकत नाही, आपण प्राणपणाने लढू, जिंकू किंवा मरू, पण लढू, मारू.” “किती मेलेत?? ५०? त्या मुला मुलीची सुटका झालीय, मला हे प्रकार आपल्या देशात नकोय. मी युद्ध पुकारतोय.

अहत पेशावर , तहत तंजावूर

लेखक चौकस२१२
शुक्रवार, 02/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
अहत पेशावर , तहत तंजावूर एक उत्साहपूर्वक गाणे ( हे पाठ कारेन किती अवघड आहे आणि सुरत / चाळीत गाणे ) नक्की बघा https://www.youtube.com/watch?v=OaYxZ1sDh_I या शिवाय एक मालवणी गाणे ! https://www.youtube.com/watch?v=GKGwZQ6m9lw

हरभराडाळीची इडली

लेखक Bhakti
मंगळवार, 30/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
#केरळीफूड #मोरमिलागाई #ताकातलीमिरची A काल हरभरा डाळ आणि तांदळाची इडली पाहिली.खुप दिवसांची आणलेली हरभरा डाळ तशीच होती. तेव्हा ही इडली करण्यासाठी उदीड वाटी हरभरा डाळ आणि दोन वाटी तांदूळ रात्री भिजत ठेवले.उडीद डाळ अजिबात वापरली नाही.

परभणीतील भरतनाट्यम अरंगेत्रम- नृत्य योग सोहळा!

लेखक मार्गी
रविवार, 28/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
✪ अरंगेत्रम- शिष्याची परीक्षा व जगामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा 'अंतिम पग' ✪ अनुभवावेत असे शब्दम्, वर्णम्, किर्तनम्, तिल्लाना आणि मंगळम् ✪ सुंदर ते ध्यान आणि ओंकार स्वरूपा! ✪ वर्षानुवर्षाच्या मेहनतीचं- दृढसंकल्पाचं प्रेरणादायी उदाहरण ✪ परभणीच्या वैष्णवीची मोठी स्वप्ने आणि झेप ✪ कडक गुरू- वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात ✪ नृत्य आणि संगीत- विचार थांबवणारा अनुभव ✪ स्नेहीजन व गुरूजनांचा मेळा When a disciple is ready, Guru appears. When the disciple is really ready, the Guru disappears! नुकतीच गुरूपूर्णिमा होऊन गेली आहे.

परबची अजब कहाणी---६

लेखक भागो
रविवार, 28/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
परबची अजब कहाणी---६ ( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367) (भाग—५ https://www.misalpav.com/node/52373) (माझ्या मित्रांनो मला ही मालिका इथेच संपवायला लागणार आहे.

केरळा स्टाईल गव्हाचा हलवा

लेखक Bhakti
शनिवार, 27/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
#केरळाफूड अ केरळ फुड सिरीज मध्ये आता पुढचा केरळी पदार्थ आहे गव्हाचा हलवा! तसं पाहिलं त्याला गव्हाची आपण बर्फी सुद्धा म्हणू शकतो कारण की हे खाताना आपण वड्या पाडून खात असतो‌. तर पाहूया याची कृती आणि साहित्य. अगदी कमीत कमी साहित्यात आपण तयार करणार आहोत.