Skip to main content

वलय (कादंबरी) - प्रकरण १

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 08/01/2018 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
(सिने टीव्ही श्रेत्रावर आधारित माझ्या "वलय" या कादंबरीचे दर सोमवारी आणि शुक्रवारी एक प्रकरण येथे क्रमशः प्रसिद्ध करण्यात येईल - निमिष सोनार) कादंबरी वाचायला सुरुवात करण्याआधी – जगात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती करणाऱ्या वलयांकित अशा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत तसेच टीव्ही क्षेत्रात स्वत:चे वलय निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी असून ही एक पूर्णपणे काल्पनिक कादंबरी आहे. काही अपरिहार्य अपवाद वगळता यात उल्लेख असलेली सिनेमांची नावे, सिनेमाशी संबंधित विविध ठिकाणे, कलाकार, चित्रपट, टीव्ही सिरियल्स, नाटके, थिएटर्स, पुस्तके, लेखक वगैरे यांची नावे काल्पनिक आहेत!

आजकालची पोरं आणि संस्कृती

लेखक साहना यांनी सोमवार, 08/01/2018 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक - जोकर गोलूची चहाची कळशी गावांतील सर्वांत प्रसिद्ध अड्डा. त्याच्या बाजूला हनुमान मंदिर आणि समोर सखारामच्या सुनेचे नवीन उघडलेले ब्यूटी पार्लर. ज्या दिवसापासून ते सुरु झाले तेंव्हा पासून गोलूच्या दुकानावरील गर्दी आणखीन वाढली. मी तिथे चहाचा कप घेत माझ्या ऍक्टिवावर बसलो होतो इतक्यांत देवळांतून दर्शन घेऊन येणाऱ्या नानांची स्वारी दिसली. "अरे, हल्ली व्हाट्सअँप वर काही आवाज नाही तुझा?" त्यांनी विचारले. "नाही, परीक्षा होती ना... म्हणून वेळ नाही मिळाला", मी उत्तर दिले. "काय नाना, तुम्ही सुद्धा त्या व्हाट्सअँप च्या नादी लागलात ?" मागून आवाज आला पाहिलं तर समोर काका पाटील दिसले.

अनवट वाट २

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 08/01/2018 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
सुरेखा , तिचं नाव येताच मनात कालवा कालव झाली . ती मनात होतीच कायमची पण फक्त माझ्या समोर, पण आज असं दुसऱ्यांकडून ऐकताना बरंच वेगळं वाटलं . खरंच मी थोडं धाडस करायला हवं होत का ? या समाजाला , घाबरून कि इतर काही . कि ते नेहमीचंच लोक काय म्हणतील या विचाराने ? त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे . तेव्हा सगळे नातेवाईक, भावकी या सगळ्याच्या विरुद्ध होती . आणि त्यांचा मान कि मन राखण्यासाठी कि आणखी कश्यासाठी आज आम्ही सोबत नाही . पण हे सगळे तरी कुठायत आता आमच्या सोबत आता प्रत्येकजण आपापल्या कामात , परिवारात व्यस्त आहे आणि मी मात्र त्यावेळी .... " अहो कधी येणार आहेत साहेब ?

अन्नदाता सुखी भव (क्रमशः) : भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (पूर्ण)

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 08/01/2018 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
अन्नदाता सुखी भव (क्रमशः) : भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (पूर्ण) या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६:

क्रीडायुद्धस्य कथा वाहा(ब) जी वाहा(ब)

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 07/01/2018 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला ड्रामा आवडतो. क्रिकेट असो वा सिनेमा वा लाइफ.... आपल्याला ड्रामा आवडतो. आपला हीरो कसा... हातात बंदुक असली तरी त्याच्या दस्त्यानी हानत हानत १० लोकांना लो़ळवील... पण गोळी नाही घालणार. सरळ समोरच्याला गोळी घालुन मामला खतम केला तर पिक्चरमध्ये मजा काय राहिली? जरा काचा तुटल्या, डोकी फुटली, मानसं हिकडून तिकडं उडून पडली, हाडं मोडली की कसं जरा पैशे वसूल झाल्यासारखं वाटतं. एका टीमनी अमुक अमुक रन केल्या आणि दुसर्‍या टीमनी तमुक तमुक ओव्हर्समध्ये त्या चेस केल्या अशी साधी सरळ सोपी स्टोरी असलेलं क्रिकेट आम्हाला कसं आवडणार? मग तो पाठलाग कितीही शिस्तीचा का असेना.

महाराष्ट्राच्या ईतिहासातील ऐतिहासिक प्रसंगांबद्दल माहिती हवी आहे.

लेखक सतिश म्हेत्रे यांनी रविवार, 07/01/2018 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी National Institute of Technology Karnataka, Surathkal येथे संगणक अभियांत्रिकी शिकत आहे. आमच्या येथे दरवर्षी भारत दर्शन नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. त्यामध्ये प्रत्येक राज्यामधून आलेले विद्यार्थी त्या त्या राज्याची कला व संस्कृती सादर करतात. येथील महाराष्ट्र मंडळ देखील महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपुढे मांडते. यामध्ये आम्हाला (प्रत्येक सहभागी राज्याला) ऐतेहासिक गोष्टींवर आधारित दोन नाटिका सादर कराव्या लागतात.

प्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 07/01/2018 09:30 या दिवशी प्रकाशित केले.

मलयगिरीचे वारे वासंतिक वारे चैतन्य नांदे घर-अंगणी

शहरी वारे स्मागी वारे मृत्यू नांदे घर-अंगणी.

काव्यरस

कबुलीजबाब ... एका ज्ञानियाचा! (भावानुवाद)

लेखक मूकवाचक यांनी शनिवार, 06/01/2018 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याने आपल्या आंतरिक चिदानंद अस्तित्वाची असीम ब्रह्माशी असलेल्या एकतानतेची प्रचिती घेतली; अशा ज्ञानियासाठी पुनर्जन्म, कुठलेही स्थित्यंतर आणि बंधमुक्ती संभवत नाहीत. तो या सगळ्यांच्या पलीकडे असतो. तो आपल्या सर्वार्थाने परिपूर्ण अशा सच्चिदानंद मूळस्वरूपात अविचलपणे स्थित झालेला असतो. त्या पुढील वाटचालीत स्वतःचा देह आणि बाह्य जगताचा आभासी स्वरूपात येणारा प्रत्यय ज्ञानियाला पूर्णपणे नष्ट करता येत नसला तरी (आत्मस्वरूपापासून विचलीत होण्याइतके) हे मृगजळ त्याला कदापी चकवा देउ शकत नाही.

लेखकांच्या बायकोचे नाव.....

लेखक ss_sameer यांनी शनिवार, 06/01/2018 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक लेखक, कसे तरी कागद काळे करण्याचा माझा दिनक्रम. अन तू माझी बायको, कसे तरी नवऱ्याला कामाला लावण्याचा तुझा दिनक्रम. कोणत्याही विषयांस आमच्या विचारांच्या चौकटीत बसवून त्याची लांबलचक तार बनविण्याचा आमचा उद्योग निरंतर सुरूच असतो. या सगळ्या प्रकारांना कागदाचे असंख्य प्रकार कंटाळले, शेकडो लेखण्या त्यांचे आयुष्य झिजवून गेल्या. दौतीच्या कित्येक बाटल्या रिकाम्या झाल्या, फाउंटन पेनच्या निबांच्या टोकांचे रंगाऱ्याचे ब्रश झालेत. पण आमचे उद्योग शमण्याचे नाव घेत नाहीत. सहस्रावधी विचार कागदावर उमटवून तो कागद स्वतःच्या कवेत सामावून घेणाऱ्या कित्येक कचरा पेट्यांनी अजीर्ण होऊन उलट्या केल्यात.

कळ

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 06/01/2018 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
कळ .... तिच्या हसऱ्या फोटोवर एक नजर फिरवली. सगळे प्राण बोटाच्या अग्राशी आणून डिलीटचा ऑप्शन वापरला. मोबाईल बंद केला. एक भला मोठ्ठा दगड मनाच्या दाराशी ठेवला आणि कौशिकदा उठले. Backstage वाले आपापल्या कामात मग्न होते. खिळे, फळकुट, हातोडे, गिरमीट, हा कपडा, तो स्टूल, तो आरसा, ही पिशवी कुठे अडकवायची.... एक ना दोन! शुभारंभाच्या प्रयोगाची तारीख जवळ येत होती. तयारी जोरात चालू होती. कौशिकदा या नाटकाचे दिग्दर्शक. सगळी हयात ‘नाटक’ या एकाच विषयात गेलेली. आपण केलेली नाटकं संख्येत मोजण्यात त्यांना फारशी रुची नव्हती. सतत नाविन्याचा ध्यास. प्रयोग करीत रहायचे.