सुधारस
सुधारस हे पक्वान्न बहुसंख्य मराठी घरात ऐतिहासिक किंवा आठवणींच्या कोषात जाऊन पडलं असलं तरी आमच्याकडील जेवणाच्या ताटात मात्र आजही सुधारस आपलं स्थान टिकवून आहे. याचं मुख्य कारण म्हणजे यासाठी लागणार्या सामग्रीची सहज उपलब्धता, कमीत कमी लागणारा वेळ आणि कौशल्य ,ही त्रिसूत्री.
तुम्हाला कोण व्हायचंय.... बारामतीकर?
बऱ्याच दिवसांनी पु. ल. देशपांडेंचे 'तुम्हाला कोण व्हायचंय - मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?' पाहिलं..
सहज त्यावरून सुचलं.. कर जोडावे असे अजून एक शहर काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या नकाशावर आले आहे..
ते म्हणजे बारामती..
आता तुम्हाला बारामतीकर व्हायचंय का? तर.. अगदी नावाची फोड केल्यासारखेच आहे पण..
निदान दहा - 'बारा' वेळा विचार करा आणि तरी 'मती' ठिकाणावर असली तर तयारी सुरु करा कारण जितके बाकी ३ शहरे आणि तिथले कर होणे अवघड आहे, तसेच इथे सुद्धा आहे..
मुंबईकरांचं घड्याळ त्याचा हाताला नाही तर नशिबाला बांधलेलं असतं..
बोरांचे दिवस
डिसेंबर - जानेवारी महिन्यात आमच्या उरण येथील नागांवातील वाडीमध्ये बोरांचा घमघमाट सुटलेला असायचा. डिसेंबरच्या सुरुवातीलाच अधून मधून एक-दोन लालसर-कच्चट बोरे पडायची मग आम्ही समजायचो की आता थोडे दिवसांत पिकलेल्या बोरांचे सडे झाडाखाली पडणार. माझी आई ह्या बोरे मोहोत्सवासाठी सज्ज असायची. तिच्या टोपल्या वाटच पाहत असायच्या त्यांचं रितेपण भरून काढण्यासाठी. आई प्रार्थमिक शिक्षिका होती. पण शाळेतल्या जबाबदार्या पार पाडून ती घरच्या-वाडीतल्या कामांतही लक्ष घालायची. झाडा-फुलांत रमायची. चिंचा-बोरांच्या सीझनला तिची लगबग असायची. वाडीत पाच-सहा बोरांची झाडे होती. प्रत्येक बोराचे खास वैशिष्ट्य असायचं.
काही चित्रपटीय व्याख्या
हे एक आमचे संशोधन, खास जनहितार्थ. गाणी, संवाद वगैरे ऐकताना लोकांना असे प्रश्न पडतात की तेरी मैफिल मे म्हणजे नक्की कोठे. तेथे ही माहिती उपयोगी पडेल. गेल्या काही दिवसांत वाचकांनी "प्रेमात पडल्यावर सजदे नक्की कधी करतात?", "तिच्या मैफिलीत जायचे आहे. काय तयारी करून जाऊ?", "जानेजा जास्त भारी की जानेजहॉ?" असे अनेक प्रश्न विचारले. म्हणूनच हा लेखप्रपंच.
तर काही गाण्यांमधून व डॉयलॉग्ज मधून नेहमी ऐकू येणार्या शब्दांच्या व्याख्या.
फूटी कौडी:
प्रत्यक्षात जी देणार्याकडे नसते. घेणार्याला नको असते. तरीही ती मिळणार नाही अशी देणारा धमकी देतो, अशी जगातील एकमेव गोष्ट.
'नासक' नावाचा हिरा आणि दुसर्या बाजीरावाची संपत्ति
माझ्या समजुतीनुसार बाजीराव आणि अन्य हिंदुस्तानी राजे-महाराजे आणि नबाब ह्यांच्याकडून ब्रिटिशांनी वेळोवेळी ज्या रकमा आणि जडजवाहीर युद्धाच्या मार्गाने मिळविले त्यांचे पुढे काय झाले ह्याबद्दल आपल्याकडे स्पष्ट अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. ती संपत्ति ब्रिटिशांनी 'लुटली' एवढेच आपण म्हणू शकतो. आता बुक्स.गूगल सारख्या स्थळांमुळे १८व्या-१९व्या शतकातले छापील साहित्य आपल्याला नव्याने उपलब्ध झाले आहे आणि बाजीरावच्या संपत्तीचे काय झाले ह्याचे पुष्कळसे समाधानकारक उत्तर मिळू शकते.
लव्हगुरू
कंपनीच्या बसमध्ये फोनवर हळू आवाजात बोलत असताना आपल्या शेजारी बसलेल्या ऑफिसच्या सहकारी पूजा आणि रिया दोघी आपल्याकडे पाहात हसताहेत, हे अमितला जाणवलं आणि तो अस्वस्थ झाला. त्याने फोन ठेवला, तसं त्यांनी लगेच विचारलं,"काय मग काय म्हणत होती गर्लफ्रेंड?"
"क...क...क...कोण...गर्लफ्रेंड? नुसती मैत्रीण होती एक."
"अरे लाजू नकोस आम्हाला सांगायला?आम्ही तुला मदतच करू?"
क्षणभर अमित विचारात पडला. "तुम्ही मदत करणार?" त्याने विचारलं.
"अर्थात,"रिया हसून म्हणाली,"अरे ही पूजा तर तुला एकसे बढकर एक टिप्स देईल. लव्हगुरू आहे ती. तिच्या टिप्स पाळल्यास तर गर्लफ्रेंड पटलीच पाहिजे."
"असं असेल तर पूजा, प्लिज.
पुणे ते लेह (भाग ९ - द्रास ते निम्मू)
०१ सप्टेंबर
***************************************************************************************
-६० अंश सेल्सिअस

वलय (कादंबरी) - प्रकरण ७
प्रकरण ६ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41864
--
प्रकरण ७
सोनी, सुप्रिया आणी रागिणी रहात असलेले ते वर्किंग विमेन्स हॉस्टेल असल्याने तेथे जायला यायला वेळेची बंधने नव्हती कारण मुंबई सारख्या शहरात आजकाल कामानिमित्त लोक दूर प्रवास करतात आणि आजकाल स्त्रीयासुद्धा पुरूषांच्या बरोबरीने दिवस रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात. पण हॉस्टेलवर कुणाला भेटायला बोलवायचं असेल तर मात्र नियम होते.
त्या दिवशी सुप्रिया पुण्याला गेलेली होती आणि रागिणी गेले दोन दिवस सूरजच्या फ्लॅटवर होती.
सोनी बनकर आज रूमवर एकटी होती.
सातारा छत्रपतींची २३३ हिऱ्यांची पगडी?
महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक मौल्यवान खजिने परदेशांत आहेत. दुर्मिळ चित्रे, मूळ हस्तलिखिते, पोथ्या, मूर्ती एवढेच नव्हे तर हिरे, माणके आणि सोन्याच्या वस्तूही त्यात आहेत. थोड्या दिवसांपूर्वी श्री. संकेत कुलकर्णी यांनी नाशिक-हिरा याच्याबद्दल एक संशोधन प्रसिद्द केले होते. या वेळी लंडनमध्ये नव्हें तर अमेरिकेतील अश्याच एक विशेष मौल्यवान वस्तूची ही कहाणी. आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये ही बातमी प्रसिद्ध होत आहे. माझा हा लेख इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी इथे टाकत आहे. हा लेख मूळ स्वरूपात शेवटच्या तीन पॅराग्राफ्सकट सोशल मीडियावर अथवा इतर कुठे शेअर करण्यास माझी काही हरकत नाही.
मिसळपाव