Skip to main content

माध्यमांतर– "एपिक" धर्मक्षेत्र: द्रौपदी एपिसोड!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/03/2018 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: आरंभ या जानेवारी २०१८ पासून सुरु झालेल्या ई-मासिकातील फेब्रुवारी अंकातील माझा हा अभिनव प्रयोग - माध्यमांतर! खास येथे मिसळपाव वाचकांसाठी देत आहे!) टीव्ही एपिसोड लिखित स्वरूपात म्हणजे माध्यमांतर!

"चव नै न ढंव नै सोंगाडी"

लेखक आर्या१२३ यांनी मंगळवार, 06/03/2018 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
"चव नै न ढंव नै सोंगाडी" - २०१६च्या युनिक फिचर्सच्या 'अनुभव' च्या 'कॉमेडी कट्टा' या दिवाळी अंकात आलेली अस्मादिकांची अहिराणी कथा ******** शहादा ना जोडे डांबरखेडा गाव शे! गावना पोरे शिकीसन शेरगावमा नोकरीले लागी ग्यात आणि आठे गाव सुधरनं! तापीनं पानी येयेल व्हतं. पह्यले ऱ्हायेत तशी मातीनी घरे, कुडाना भिंती जाईसन पक्की घरे, धुयमिट्टीनी वाट जाईसन पक्की डांबरी सडक व्हयेल व्हती. मोबाईल, एल सी डी टीव्ही, लेप्टाप का काय म्हंतस ते बी पोचेल व्हतं. एक दोन मोबाईल कंपन्यासनी टावर बी बांधेल व्हते गावना भायेर वावरमां. पन तरीबी चौधरीन धल्लीना वट होता गावमां! बठ्ठा लोके वचकीसन ऱ्हायेत.म्हतारी धिप्पाड.

वलय (कादंबरी) - प्रकरण २४ ते २८

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/03/2018 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण 24 राजेश सोबतच्या दु:खद ब्रेकपनंतर जीवनाला अचानक मिळालेली सुखद कलाटणी तिला आठवली. तिने मुद्दाम राजेशला असे सांगितले होते की ती यापुढे प्रोफेशनल रिलेशन कायम ठेवेल म्हणजे राजेश बेसावध राहील आणि तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार नाही. राजेशकडून नकार आला तर असे सांगायचे हे तिने आधीच ठरवले होते. नंतर सोनी बनकरला राजेशसोबत झालेल्या ब्रेकपची कल्पना दिल्यानंतर ती काही दिवसांनी हॉस्टेल सोडून गेली होती. तिने मॅडम अकॅडमीच्या फायनल इयरच्या असाईनमेन्ट बऱ्याच आधी संपवल्या होत्या आणि रीतसर "मॅडम" चे प्रोव्हीजनल सर्टिफिकेट मिळवले. मग तिने कायमचे पुण्याला घरी परत जाऊन आईला ब्रेकपबद्दल सांगितले.

गावाचे नाव "सानपाडा" नव्हे "सॅन पाडा" होय

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 06/03/2018 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री. केदार यांनी चालवलेल्या "मिसळून मिसळ" या कायआप्पा गृपवर एक फोटो आला होता. त्यात सॅन San Francisco, San Diego त्याच प्रमाणे सान पाडा हे गाव देखील सॅन पाडा असू शकते या अर्थाचा मेसेज आला होता. त्यावर आम्ही अभ्यास करून एक लेख लिहीला तो येथे प्रसिद्ध करत आहोत.) साधारणतः १६ व्या शतकात(१) आताची ठाणे खाडी परिसर, नवी मुंंबई आदी परिसर समुद्राच्या पाण्याने पुर्ण व्यापलेला होता. घनदाट खारपुटीचे, नारळी-फोफळीचे झाडे, जंगली श्वापदे तेथे होती. आताचा संजय गांधी नॅशनल फॉरेस्टचा परिसर लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. तर १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात घणसोली गाव फार छोटे होते. पाडाच म्हणाना.

सरसगडची सुरस सहल

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 06/03/2018 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
सरसगडाच्या ९६ पायरी जिन्याच्या पायथ्याशी आम्ही अडलो होतो. छे! हा तर अवघड रॉक पॅच होता. हा काही आपल्याला जमणार नाही. चला परत. कारण पालीत राहणार्‍या एका अनुभवी माणसाने आम्हाला सांगितलेलेच होते की साठीच्या वरील लोकांसाठी सरसगड काही सोपा नाही. त्यांनी तर जाऊच नये तिथे.

लोकशाही झिंदाबाद

लेखक परशुराम सोंडगे यांनी मंगळवार, 06/03/2018 05:18 या दिवशी प्रकाशित केले.
आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात अालं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत अाली.नात्या गोत्यात,पावण्या रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू सुना आमने सामने अाल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.