Skip to main content

दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 08/05/2018 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
ब-याच प्रयत्यानंतर मला उठून बसता आले. माझे डोके मागच्या बाजूने भयंकर दुखत होते. कोणीतरी सतत डोक्यावर हातोड्यानी मारत आहे असा भास होत होता. त्यात हा आजूबाजूचा कल्लोळ. हे काय..आता तर चक्क रडणाच्या आवाज येतोय. मला पूर्ण भानावर यायला मिनीटभराचा अवधी तरी लागला असेल. समोर कोण रडतयं हे पाहिल तर चक्क माझीच आई रडत होती. "काय झाल आई ..आणि एवढी लोक का जमली आहेत घरात ?" मी प्रश्न केला. आईने उत्तर न देता रडणे चालुच ठेवले. आजूबाजुचे लोक कुजबुज करत थांबले होते. मला ते अगदी पाहवेना. मी आईला शांत करण्यासाठी पुढे चाललो. चालताना पाय कशात तरी अडकला.

कोकण सफ़र भाग १ - दिवेआगर, आंजर्ले, हर्णे, पाळंदे

लेखक सतिश पाटील यांनी मंगळवार, 08/05/2018 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच महीने कोकणची वारी झाली न्हवती, २८,२९,३० एप्रिल अणि १ मे अशी सलग ४ दिवस लागुन सुट्टी आल्याने पुन्हा कोकणचा बेत आखला. त्याबद्दलचा हा थोडक्यात वृतांत. सोबतच्या ४ मित्रांना घेउन २८ एप्रिलला सकाळी बरोबर ७.३० वाजता एक्सप्रेस हायवेला लागलो, सलग सुट्ट्या असल्याने ट्राफिक जाम होण्याचा धोका होताच, खालापुर टोल नाक्याला ट्राफिकमुळ पाऊण तास गेला. तिथून पालीमार्गे ९.३० वाजता वाकणला पोहोचलो, १० वाजेपर्यंत नाश्ता आवरला अणि माणगावमार्गे न जाता रोह्यामार्गे जाण्याचे ठरवले. रस्ता खुपच ख़राब होता परंतु ट्राफिकची कटकट न्हवती. दुपारी १२.३० वाजता आगरदांडाला पोहोचलो.

लवंगी चहा

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 08/05/2018 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रानो , आजपासून मी आपल्यासाठी ( अर्थात पुरुषांसाठी फक्त ) , हा महिना स्पेशल पाकृ आणणार आहे . मी चहाचा शौकीन असल्याने सुरुवात चहापासून करत आहे . पण त्याआधी दोन ओळी ( सवयीप्रमाणे सादर करीत आहे .. ह घ्या ) बायको गेली तिच्या आजोळी चहा प्यावा वेळीअवेळी टाकावी थोडीशी लवंगी कापून रडावं तिच्या नावानं गळा काढून तर मंडळी असा हा फर्मास चहा मी इथे पाकृ मंचावर आपल्यासाठी घेऊन येत आहे . लागणारे साहित्य : एक छोटा टोप, दोन चमचे साखर , एक चमचा चहापावडर आणि थोडं आलं आणि फक्त नि फक्त एक लवंगी मिरची कृती : सर्वात आधी टोप घ्यावा , दीड कप पाणी घ्यावे . ते मस्त उकळू द्यावे .

पाकिस्तानच्या अस्तीत्वाची चर्चा पुन्हा एकदा

लेखक माहितगार यांनी सोमवार, 07/05/2018 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
नाही, हि जीनांच्या ए एम यु मधील फोटोची चर्चा नाही. हुसेन हक्कानी नावाचे , सध्या पाकिस्तानातून बेदखल झालेले, मुळचे कर्मठ पण संधीसाधू पणे जरासे आमेरीका धार्जीणे विचार व्यक्त करणारे अगदी थोडीशी वर्षे पाकीस्तानचे आमेरीकेतील अल्पकालीन माजी राजदूत आणि पाकीस्तानात जे कुणी सत्तेत असेल त्याच्यासाठी थोडे थोडे काम केलेले माजी पत्रकार अशी यांची त्रोटक ओळख आहे. सध्या बेदखल झाल्यामुळे परदेशात राहून जरासे लिबरल झाले आहेत .

अस्साच जळत राहिलास तर , जाताना पाणी पण महाग होईल

लेखक खिलजि यांनी सोमवार, 07/05/2018 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रा कधी जळू नकोस कुणावर इतका कि स्वतःच्या बुडाचीच आग होईल अस्साच जळत राहिलास तर जाताना पाणी पण महाग होईल काव्यातडाग नव्हे हे अथांग समुद्र तो दुर्दैवी तोच जो रसिकांना पामर समजतो वंदनीय मज सारे, तुही त्यात दुजा नसे नित्य नवी कल्पना काव्यदेवी देत असे हताश होऊ नको इतक्यात कि पाठीला बाक येईल कवन जरा नीट कर नाहीतर प्रतिभेला डाग येईल विझलेयत निखारे कधीच , लाव्हाहि निद्रिस्त तो नको फुंकर मारू आता जळून सारे राख होईल मारू नको टिचकी कधी इशाराही नको मजला मी सुखात या जागी जरी असे मी एकला आशा करतो काव्यदेवते आता तरी त्याला जाग येईल मित्रा हे नाही समजलं जर तुला

लेबलं

लेखक mayu4u यांनी सोमवार, 07/05/2018 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारच्या बाजूने बोललो तर भक्त. सरकार विरोधात बोललो तर देशद्रोही. हिंदू धर्मविरोधात बोललो तर बुबुडाउविपुमाधवि*. हिंदू धर्माच्या बाजूने बोललो तर सनातनी, हिंदुत्ववादी, प्रतिगामी. जातीव्यवस्थेविषयी बोललो तर बामणी, मनुवादी. जातीव्यवस्थेविरोधात बोललो तर आंबेडकरवादी, फुलेवादी. खर्चाच्या बाजूने बोललो तर भांडवलशाही. काटकसरीच्या बाजूने बोललो तर समाजवादी. स्त्रियांना विशेष अधिकार असावेत बोललो तर फेमिनाझी. स्त्रियांना विशेष अधिकार नसावेत बोललो तर एमसीपी. प्रार्थनेच्या बाजूने बोललो तर आस्तिक. कर्मकांडाविरोधात बोललो तर नास्तिक. आठवणीतून एखादा किस्सा सांगितला तर खोटारडा, फेकू. मुद्द्याच्या समर्थनार्थ

माझ्या ब्लाॅगचा उदयास्त

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 07/05/2018 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
तेव्हा डोळ्यात लोलक होते समोर निळी स्वप्नं होती बोटाबोटात परीस होते ओठी अनवट गाणी होती आव्हानांची करंदकाळी धोंड वाट अडवायची लेखनलाट भिडून तिला नेस्तनाबूत करायची कीबोर्डावर माझी बोटं वीज लाजेलशी लहरायची उमटायची मग स्क्रीनवरती भळभळ शब्दापल्याडची पोटामागे आज धावतो वेगाने, पण विझली आग, धार विसरली बोथट छिन्नी, सरणावरती माझा ब्लाॅग अजून जेव्हा कुंद सकाळी माझा ब्लाॅग साद घालतो लाॅगिन करून सृजनचितेला मीच चुपचाप चूड लावतो

कोकणातले नवे ठिकाण

लेखक सुधीर कांदळकर यांनी सोमवार, 07/05/2018 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण म्हटले की माडांच्या बनात नटलेले समुद्रकिनारे, लाल मातीच्या गच्च झाडोर्‍यातल्या डोंगरदर्‍या आणि जिव्हालौल्य पुरवणारे आंबेगरे, जीभ रंगवणारी जांभळे, करवंदे तोरणे, जाम इ. रानमेवा समुद्रखाद्य हे सारे डोळ्यांसमोर येते. पण एक आगळेवेगळे रौद्रसौंदर्य एका नव्या ठिकाणी आढळेल. https://prathameshshirwadkar.wordpress.com/2018/05/05/suryast_darshan/#… इथे वाचायला मिळेल इथल्या वाचकांना आवडेल असे वाटते. कुणीतरी जाऊन मस्त प्रवासवर्णन इथे टाकेल जर वाचायला मज्जा येईल.

चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 07/05/2018 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट! Simple, Free Image and File Hosting at MediaFire ( एका थोर व्यंगचित्रकाराने म्हणजे बाळासाहेब ठाकरे ह्यांनी चार्लीचे काढलेले व्यंगचित्र ) नुकत्याच संपलेल्या साली म्हणजे २० डिसेंबर २०१७ रोजी पु लं च्या घरी चोरी झाल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि अगदी सहजच पु लं ज्याचे निस्सीम चाहते त्या चार्ली चॅप्लिनच्या घराच्या चोरीची कथा आठवली.

दोसतार-७

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 07/05/2018 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : https://misalpav.com/node/42384
आपली पर्यवेक्षक सरांच्या जुलमापासून आपली सुटका केली. आपली सुटका करणे हे त्या माशाच्या तुकडीचे कार्य होते. टंप्याच्या जिभेवर सरस्वती नाचत होती. त्याने या अवस्थेत किमान एक तासभर तर रामाच्या देवळात कीर्तन केले असते. आपल्याला भगवंताने कोणते कार्य करायला पाठवले असावे हे सांगता येईल का? यल्प्याच्या या प्रश्नाचे उत्तर टंप्याच काय पण आमच्या तिघांचे पालकही देऊ शकत नव्हते.
शाळा सुरू होते तीच मुळी पावसाच्या सोबतीने. गावात पाऊस सुरू होण्याची तारीख ७ जून. शाळा सुरू होण्याची तारीख पण तीच.