Skip to main content

परमहंसांची दाल-बाटी

लेखक शाली यांनी रविवार, 13/05/2018 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन ऊन्हाळ्याचे दिवस. माझी साईट परळी जवळ सोनपेठ रोडला सुरु होती. निर्जन प्रदेश. सावलीसाठी राखलेले एखादे झाड सोडले तर दुर दुर पर्यंत ऊंच वाढलेले वाळलेले गवत. साईटजवळ एक छोटी वाडी. पण तिही दिवसभर मोकळी. एखाद दोन चुकार कुत्री, काही म्हातारी माणसे. बाकी काही हालचाल नाही. सगळे रानात किंवा औष्णीक केंद्रावर कामाला जायचे. वाडीला वळसा घालून लहाण टेकडीआड दिसेनासा होणारा एक छोटा डांबरी रस्ता. त्यावरचे डांबरही दुपारी वितळायला लागायचे. या टेकडीच्या पायथ्याशीच तात्पुरते ऑफीस आणि डंपर्ससाठी डेपो आणि गॅरेज ऊभारलेले. साईट नऊ किमी पसरलेली. चाळीस डंपर्स आणि दहा-बारा पोकलेन.

गर्दभगान

लेखक भृशुंडी यांनी रविवार, 13/05/2018 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रभूल जर कुठे जराशी शोधून काढा शेजारी इथे महोदय कारक वृष्टी विचित्र पुष्कळ अंधारी गगनी होता उच्च विनवणी प्रचंड घोडा आवडतो ग्रीक आणखी रोमन असुनी खुळा कोंबडा आरवतो धूर्त महाली रुष्ट होऊनी राणी मग शेंगा खाते घडेल कधीही असली घटना जोगेश्वरिला ती जाते सतत बावरे नेत्र दुपारी रिमझिम संध्या राग पहा नयन लागले दूरदर्शनी कपात पडतो गोड चहा बोल्शेव्हिक तो सुमार थोडा मेन्शेव्हिक मग मवाळ हा ? मार्क्सही करतो आर्त विनवणी पटपट शेअर विकाल का भविष्य सांगा अति-भराभर राहू केतू पिसाटले ग्रहणालाही ग्रहणच उत्तर इंद्र चंद्र त्यां विचारले आम्हा नसे का अशी अनुज्ञा खंत दाटते रोजच ही विचित्र

आऊटलँडर

लेखक एमी यांनी रविवार, 13/05/2018 06:04 या दिवशी प्रकाशित केले.
. . Sing me a song of a lass that is gone, Say, could that lass be I? Merry of soul she sailed on a day Over the sea to Skye. Billow and breeze, islands and seas, Mountains of rain and sun, All that was good, all that was fair, All that was me is gone. . . वर्ल्डवॉर २ मधे कॉम्बॅट नर्स म्हणून काम केलेली क्लेअर आपल्या इतिहासतज्ञ नवर्यासोबत (फ्रॅंक) स्कॉटलंड फिरायला आली आहे. नवर्याचा पुर्वज जॅक रँडलबद्दल अधिक माहिती जमा करणे आणि दुसरा हनिमून असे दुहेरी उघड उद्देश या ट्रिपमागे आहेत.

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 12/05/2018 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नमस्कार, नमस्कार म्हणजे काय त्रिवार दंडवत नमस्कार हो, कारण मिपावर आल्या दिवसापासून बघतूया. एकेक सुपरस्टार हायेत राव हितं. आपले मिपाकर म्हणून नाते जुळत जातंया आणि अचानक कळतंया हे माणूस लै वल्ली है. इथं आपल्यासारखा मिपाकर म्हनून वावरतंय पन असली दुनियेत लैच नाव कमवून हाये. ज्या गोष्टी उगा आपण पेपरात बिपरात वाचतांव, टीव्हीवर बघताव ती माणसे चक्क मिपावर हायेत आपल्या संगं. मला तर कवाबवा असंबी वाटतंय की आपन लैच चिल्लर हाय राव. पण मिपाकरांनी अशा अटकेपार रवलेल्या झेंड्याचे कवतिक तर असणारच ना भौ. एकतर आपलं माणूस असतंय. आपलं मराठी माणूस.

आर्जव

लेखक अबोलघेवडा यांनी शनिवार, 12/05/2018 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
गिरनारला दत्तगुरूंच्या दर्शनाला जाण्यापूर्वी केलेली कविता... तुझ्या दर्शनाची लागलिया ओढ, कधी भेटशील गुरुराया | उजाडला तो दिस येई अग्निरथे, भेटीचा योग सुखेनेची यावा ||१|| भेटशील गिरनारी कधी नच कल्पिले, कृपेनेची तुझिया झाला चमत्कार | मनी पाहे तुझिया त्या डोंगरावरी, बोलाविलेस का रे मजला तू उद्धराया ||२|| मानले या जन्मी तुज गुरुस्थानी, का लाविलास भेटी तू इतुका वेळ | आनंदाचा क्षण आला आता हाती, येतो तुझ्या चरणी माथा टेकवाया ||३|| डोईजड झाला मज पापांचा हा भार, करशील का हलका तुझिया कृपेने | असेना कसाही जरी मी या जन्मी, घेशील का उरी तू मला सावराया ||४|| देऊ नकोस अंतर लोटू नकोस दूर, हेच या जन्मी म

माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.

लेखक सचिन काळे यांनी शनिवार, 12/05/2018 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मायबोली संकेतस्थळावर आमचा एक गप्पांचा कट्टा आहे. तिथे एकदा सहज गप्पा मारता मारता तेथील अक्षय नावाच्या एका मित्राने सगळ्यांना 'माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं?' ह्या विषयावर एक निबंध लिहिण्याची विनंती केली होती. त्याला अनुसरून मी तेथे खालील निबंध लिहिला. आपल्या सर्वांच्या वाचनाकरिता तोच निबंध मी खाली देत आहे. विषय :- माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं. माझं लिहिणं कसं सुरू झालं, हे लिहिण्याअगोदर मला वाटतं की माझ्या वाचन कसं सुरू झालं, ह्यावर मी दोन शब्द लिहावं. कारण माझ्या लिखाणाचा प्रवास हा माझ्या वाचनानेच सुरू झालेला आहे.

ऊपदेश

लेखक शाली यांनी शनिवार, 12/05/2018 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त सासरे मंडळींसाठी- पोटी आल्या कन्येचा l योगे पिता ही ग्रहदशा भोगे l जामाताशी उपसर्गही न पोचे l तो तर दशमग्रह ll घेणं नास्ति, देणं नास्ति l त्या नाम जामात असती l अहोरात्र एकच ही पुस्ती l गिरवीत जावी ll समय प्रसंग ओळखावा l राग निपटून सांडावा l आला तरी कळो न द्यावा l जामाताशी ll गर्दभापुढे टांगावी गाजरे l मग तो चालो लागे साजरे l काम करून घ्यावे l गोजरे संयमाने ll वानराशी म्हणावे तुझीच लाल l आपली कळो न द्यावी चाल l मग खुशाल लादावी पखाल। हल्याच्या पाठी ll दिसामाजी शालजोडीतील हाणावी l मासामाजी ‘दे धरणी ठाय’ ताणावी l नयनी गोनेत्रातील करुणा आणावी l हेत साधताना ll जे पेटल्यावीन जाळीतसे l जे

मुसक्याबंद

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 12/05/2018 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
धक्क्याच्या कोप-यात (धक्का हे जुनं नाव, हल्ली त्याला जेट्टि म्हणतात.)आता जिथं कुरकुरे, भेळ , शोभेच्या वस्तुंचे स्टाॅल्स आहेत तिथं पूर्वी एक भिकारी रहायचा. भिका-याला थोडंच नाव असतं. आणि असलं तरी कोण त्याला ते आपुलकीनं विचारणार? पण त्याला सगळे " मुसक्याबंद" म्हणायचे. केस आणि दाढीच्या जटा वाढलेल्या, खोल गेलेले डोळे. अंगावर मळकट्ट कपडे. कपडे म्हणजे कधीकाळी तो शर्ट असावा, असं वाटणारा कपडा आणि खाली फाटकी पॅन्ट. ती सुद्धा दुस-या एका फडक्याने बांधून कमरेवर टिकवलेली. पावसात भिजला तरच आंघोळ. त्यामुळे त्याच्या अंगाला दुर्गंधी यायची.

चावट रश्श्यांची दुनिया !

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 11/05/2018 15:06 या दिवशी प्रकाशित केले.

काल खफवर रश्श्याची चर्चा वाचली.  लिहिणाऱ्याने रशियाची आठवण काढली होती आणि मालकांसहित सर्वांना तरतऱ्हेचे रस्से आठवू  लागले. त्यांची नावे वाचूनच जीवाचे (आणि जिव्हेचे) पाणी पाणी झाले. मग रश्श्यांच्या दुनियेत मनानेच फेरी मारली.

रस्सा हा तसा चावट किंवा खरं म्हटलं तर चाबरट खाद्य-प्रकार ! तामसी खाणे या क्याटेगरीत येणारा. मराठी माणसाला रस्सा भुरकण्याचा प्राचीन काळापासून नाद !

अनवट किल्ले ३२ : डेरमाळ ( Dermal )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 11/05/2018 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला म्हणजे कसमादे ( कळवण-सटाणा-मालेगाव-देवळा ) परिसरात काही अफलातून किल्ले आहेत. मात्र शिअवछत्रपतींच्या साम्राज्याचा इकडे विशेष विस्तार न झाल्याने, तसेच मुख्य मार्गापासून काहीसे आडबाजुला असल्याने हे गडकोट फारचे कोणाला माहिती नाहीत. अगदी क्वचितच दुर्गप्रेमी इथे भेट देतात. यापैकी एक म्हणजे, "डेरमाळ". नुकतीच आपण गाळणा किल्ल्याची ओळख करुन घेतली. या परिसरातील गाळणा हा महत्वाचा किल्ला असल्याने या सर्व डोंगराना गाळणा टेकड्या म्हणतात. मालेगावच्या इशान्येला, नामपुर-ताहराबाद रस्त्याजवळ या गाळणा टेकड्यात एक दुर्गरत्न विसावलेले आहे, "डेरमाळ".