न्याय .... कलियुगातला
न्याय – कलियुगातला.
स्थळ: सम्राट सूर्यकेतू यांचा दरबार.
काळ: इंग्रजांचे भारतात राज्य यायच्या थोड्या आधीचा काळ.
सम्राट सूर्यकेतू गंभीर पणे न्यायाधीश राजकुमार रवीन्द्रना म्हणाले,
“ राजकुमार आपली न्यायाधीश पदी नेमणूक झाल्यापासून येव्हडा सर्वाना संभ्रमित करणारा विवाद समोर आला नव्हता.. काल आपण वादी आणि प्रतिवादी या दोघांची बाजू ऐकून घेतली. दोन्ही बाजूंच्या साक्षी पण संपल्या आहेत. आता आपण निर्णय देण्याची वेळ आली आहे.
मिसळपाव