Skip to main content

पावसाळी भटकंती, घ्यावयाची काळजी ( Rainy Trks, Tips and Tricks )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 08/06/2018 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्र महिना येतो आणि उन्हाच्या काहीलीने समस्त जीव कातावलेले असतात. धरतीही भेगाळून सुस्कारे टाकत असते, डोंगर करपून काळे झालेले असतात. सगळेच आसूसलेले असतात, पाण्याच्या थेंबाना. वैशाख संपत येतो ,गार वारे वाहू लागतात आणि अशातच एक दिवस "तो" येतो. पश्चिमेला आकाशात काळी धुसर रेषा उमटते, बघता बघता जवळ येउ लागते आणि काळेकभिन्न ढग आकाश व्यापून टाकतात.

आईचा मुलगा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 08/06/2018 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात. त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा.

राजयोग - ११

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 08/06/2018 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच दिवशी संध्याकाळी नक्षत्ररायला पाहताच धृव पळत पळत त्याच्याकडे गेला. त्याच्या गळ्यात दोन्ही हात घालून आधी त्याच्या कपाळाला आपलं कपाळ लावलं. मग त्याच्या गालाला गाल लावून "काका!" म्हणत त्याला बिलगला. नक्षत्र त्याला म्हणाला, "छि. असं नाही बोलायचं. मी तुझा काका नाहीये." आजपर्यंत नेहमीच धृव त्याला काका म्हणून हाक मारत असे, आज अचानक नक्षत्ररायने त्याला दटावल्यावर धृवला आश्चर्य वाटलं. काही वेळ तो गंभीर चेहरा करून शांत बसला.

अ का पेला - A cappella

लेखक राघवेंद्र यांनी शुक्रवार, 08/06/2018 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
अ का पेला - A cappella हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.

तुझे डोळे

लेखक कौस्तुभ आपटे यांनी गुरुवार, 07/06/2018 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
सागर पिंजुन रत्न बिलोरी असतील आणले अन जीवनाचे सार ओतुनी भरले चांदणे घडवूनी क्षणभर देव असावा अचंबित ज्यांपूढे तुझे डोळे ...तुझे डोळे ... हे असे ...तुझे डोळे ॥धृ॥ मुग्धता कधी सुमनांची, चारुता कधी चंद्राचि, नयनातुन ती सांडते. गुढता गहन कोड्याची, कल्पना नव्या कवीतेची, नजरेतुन ती मांडते. या तुझ्या लोचनी, खोल गेलो किती, तरीही त्रुप्ती मना ना मिळे. बाळ तान्हे कुणी, मधुरसे हासुनी, जैसे लळा लावते गोजीरे गोजीरे.. तुझे डोळे ..तुझे डोळे ...

जयपूर दिल्ली आग्रा ट्रिप - मदत माहिती हवी आहे

लेखक बारक्या_पहीलवान यांनी गुरुवार, 07/06/2018 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, जुलैच्या सुट्टीत जयपूर दिल्ली आग्रा फॅमिली ट्रिप चा प्लॅन आहे. रेल्वे ने दिल्ली ला जाणार. जाणार:- नाशिक-दिल्ली आग्रा जयपूर दिल्ली - नाशिक दिवस :- ४ ते ५ दिवस फॅमिली:- ६ मोठे पॅरेण्टसह, लहान ४

सुका मेवा चपाती

लेखक दीपक११७७ यांनी गुरुवार, 07/06/2018 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी करून पाहिलेली सुका मेवा चपाती कृती-१ प्रथम एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर ग्यास बंद करा व त्यात 6 बादाम, २ आक्रोड, 12 काजू आणि 12 पिस्ते टाका. यानंतर साधारण ५-७ मिनिटानंतर पाणी काढून टाका तसेच बदाम सोलून घ्या. सुकामेवा सोबतच दुस-या एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर त्यात ५-६ काळया खारका टाका यानंतर साधारण ३० सेकंदा नंतर ग्यास बंद करा .

ईस्ट इंडिया कंपनी

लेखक साहना यांनी गुरुवार, 07/06/2018 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली एका वादातून काही नवीन गोष्टी लक्षांत आल्या. मिपा सदस्यासाठी इथे लिहीत आहे. अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तान भागांत जी युद्धे चालवली आहेत त्याचा अंत अजून तरी दृष्टिक्षेपाला येत नाही. त्याशिवाय सीरिया आणि येमेन इथे अजूनही अमेरिकेचे सैन्य कार्यरत आहे. चारी ठिकाणी मिळून अब्जावधी डॉलर्स चा चुराडा दार वर्षी होत आहे. इराक युद्धांत अमेरिकेने सुमारे २ ट्रिलियन डॉलर्स उडवले आहेत आणि युद्धाचा एकूण खर्च (जखमी सैनिकांचे पेन्शन, बॉण्ड्स वरील इंटरेस्ट इत्यादी ) मिळून तो सुमारे ६ ट्रिलियन डॉलर होईल. काही दिवस आधी अमेरिकन सैन्याने ९६ मिसाईल्स सीरिया मध्ये वापरली ह्यांचा एकूण खर्च १०० मिलियन इतका होता.