Skip to main content

प्रीत फुला

लेखक Secret Stranger यांनी बुधवार, 18/07/2018 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
तू सांग रे माझ्या प्रीत फुला शब्दात कसे सांगू मी तुला, प्रेम हे माझे अवखळ वेडे कळेल का नजरेत तुला.. तू सांग रे माझ्या प्रीत फुला नजरेत कसे सांगू मी तुला, तुझीच स्वप्ने रंगवली मी दिसेल का स्वप्नात तुला.. तू सांग रे माझ्या प्रीत फुला स्वप्नात कसे हे दिसेल तुला, तुझ्याचसाठी झुरणे माझे कळेल का सत्यात तुला..

मा. ल. क. - ५

लेखक शाली यांनी बुधवार, 18/07/2018 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावात एक दांपत्य राहत होते. चरितार्थाचे साधन म्हणजे भिक्षुकी. परिस्थिती बेताची. म्हणजे एका भिक्षुकाची असावी तशीच. रोज जशी भिक्षा मिळेल तशी गुजराण व्हायची. अर्थात कधी कधी महिन्यातून चार-पाच एकादश्याही घडायच्या. पण या परिस्थितसुध्दा एक घास गाईला व एक अतिथीला देण्यास भिक्षुकाची पत्नी विसरत नसे. ही सवय तिने व्रत पाळावे तशी पाळली होती. प्रथम अतिथी, मग पती आणि काही उरलेच तर स्वतःसाठी असा तिचा क्रम असे. कैकदा घरात असलेली एकुलती एक भाकरीही अतिथीला द्यावी लागुन फक्त पेज पिऊन झोपावे लागे दोघांना. अर्थात यावरुन दोघाही पती पत्नीमध्ये खुपदा वाद होत.

मुस्लीम सत्यशोध आणि अंधश्रद्धा निर्मुलन

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 17/07/2018 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
मुस्लीम धर्मीय अंधश्रद्धांबाबत चर्चा करताना पहिला अडथळा तथाकथित पुरोगाम्यांचा असतो, कोणतीही उणीव घ्या ती ईतरही धर्मात आहे ना ! मग मुस्लीमांच्या उणीवा अभ्यासल्या जाऊ नयेत असा हा युक्तीवाद असतो. खरेतर एकाच्या उणीवेने दुसर्‍यांची उणीव झाकली जात नाही. पण तरी सुद्धा तुम्ही मुस्लीमांसोबत चांगले मुद्दे लक्षात घेतलेत काय ? आणि इतरांच्या उणीवा मोजल्या आहेत का ?

जर चंद्र तुमच्यासारखा सुंदर असता ...

लेखक मनो यांनी मंगळवार, 17/07/2018 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
सिंदखेडचे राजे लखुजी (अथवा लुखजी ) जाधवराव - राजमाता जिजाबाईसाहेबांचे वडील आणि शहाजी राजांचे सासरे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा. मराठ्यांच्या इतिहासातील सुरुवातीच्या काळातली महत्वाची व्यक्ती. अश्या जाधवरावांचे एक नव्हे तर दोन चित्रे मला सापडली, त्या दोन चित्रांची ही कथा. न्यूयॉर्कच्या 'मेट्रोपोलिटन म्युझिअम ऑफ आर्ट' मध्ये एक 'बादशाही अल्बम' नावाचा चित्रांचा संग्रह आहे. हा संग्रह जहांगीर बादशाहच्या काळात बनवण्यास सुरुवात झाली. शाहजादा खुर्रम म्हणजे शहाजहान याच्या काळात त्यात चित्रे जोडण्यात आली. औरंगझेबाच्या राज्यकाळात हा संग्रह पूर्ण झाला.

घर एक बोध कथा

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 17/07/2018 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
(आस्था वाहिनी वर एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीचा विस्तार) एका गावात एक घर होते. घरात आत शिरायला फक्त एक छोटासा दरवाजा होता. तो हि सदैव जाड काळ्या कपड्याने झाकलेला. त्या घरातील लोक रोज सूर्य उगवल्यावर छोट्याश्या दरवाज्यातून हातात एक बादली घेऊन बाहेर यायची. हाताने बादलीत काही तरी भरायचे नाटक करायची आणि घरात जायची. हा प्रकार कित्येक तास चालत असे. लोकांना त्यांच्या या वागण्याचे आश्चर्य वाटायचे. हळू हळू हि वार्ता त्या राज्याच्या राजाच्या कानावर पडली. सत्य पडताळण्यासाठी एक दिवस राजा मंत्री सोबत भल्या पहाटे त्या घरासोमोर येऊन ठाकला.

मैत्र..

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 17/07/2018 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी अचानक काहीच न कळवता आपण मित्राच्या घरी धडकावं. त्याने दरवाजा उघडताच त्याला बाजूला सारून आत शिरावं. चपला पर्स फेकून खिडकीजवळच्या मऊ गुबगुबीत माऊसारख्या खुर्चीवर धप्पकन बसावं. आपलं अगडबंब वाढलेलं वजन, परीटघडीच्या ड्रेसला पडणा-या चुन्या, खांद्यावरून डोकावत असलेला किंवा नसलेला चुकार पट्टा कसला कसला विचार मनात येऊ देऊ नये तेव्हा. "तुझीच आठवण काढली होती मी आज बघ डेविलिणबाई" म्हणत हसत त्यानं ग्लुकोज बिस्किटं आणि पाण्याचा ग्लास पुढे करावा. खरंतर मनात खुश होत पण वरवर "चल् काहीही खोटं" म्हणत त्याला उडवून लावावं. अगं हो, तुझ्या आवडीची शेवळाची भाजी केलेली हिने तेव्हा तुझी आठवण आलेली.

तथाकथीत पिंकारू पुरोगाम्यांचा नंबर पह्यला !

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 17/07/2018 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
Indian secularism is not only in danger because of those who attack it, but also because of some of those who claim that they are for it........... It matters to them only when it suits them - the contrary of value based politics or ideology. संदर्भ
मला एक जुनी घटना आठवतीए , ज्यात पाहुण्यांच्या मुलाची आणि घरातल्या मुलाची छोटीशी झटापट झाली, ज्यात पाहुण्यांच्या मुलाची बाजू चूक असूनही त्याला न समजावता मी घरातल्या मुलाची समजूत काढत होतो.

आज हलके वाटले तर

लेखक कहर यांनी मंगळवार, 17/07/2018 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज हलके वाटले तर चांदण्या तोलून धर बोल.. पण नयनातुनी उघडू नको देऊ अधर उजळुनी हे विश्व अवघे सावरिशी का पदर होऊ दे गलका उसासा मोकळे कर मूक स्वर जीव घे हासून हलके ओठ हेच धनु नि शर ने कुशीतून कालडोही गुदमरूदे रात्रभर बरस आता अंतरातुनी हो पुरी सारी कसर व्यापूनिया ये तमासम गात्र गात्र नि शांत कर चांदण्या तोलून धर

पुन्हा नव्याने..

लेखक उमेश मुरुमकार यांनी मंगळवार, 17/07/2018 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच रात्री जातात तुला आठवत आठवत.. आणि बसतो त्या बेहिशिबि अश्रूंना साठवत.. हिशोब करतो त्याच बेहिशिबि रात्रींचा ज्या तुला कधी तरी मिठीत घेतल्याची जाणीव ... करून देतात .. तू मांडलेल्या प्रस्तावाचा विचारदेखील केला कि पुन्हा नव्याने एक सुरुवात करू पण अजूनही हृदयाचे ठोके वाढत बसतात परत त्याच विचारात कि शेवट देखील पदरी येईलच पुन्हा नव्याने.. रुद्र (उमेश)

जफर पनाही : लव्ह लेटर टू द सिनेमा (उत्तरार्ध )

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 17/07/2018 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० मध्ये अचानक जफर पनाहीच्या अटकेची बातमी जगासमोर आली. जगातल्या जवळपास सगळ्या देशांमधून या अटकेच्या निषेधात सूर उमटला. पण इराणीयन सरकार ठाम होतं. जफरवर सरकारविरोधात जनमत भडकवण्याचा ठपका ठेवला गेला होता. एका अर्थाने तो देशद्रोहच होता. त्यांना ६ वर्षांची कैद झाली. कैदेवर भागलं नाहीच तर पुढची किमान वीस वर्ष त्यांच्यावर चित्रपट बनवण्यापासून, लिखाण करण्यापासून , आपली मतं-विचार सार्वजनिकरित्या व्यक्त करण्यापासून आणि देश सोडण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलं. जफरनी असं काय केलं होतं कि त्यांच्याच मातृभूमीतलं सरकार त्यांना अशी सजा देत होतं ?