Skip to main content

उचापतखोर हेनरी रेव्हिंग्टन

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 01/09/2018 01:04 या दिवशी प्रकाशित केले.

उचापतखोर हेनरी रेव्हिंग्टन

इतिहास तज्ज्ञ गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ‘श्री राजाशिवछत्रपती भाग 1 व 2 आणि इंग्रजीतील ग्रंथ Shivaji His life and Times’ या तीन संदर्भातून साकार एक उपद्रवी व्यक्तिमत्व...

पन्हाळ्यावरून महाराजांच्या सुटकेचा व पावनखिंडीतील लढ्याचा भाग “मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून - वाटाडे” या लेखमालेतून सादर केला होता. त्यावेळी इंग्रजांनी तोफातून गोळे दागायाला सुरवात केल्यावर महाराजांना गडावरून लवकर सुटका करायला आखणी करावी लागली असावी, असे म्हटले गेले होते.

पावसाळी भटकंती : भुषणगड ( Bhushangad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 31/08/2018 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
सातारा जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे "औंध". रहाळात प्रसिध्द असणारी आणि नवरात्रात गर्दी होणारे यमाईगडावरचे यमाईचे मंदिर, गडाच्या निम्म्या उंचीवर असणारे छोटेखानी पण अप्रतिम असे म्युझियम, गावातील पंतप्रतिनिधींचा राजवाडा आणि शेजारचे यमाईचे मंदिर हे सर्व पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते.

DIY : मिपावर प्रदर्शित करण्यासाठी साठी फोटोंचा स्लाईड शो तयार करणे. १

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 30/08/2018 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपावर लिखाण करताना काहीवेळा भरपूर फोटोंचा वापर करावा लागतो. विशेषतःभटकंती आणि पाककृतींच्या धाग्यांची तर ती गरजच असते. अशाप्रकारे जास्ती फोटोंचा समावेश असलेल्या धाग्यांची लांबी फारच वाढत असल्याने मोबाईल वर असे धागे वाचताना थोडा त्रास होतो. नुकत्याच पूर्ण झालेल्या माझ्या ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव ह्या मालिकेतील चौथ्या भागात (थोडा हात आखडता घेऊन सुद्धा) १०० फोटो असल्याने, तो भाग मोबाईलवर वाचताना येणाऱ्या समस्येबद्दल श्री कंजूस ह्यांनी प्रतिसादात कळवले होते.

गूगल आणि मायक्रोसॉफ्ट स्पर्धेची क्षेत्रे

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 30/08/2018 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
मायक्रोसॉफ्ट आणि गूगल या सध्याच्या सॉफ्टवेअरमधल्या दोन मोठ्या कंपन्या. मायक्रोसॉफ्ट मुख्यतः डॉस नावाच्या ऑपरेटिंग सिस्टीमपासून प्रसिद्धीस यायला सुरुवात झाली.

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ५

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 29/08/2018 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक https://www.misalpav.com/node/43088 https://www.misalpav.com/node/43118 https://www.misalpav.com/node/43144 https://www.misalpav.com/node/43170 मागील प्रकरणात आपण म्हटल्याप्रमाणे आता ह्या भागात आपण फ्रांझ फर्डिनांडच्या खुनानंतरच्या घटना कशा कशा घडत गेल्या, आणि त्यांचे पर्यवसान युद्ध भडकण्यात कसे झाले त्याचा इतिहास पाहणार आहोत.

वाटणी - एक लघुकथा

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 29/08/2018 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
त्या माणसाने स्वतःच्या मनाशी ठरवले - हीच मोठी लाकडी पेटी न्यावी. उचलण्याचा प्रयत्न केला तर पेटी एक इंचही हलली नाही. अवजड पेटीशी झटापट करत असतांना दुसरा त्याला बघत होता. ह्या दुसऱ्याला स्वतःसाठी काही सापडले नव्हते. - 'मी मदत करू का तुला?' त्याने पहिल्याला विचारले. पहिला तयार झाला. मजबूत हातांनी पेटी उचलून पाठीवर ठेवली. पहिल्याने फक्त हात लावला जरासा. दोघे बाहेर निघाले. पेटी फारच जड होती. उचलणाऱ्याच्या पाठीला कळ लागत होती. त्याचे पायही दुखू लागले. पण पेटीत असलेल्या घबाडातून मिळणाऱ्या वाट्याच्या अपेक्षेमुळे तो त्रास सहन करायला तयार होता.

युरोपच्या डोंगरवाटा ४: ग्रीसच्या क्रिटी बेटावरील समारिया घळ (Samaria Gorge, Crete)

लेखक निशाचर यांनी बुधवार, 29/08/2018 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १ युरोपच्या डोंगरवाटा २: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) उर्वरित भाग युरोपच्या डोंगरवाटा ३: नॉर्वेतील एक अविस्मरणीय बसप्रवास अनेक जागांची, देशांचीही आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. जसं ग्रीस म्हटलं कि आठवतो तो निळाशार समुद्र, बेटं आणि अक्रोपोलिससारखे प्राचीन अवशेष. ग्रीस हा युरोपातील पर्वतीय देशांपैकी एक असला तरी पर्यटकांमध्ये ग्रीस ट्रेकिंगसाठी विशेष प्रसिद्ध नाही. याला अपवाद म्हणजे ग्रीसचं क्रिटी बेट. ग्रीसच्या अनेक बेटांपैकी क्रिटी हे आकाराने आणि लोकसंख्येनेही सगळ्यांत मोठं. युरोपातील जुन्या मिनोअन संस्कृतीच्या पुरातन वास्तू, तसेच उत्तर आणि पूर्व किनार्‍यांवरचे सागरी पर्यटन ही इथली मुख्य आकर्षणे. त्याचबरोबर पूर्वपश्चिम पसरलेल्या या बेटावरील पर्वतांमधील गुहा, घळी, घाटवाटासुद्धा भटक्यांना खुणावत असतात.

शिरवळ

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 28/08/2018 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
इंडिया-इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती. इंग्लंडचे फलंदाज टिच्चून फलंदाजी करत होते. आतापर्यंत चौथ्या दिवशीच्या पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या डावांत ३ बाद २९८ धावा झालेल्या. इंग्लंड १२७ धावांनी पिछाडीवर होता आणि कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात इंग्लंडला यश येईल असेच एकंदरीत चित्र होते. मी लॉंगऑफला उभा होतो. विकेटमागे धोनी, ही जोडी कशी फोडावी या विचारात होता. ॲलिस्टर कुक जरा चाचपडत होता पण उपुल थरंगा अगदी फॉर्मात बॅटींग करत होता. हरभजनला अगदी निष्प्रभ करून टाकले होते त्याने. तरी हरभजननेही अजून हार मानली नव्हती. अचानक हरभजनने त्याची नेहमीची बॉलींग ॲक्शन सोडून मिडीयम फास्ट टाकायला सुरूवात केली.

तीन देवियां - भाग १

लेखक Prakashputra यांनी मंगळवार, 28/08/2018 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
मला दहावीपर्यंत जरा अक्कल कमीच होती, मुली म्हणजे तापदायक आणि त्रासदायक विषय वाटायचा. वर्गात मी हुशार समजला जायचो, म्हणून काही मुली गणित, सायन्सचे प्रश्न घेऊन यायच्या, पण मी त्यांना काहीच भाव द्यायचो नाही. त्याशिवाय मी नाटक, भाषण यात भाग पण घ्यायचो आणि तिथेपण मुलींबरोबर काम करायला लागायचे, पण या सगळ्या अपूर्व संध्या मी वाया घालवल्यात. तर तात्पर्य काय मला दहावीपर्यंत या विषयात काही अक्कल नव्हती. बायकोचे असे म्हणणे आहे कि मला अजूनही कोणत्याच विषयात काहीच अक्कल नाही. असो, परत कथानकाकडे वळू . पण अकरावीत काहीतरी एकदम बदल झाला, मुली म्हणजे काहीतरी गोड, सुंदर गोष्ट वाटू लागली.