Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०१८ - समारोप

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 24/09/2018 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर जी एक हुरहुर असते, तशी काहीशी भावना श्रीगणेश लेखमालेचा समारोप करताना आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही मिपावर श्रीगणेश लेखमाला-२०१८ आयोजित केली होती. यंदा 'DIY - Do It Yourself - केल्याने होत आहे रे' अशी संकल्पना घेऊन लेख मागवले होते.

विसर्जन

लेखक मयुरी चवाथे-शिंदे यांनी सोमवार, 24/09/2018 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
विसर्जन अनंत चतुर्दशीची संध्याकाळ. बाप्पाला निरोप द्यायला बरेच जण त्या समुद्रकिनारी जमले होते. बाप्पाने जाऊच नये अस वाटत असताना आता गेला नाही तर पुढच्या वर्षीच्या पुनरागमनाची ओढ कशी लागेल? त्यामुळे जड अंतःकरणाने त्याच्या विसर्जनाप्रीत्यर्थ डोळ्यात अश्रू घेऊन सगळे त्याला पाहत होते. “ती" मात्र रडत होती अगदी हमसून हमसून. २४-२५ वर्षांची असावी बहुतेक. गळ्यात साधस मंगळसूत्र आणि बाकीही अलंकार खोटेच पण अगदी लहान मुलासारखी रडत होती. तिची समजूत काढायची ? अरे पण लहान बाळ थोडीच आहे ? तरीही सासू सासरे समजावत होते.

दिवाळी अंक २०१८ - आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 24/09/2018 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत. गेली दोन वर्षं आपण दिवाळी अंकामध्ये एक विशेष विभाग जोडतो. आत्तापर्यंत 'रहस्यकथा' (२०१६) आणि 'व्यक्तिचित्रं' (२०१७) हे विभाग झाले आहेत. सलग दोन वर्षं हे झाल्यामुळे यंदा बदल म्हणून दिवाळी अंक मूळ स्वरूपात, म्हणजे मुक्त, असावा असं योजलं आहे. तर दिवाळी अंकाला काही विषय, थीम नाही. 'सकस आणि / किंवा रोचक लिखाण' हे दोनच मापदंड आहेत.

नको जाऊ रे ...

लेखक कलम यांनी सोमवार, 24/09/2018 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
काय मिळविसी कान्हा मजला सोडूनिया एकटी यमुना तीरी राधा रडते शोकाकुल बासरी प्रेम तुझे ते खरे असोनि तू का जवळी नसे ही मथुरा आज का मला स्मशानापरी भासे कशी परीक्षा असे मुकुंदा वेड्या प्रितीची कसले बंधन कसले अंतर कसल्या रीतीची नको जाऊ रे सोडून कान्हा अश्रू तुला सांगती नको तुझा तो विरह अन नको श्वास तुझ्यावाचूनि अमर असे हे प्रेम आपुले अधीर परी आशा अरे तुला का आज ना कळे या प्रेमाची भाषा शपथ तुला परी देवू न शकते तव कर्तव्यापरी वाट पाहील हा प्राण तुझी बघ याच यमुना तीरी

अशी ही बनवाबनवी

लेखक Prakashputra यांनी सोमवार, 24/09/2018 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज व्हाट्सअँप वरती एक मेसेज आला कि 'अशी ही बनवाबनवी' ला ३० वर्षे पूर्ण झाली. ते वाचून मला बनवाबनवीबद्दल काहीतरी लिहावे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. २३ सप्टेंबर १९८८ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या पिक्चरला लोकांनी अफाट प्रेम दिले. हा पिक्चर अफाट गाजला आणि अजूनही गाजतोच आहे. 'Cult Following' असं जे म्हणतात ते या पिक्चरला मिळाले. मी दादा कोंडक्यांच्या जमान्यातला नाही, त्यामुळे त्यांचे चित्रपट किती गाजायचे याचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही, पण त्याबद्दल ऐकून आहे. तेवढेच किंवा जास्तच प्रेम बनवाबनवीला मिळाले.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ९

लेखक रा.म.पाटील यांनी रविवार, 23/09/2018 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate Your Love) कथा - ९ गणेश चतुर्थी.. (प्रेमाची ओढ..) रेखीव डोळे, डोळ्यातील चमक, चेहऱ्यावरचे तेज, सुंदर गौरवर्ण, जणू सौन्दर्याची मूर्तीच होती ती.. खरंतर तो गणपतीची मूर्ती निवडत होता आणि तिथे त्याला ती दिसली.. आणि त्याला गणपतीची जी मूर्ती आवडली होती तीच मूर्ती तिलाही आवडली होती, पण दुकानात तशी एकच मूर्ती शिल्लक होती.. त्याने मात्र ती मूर्ती तिला देण्यास सांगितले.. कारण त्याने निवडली होती आता जिवंत सौन्दर्याची मूर्ती म्हणजेच ती.. जिच्यासाठी शहरातल्या साऱ्या गणपतीपुढे हात जोडून तो नवस बोलायला तयार होता..

गीत - गँ गणपतये

लेखक कौस्तुभ आपटे यांनी रविवार, 23/09/2018 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
॥श्री॥ गँ गण ण ण ण,गँ गण ण ण ण गँ गण ण ण ण, गँ गणपतये देवांमाजी, अग्रदेव तू, त्रिवार वंदन स्विकार अमुचे॥धृ॥ हे शिव-शक्तिच्या संगमा हे बुद्धि-युक्तिच्या अग्रजा त्या श्रुती-स्मृतिंचा पाठक अन तू वेदांची रे मंत्रणा ! विद्या-कला ठायी तुझ्या तू सर्वेश्वर तुज वंदना ॥१॥ तू श्रेष्ठ लिपीक तुजला गती हे देवांच्या सेनापती रविचंद्रधिनायक विश्वही तुजला सुर्याने ओवाळती सिद्धेश्वरा, विघ्नेश्वरा, हे करूणाकर , तुज मोरया ॥२॥ पदी मंजुळ घुंगुर नादतो कटिबंध भुजंगही शोभतो हे सुंडतुंड, गजगंड तिलंकीत मूषक वाहन वाहतो लंबोदरा, मनमोहना, तू दृष्टि राख, हीच कामना ॥३॥ गीत - कौस्तुभ गाणे इथे ऐकत येइल
काव्यरस

DIY : मिपावर प्रदर्शित करण्यासाठी साठी फोटोंचा स्लाईड शो तयार करणे. २

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 22/09/2018 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मागच्या DIY : मिपावर प्रदर्शित करण्यासाठी साठी फोटोंचा स्लाईड शो तयार करणे. १ ह्या भागात आपण ६ Landscape फोटोंचा स्लाईड शो कसा करावा ते बघितले. आता ह्या भागात आपण ६/१२/१८ Landscape आणि portrait फोटोंचे स्लाईड शो तयार करून ते मिपावर कसे प्रदर्शित करायचे ह्याची माहिती घेऊया. खालच्या मेनू बार वरून आपल्याला किती फोटोंचा आणि कुठल्या प्रकारचा स्लाईड शो तयार करायचं तो पर्याय निवडा.