Skip to main content

देव पावला

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 27/09/2018 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
देव पावला मला जागरूक देवस्थानात जायला खुप भिती वाटते. शिरडी असो वा सिद्धीविनायक. मागे त्र्यम्बकेश्वर ला चार तास रांगेत उभे राहील्यावर दर्शनाच्या वेळी केवळ पैसे दिले नाहीत म्हणून हाकलूंन देणारा पुजारी आठवतो. पंढरपुर आणि तिरुपति बद्दल फक्त ऐकून आहे. अजून जायची हिम्मत झालेली नाही. मुद्दाम कबुल करतो की ही भिती देवाची नसून देवपण पांघरलेल्या पुजारी, भटजी, पंडित, गुरव, शास्त्री ह्यांची आहे. तूफान गरदीची आहे. देवाचे दर्शन म्हणजे देवाची मूर्ती पाणवलेल्या डोळ्यांनी साठवून घेणे आणि ती प्रतिकृति हॄदयावर झेरोक्स मारल्यासारखी छापून घेणे इतकीच माझी माफक अपेक्षा असते.

पालकाची सुकी भाजी - ज्वारीचं पीठ वापरून

लेखक योगेश कुळकर्णी यांनी बुधवार, 26/09/2018 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: - पालकाची एक जुडी (साधारणपणे २५० ग्रॅम) - दोन मध्यम टोमॅटो - ८-९ लसूणपाकळ्या - सुक्या लाल मिरच्या ३/४ - हळद - मोहोरी - हवं असेल तर लाल तिखट - मीठ - तेल - चिमटीभर'च' साखर - लागेल तसं ज्वारीचं पीठ (तरी प्रमाण म्हणून २-३ मोठे चमचे लागेल) कृती: - पालक धुवून ओबडधोबड चिरून घ्यावा - टोमॅटो ही धुवून मध्यम आकारात चौकोनी चिरावा - लसणी सोलून ठेचून घ्याव्यात.

भात घ्या की !!

लेखक सतिश पाटील यांनी बुधवार, 26/09/2018 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी मी आणि आई माझ्या सासुरवाडीला आलो होतो, सासू आणि बायको काही कामासाठी 2 दिवस बाहेर गेल्या होत्या, घरी मी, माझी आई, माझा सासरा आणि सासऱ्याची आई असे 4 जण जेवायला बसलो होतो, मी नेहमीच खूप कमी जेवतो अशी माझ्या सासरकडच्यांची तक्रार असते. आजही मी कमीच जेवत होतो, माझ्या ताटात वाढलेला भात आता संपायला आला होता, तर सासू आणि बायकोची कमी भरून काढण्यासाठी सासरे मला म्हणाले "अहो जावई बापू भात घ्या भात" मी म्हटले नको बास झालंय मला, सासरे म्हणाले अहो घ्या की मी म्हटले अहो नको पॉट भरलंय गच्च. सासरे नुसतेच हसले म्हणाले "आव जावई बापू भात मला पायजेय, भात घ्या हिकडं" !!!!! बोंबला तिच्यायला

भुरळ

लेखक अनाहूत यांनी बुधवार, 26/09/2018 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने त्याचे फेसबुक अकाउंट open केलं . एक friend request होती त्याने ती check केली . sweet sneha या नावाने friend request होती . या fake accounts च काय करायचं आणि कशाला कोण उगाचच मुलीच account बनवून बसतात काय माहित आणि त्यातून वर आणखी friend request टाकत बसतात काय माहित . पण जाऊदे आपण तरी एव्हढा कशाला विचार करायचा . करूया आपणही accept . काय फरक पडतो . त्याने accept वर click केलं आणि तो स्वतःची timeline check करू लागला. तेच ते नेहमीच , बस दोघाचे नवीन pic आणि त्याच त्या नेहमीच्या शेकडॊवेळा repeat झालेल्या posts ....

भेटी लागी जीवा: आत्तापर्यंत काय घडले?

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/09/2018 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
भेटी लागी जीवा: आत्तापर्यंत काय घडले? लेखक: निमिष सोनार, पुणे सोनी मराठी या वाहिनीवरची "भेटी लागी जीवा" ही खूप चांगली सिरीयल आहे.

आधारचा निकाल लावला :) जबडा ठेवा पण दात नकोत !!

लेखक माहितगार यांनी बुधवार, 26/09/2018 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय घटनेच्या अनुच्छेद २१ ची व्याप्ती वाढवून खासगीपणाच्या आधीकाराला सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच खासगीपणाचा आधिकार घटनात्मक असल्याचे सांगितले होते. अगदी अलिकडे म्हणाल तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशांनी, समाजकारण-राजकारण- कायदेमंडळे आपले कायदे व्ययव्स्थित बनवण्यात कमी पडल्यामुळे न्यायालयांवर निर्णय सोडत असल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. हि टिका अगदिच चुकीची आहे असे नाही पण जिथे कायदामंडळे व्यवस्थित काम करतात तेथेही न्याय व्यवस्थतेची दखलंदाजी अनाकलनीय आहे. आज आधार कार्ड बाबतचा निर्णय येतो आहे.

फरसाणाची भाजी

लेखक योगेश कुळकर्णी यांनी मंगळवार, 25/09/2018 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
फरसाण किती आहे त्यानुसार जरा प्रमाणं बदलतील. तरी एक परिमाण म्हणून... - दोन-अडीच मुठी भरून कुठलंही फरसाण - दोन टोमॅटो - दोन कांदे - लाल तिखट - मीठ - तेल - जिरे - चिमटीभर साखर - कोथिंबीर वरून घ्यायला साधारणपणे पावसाळ्याच्या दिवसांत फरसाणादी प्रकार सादळतात आणि मग ते कुणी खात नाही. एकदिवस हा प्रकार करून आणि खाऊन पाहीला; अफलातून चव जमली होती; म्हणून इथे देतोय. लोखंडी कढई सणसणून तापवून त्यात जरा तेल तापवावं आणि जिरं चांगलं फुलवावं; तसं ते फुललं की मगच बारीक चिरलेला कांदा, कडा लालसर तांबूस होईतो परतून घ्यावा. यात आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून मसाला तेल सोडेस्तोवर परतावं.

हिंदू खतरे में

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 25/09/2018 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी कुठलाही देश नसेल पण भारत हा एक असा देश आहे की जिथे हिंदू खतरे में आहे. हिंदूंना हिंदू म्हणून जगणे या देशामधे मुश्किल झालेले आहे. गणपतीचा उत्सव आला की स्पीकर्स लावायचे नाहीत. रस्त्यावर खड्डे खणायचे नाहीत. रस्त्याच्या मधे मांडव घालायचे नाहीत. अशी अनेक बंधने हिंदूंवर घातली जातात. आता थोड्या दिवसात नवरात्र येईल. नवरात्रीच्या वेळेलासुद्धा हिंदूंच्या व्यक्त होण्यावर, अभिव्यक्तीवर बंदी येईल. नऊ दिवस हिंदूंनी दांडिया खेळायचा नाही.

रंग आयुष्याचे..

लेखक कलम यांनी मंगळवार, 25/09/2018 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
अरे किती प्रकारची माणसं असतात आपल्या भोवताली. फक्त रंग-रूप, जातपातच नाही तर हजारो स्वभावांच्या लाखो छटा असणारी. कधी राग, द्वेष तर कधी प्रेम आणि आदर यांचे बदलत जाणारे मुखवटे. कधी खरेपणात लकाकणारे तर कधी खोटेपणाच्या बुरख्यात काळवंडलेले. कधी कधी तर असं वाटत की आपलं आयुष्य म्हणजे मनाच्या कोऱ्या कागदावर विचारांच्या कुंचल्याने आणि भावनांच्या वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेली चित्रेच जणू. अरे पण ही चित्रे पण कशी, तर हर घडीला आपले रंग आणि आकार बदलणारी. आपण सगळेच चित्रकार अगदी जन्मल्यापासून सरणावर जाईपर्यंत.

अवघड (शतशब्द सत्यकथा)

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 25/09/2018 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
ती वय २५ अवघडलेली पोट एवढं पुढे आलेलं थकलेली पण चेहऱ्यावर समाधान. नऊ महिने भरत आलेले, नवऱ्याचा आधार घेऊन चालत आली होती. बाळाचे वजन सव्वातीन किलो बाकी गर्भजल आणि गर्भाशयाचे वजन मिळून पाच साडेपाच किलोचा भर पोटावर. तपासणी करून सर्व व्यवस्थित आहे समजून आंनदाने हळूहळू स्वप्नाळू पावले टाकीत गेली तिच्यामागून आलेली दुसरी, वय ५२, पोट एवढं पुढे आलेलं. दोन्ही मूत्रपिंडे निकामी झालेली. कष्टाने पावले टाकीत आली.आता ऑफिसला जायला फार त्रास होतो सांगत होती. तपासणीत पोटात चार पाच लिटर पाणी आढळले. थोडक्यात मूत्रपिंडांचे काम अजूनच कमी झालेले. अहवाल घेऊन कष्टाने जाड पावली भविष्याची चिंता करत गेली.