Skip to main content

क्राईम डायरीज : एक शापित नातं : भाग २

लेखक कलम यांनी मंगळवार, 16/10/2018 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
"शांभवी पुढच्या महिन्यात आपल्या नवीन ऑफिस आणि प्रोजेक्ट संदर्भात आपल्याला फ्रँकफर्ट ला निघायचं आहे तेव्हा इकडची सगळी कामं आटोपून घे आणि उरलेली कामं टीम ला विभागून दे." फोन वरून अथर्व शांभवीला सूचना देत होता. "ठीक आहे अथर्व. नेहमीप्रमाणे मी प्रेसेंटेशन पण तयार करते." असं म्हणून शांभवीने फोन खाली ठेवला आणि ती आपल्या कामाला लागली. अथर्व जॉईन झाल्यापासून एका वर्षातच ए बी एस ग्रुप ने बरीच मोठी मजल मारली होती.

सध्याची पत्रकारीता

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 16/10/2018 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी आमच्या एका मित्राने दहावीच्या मुलांसाठी करियर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली. मित्राने माध्यमांशी संपर्क साधला आणि सांगितले की आपण येऊन आमचा कार्यक्रम कव्हर करा. पण टीव्हीवाल्यांनी त्याबाबत उत्साह दाखवला नाही. त्यांचे म्हणणे, अशा कार्यक्रमांमधे कुठलाही व्हिज्युअल कंटेंट मिळत नाही. म्हणजेच कॅमेराने टिपावे अशी कुठली गोष्ट सापडत नाही.

रफाल - भाग १

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 16/10/2018 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
रफाल रफाल करार पार्श्वभूमी रफाल करारा बाबत बऱ्याच लोकांनी लिहिले आहे व त्याच्या बद्दल बरेच बोलले जात आहे. काँग्रेसने त्याला भ्रष्टाचाराचा करार असे म्हणत बोफर्सच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. संरक्षण खरेदी ही नेहमीच महागाची असते. ह्याचे कारण संरक्षणात वापरली जाणारी वेगवेगळी साधने, दारुगोळा, तोफा, विमाने इत्यादीचे तंत्रज्ञान हे अग्रणी असते व ते मिळायला अवघड.

असेलही वा नसेलही...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 16/10/2018 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
असेलही वा नसेलही... दोनच या शब्दांवर सारे जगणे अपुले वसेलही... धर्मच गेला देऊन उत्तर शाश्वत वैश्विक प्रश्नाचे. परी न विसरू शकला डोळे कधीच नंतर द्रोणाचे. मनात त्याच्या खंत तयाची रुतून बसली असेलही.... असेलही वा नसेलही दोनच या शब्दांवर सारे जगणे अपुले वसेलही... डोळ्यांमध्ये प्राण आणुनी कुणी विचारी आज तिला, पहा बदललो पुरा राणि मी आवडेन का अता तुला? हसून उत्तर टाळू जाता नयनी पाणी नसेलही... असेलही वा नसेलही दोनच या शब्दांवर सारे जगणे त्यांचे वसेलही...
काव्यरस

बाजार – बजारना याळ

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/10/2018 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे ग्रामीण भागात आठवडी बाजार भरतो. मात्र प्रत्येक गावात बाजार भरत नाही. आजूबाजूच्या दहा पंधरा खेड्यांच्या मध्यभागी असलेल्या थोड्या मोठ्या खेड्यात बाजार भरत असतो. आजूबाजूच्या गावांचे हे बाजार भरणारं गाव केंद्रच समजलं जातं. बाजाराभोवती देण्याघेण्याचे अनेक व्यवहार होत आले आहेत. ‍विशिष्ट बाजाराच्या गटातल्या गावांत मजूर लोकांची मजूरी प्रत्येक आठ दिवसांनी बाजाराच्या दिवशी चुकती करायची असते. बाजाराच्या दिवशी शेतमजूर दुपारपर्यंत एक पारग शेतात काम करतात. बाजारासाठी दुपारून सुट्टी घेतात.

च वै तु हि

लेखक पुष्कर यांनी सोमवार, 15/10/2018 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत्वाने वापरतात की त्यांचे वैशिष्ट्य कमी होऊन ते सामान्य होऊन जातात. आता, उदाहरणार्थ 'कुठेतरी' हा शब्द घ्या. सामान्यपणे हा शब्द स्थलवाचक आहे. पण सार्वजनिकपणे बोलणाऱ्यांना इतक्या साधेपणे हा शब्द वापरणं अजिबात मंजूरच नाहीये. एखादा वक्ता तावातावाने आपले विचार मांडताना श्रोत्यांच्या भावनांना हात घालतो आणि म्हणतो, 'मग हे सगळं असं चालू असताना आपलंही काही कर्तव्य आहे हा विचार आपण कुठेतरी करायला हवा'...

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 15/10/2018 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

पराजय नव्हे, विजय!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 14/10/2018 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या एका उंच कड्याच्या पायथ्याशी वसलेलं कोकणातलं एक टुमदार गाव... हा कडा असा उभा, सरळसोट उभा, की त्याच्या पायाशी उभे राहिल्यावर आपल्याला या निसर्गचक्रातील आपल्या क्षुद्रपणाची आपोआप जाणीव व्हावी, मनावर साचलेली अहंपणाची सारी जळमटे साफ झाल्याचा साक्षात्कार व्हावा... तर, त्या गावात त्या दिवशी हा अनुभव घेऊन मी तिथल्या शाळेत पोहोचलो. निमित्त खासच होतं. लांजा राजापूर संगमेश्वर तालुका विकास मंडळ नावाची एक संस्था गेल्या सुमारे पाव शतकापासून मुंबईत काम करते.

भक्त आणि त्याचा देव!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 14/10/2018 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
शाळकरी वयात असतानाच कधीतरी तो एका देवळात गेला. शांत, सुंदर संध्याकाळ... झांजांची किंकिण, मृदंगाचा मंजुळ नाद आणि भक्तीने भारावलेले सूर... त्या क्षणाची त्याच्या मनावर जादू झाली, आणि तो कृष्णमय झाला. त्याची कृष्णावर भक्ती जडली, आणि त्याने आपले सारे जगणे कृष्णार्पण करावयाचे ठरविले. आता आपण आपले उरलो नाही, आपल्या हातून जे काही घडेल त्याचा करविता तो कृष्णच असल्याने, आपला सांभाळही तोच करेल अशी त्याची भावना झाली आणि तो आपल्या देवाच्या भक्तीत बुडून गेला. त्याचा समर्पणभाव पाहून लोक अचंबित होऊ लागले. धन्य तो भक्त आणि धन्य तो त्याचा देव...