Skip to main content

राया उशीर का जाहला...

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 09/11/2018 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
रात सरली पहाट झाली झुंझुरल्या सार्‍या दिशा झोप नाही ,जीव झाला सखया वेडापिसा वाट पहाते तुमची राया, उशीर का जाहला सख्या सांगा उशीर का जाहला ....... काल दुपारी राघू आला निरोप तो घेउनी मी मैना हरखून गेले सांगावा ऐकुनी ऐकुन माझे रूप खुलले, चमचम जणू चांदणी दिवा ठेवते दो नयनांचा तुमच्या वाटंला राया उशीर का जाहला..... ...... विडा केशरी सायंकाळी , काया माझी कातकेवडा मिठीत घेता विरघळले मी, ओठ साखर खडा. खयाल येता किणकीण वाजे, हाती हिरवा चुडा हुरहूर का ही मनी दाटली , जीव पिसा जाहला....
काव्यरस

भयकथा: तुला पाहते रे!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 09/11/2018 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
मनोजला इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षी हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर स्वतंत्र रूम घ्यावीशी वाटली. दोन मित्रांसह तो रूममध्ये राहू लागला. किचन आणि मोठा हॉल अशा रचनेच्या घरात ते तिघेजण रहात होते. भाडे तिघांमध्ये विभागले जात असल्याने परवडत होते आणि ही रूम त्या एरियातल्या इतर रूम्सपेक्षा खूप स्वस्तात मिळाली होती. तिघांनी रुममध्ये टिव्ही मुद्दाम ठरवून घेतला नव्हता, त्याऐवजी एक स्वस्त वाय फाय घेतले होते. पैसा आणि वेळेची बचत हे हेतू त्यामागे होते. मनोजचे आईवडील गावी होते. अधून मधून त्याला भेटायला येत. पहिल्या वर्षी 60 टक्के मार्क मिळाले होते म्हणून आईवडिलांनी चांगला नवीन स्मार्टफोन घेऊन दिला होता.

माध्यमांच्या प्रगतीचा प्रवास

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 09/11/2018 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
(सूचना: हा लेख लिहितांना मी वापरलेली नावे किंवा वर्ष/साल मला उत्स्फूर्तपणे लेख लिहितांना जशी आठवली, सुचली तशी लिहिली आहेत. मुद्दाम त्यात अचूकपणा येण्यासाठी आणि नावांमध्ये आणखी भर घालण्यासाठी गुगलवर मी काहीही सर्च केलेले नाही नाहीतर त्यात कृत्रिमपणा आला असता. म्हणून कदाचित एखादे वर्ष किंवा कार्यक्रमाचे नाव इकडे तिकडे, पुढे मागे होऊ शकते, याची नोंद घ्यावी! उल्लेख केलेल्या माध्यमातली काही नावे, त्यावर मी व्यक्त केलेली मते आणि आवड नावड या माझ्या वैयक्तिक आहेत याची नोंद घ्यावी!

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ११

लेखक रा.म.पाटील यांनी गुरुवार, 08/11/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - ११ ( Decorate Your Love ) दीपावली.. प्रेमाचा गोडवा.. 'लाडू..' दिवाळीची गोड चव.. पण ती चव आता त्याच्यासाठी एक कडू आठवण झाली होती.. त्यामुळेच की काय त्याने लाडू खायचे सोडून दिले होते, त्याच्या आईला राहून राहून आश्चर्य वाटायचे की एकेकाळी ह्याच लाडूसाठी हट्ट धरायचा तो हाच का, मग आता इतका तिटकारा का आलाय त्याचा..? माझ्या हातच्या लाडूची चव बिघडली तर नाही ना.! मागच्या दिवाळीत त्याच्या आईने त्याला ह्याबद्दल विचारून पाहिले होते..

Cold Blooded - ७

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 08/11/2018 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी साडेआठ वाजता वाजता रोहितने आपलं हॉटेल चेक-आऊट केलं आणि एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. तासाभराने तो एअरपोर्टवर जवळपास पोहोचला असताना त्याच्या मोबाईलवर कदमांचा फोन आला. "गुड मॉर्निंग! बोला कदम....." "सर....." "आर यू शुअर कदम? तुमची पूर्ण खात्री आहे?" "येस सर ....." कदमांच्या शब्दाशब्दाला त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. गेले दहा - बारा दिवस दिल्ली, सिमला, मंडी, कलकत्ता अशी सुरु असलेली अथक धावपळ आणि इन्क्वायरी आणि त्यातून पुढे आलेली माहिती याची नव्याने सांगड घालणं आता क्रमप्राप्तं होतं! डॉ. भरुचांवर त्याचा पूर्ण विश्वास होता.

नवी सायकल आणि पहिली सेंच्युरी

लेखक mayu4u यांनी गुरुवार, 08/11/2018 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
(मी पहिली सायकल घेतली तेव्हाचं हे लेखन... अलीकडेच नवीन सायकल घेतली आणि पहिल्यांदाच १०० किमी ची राईड मारली. या अनुभवाविषयी लिहिण्यासाठी सरपंचांनी सुचवलं, तेव्हा मिपाकरांच्या "सायकल सायकल" या कायप्पा समूहावर केलेलं लेखन) श्री मामा प्रसन्न आनंदरावांच्या आशीर्वादाने, सर्पंचांच्या सूचनेनुसार, सर पाध्ये सर यांच्या सल्ल्याने आणि ग्रुपातल्या सर्वांच्या प्रेरणेने आज पहिली सेंच्युरी झाली. या शतकाचं श्रेय सम्पूर्णपणे या ग्रुप चं आहे.

शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 07/11/2018 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद (१ ते २९ श्लोक शिखरिणी वृत्तात आहेत) मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८११०७ १ महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः . तुझा ज्ञात्यांनाही गवसत नसे पार म्हणता स्तुती ब्रम्हादींची उचित न ठरे ज्ञान नसता मला वाटे गावे अवगत जसे स्तोत्र तव ते शिवा स्वीकारावे हृदगतच माझे सरस हे २ अतीतः पंथानं तव च महिमा वाङ्मनसयोः अतद्व्यावृत्त्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न

तोळा तोळा

लेखक लौंगी मिरची यांनी बुधवार, 07/11/2018 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
ओठांवरचे शब्द बोलके पापण्यांचे खेळ ते बालिश तुझ्या मिठितले श्वास जिवंत स्पंदनातुनहि बरसतो आशीष... तुझ्या माझ्यातली प्रित बहरतेय , मोहरतेय , दरवळतेय त्या रातराणी सारखी . उगाच फुलुन येते रात्रीची .गंधाळलेला आसमंत , त्यात ती एकटीच नसते , सोबत असते चांदण्यांची . शांत रात्रीची , मुग्ध रातकिड्यांची . तुला आठवतय ?पहिल्यांदा पाहिलं तुला तेव्हा थबकले होते मी , नजरेत अडकलास माझ्या , बरेच दिवस फक्त तुला शोधण्यातच घालवले , आणि मग भेटलास , भेटलास तो हि असा , मुक्त ,स्वच्छंदि .. सतत गर्दि आजुबाजुला . वाट काढणहि मुश्किल होतय .

कूटकथा: पलीकडचा मी!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/11/2018 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा फोन आला होता काल. पैसे दे म्हणाला! आता काय सांगू तुम्हाला! त्याचे पैसे माझ्याकडून खर्च झाले. ज्या कारणासाठी घेतले होते त्यासाठी ते पैसे वापरले गेलेच नाहीत. दुसरीकडेच खर्च झाले. त्यामुळे त्या पैशांपासून जो फायदा होऊ शकला असता तो झालाच नाही...आणि आहे ते पैसेही गेले! काय करू आता? त्याचंही बरोबर आहे! तो म्हणजे शिरीष! एक वर्ष झालीत त्याच्याकडून पैसे घेऊन! सहा महिन्यांत मी अर्धे आणि एक वर्ष पूर्ण झाल्यावर उरलेले अर्धे असं कबूल केलं होतं! पण एक वर्ष लोटलं पण एक रुपयाही त्याला मी परत करू शकलो नव्हतो मी! मागच्या महिन्यात मात्र त्याने निर्वाणीचा इशारा दिला होता. गुंडांकरावी पिटून काढेल म्हणाला!

Cold Blooded - ६

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 06/11/2018 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या दिवशी सकाळी नऊच्या सुमाराला रोहित हेडक्वार्टर्सला पोहोचला तेव्हा कोहली त्याची वाटच पाहत होते. "सरजी, हा फिंगर प्रिंट्सचा रिपोर्ट! जवाहर कौलच्या घरात सापडलेली ती फिंगर प्रिंट ट्रेस झाली आहे." "प्रिंट ट्रेस झाली?" रोहितने अधिरतेने विचारलं, "कोणाची आहे ही प्रिंट?" "अल्ताफ हुसेन कुरेशी! हा अल्ताफ एक पैसे घेवून खून करणारा सुपारी किलर आहे सरजी! मूळचा तो उत्तर प्रदेशातल्या आझमगड जिल्ह्यातला आहे. तिथे त्याची प्रचंड दहशत आहे. आत्तापर्यंत त्याने सहा खून केले आहेत!