Skip to main content

सिंहगड

लेखक मनो यांनी शनिवार, 22/12/2018 05:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या चार-पाच वर्षात बऱ्याचदा असं वाटलं की सिंहगडाबद्दल लिहायला हवं. जुने कागद हुडकताना भरपूर नवे काही या गडाबद्दल सापडते, त्यातले जे काही अजूनही आठवते ते इकडे एक लेखात मांडतो आहे. लेख आवडला असेल तर प्रतिक्रियेत जरूर कळवा. पुढचा भाग - सिंहगडाची अखेरची लढाई आणि त्यानंतर ब्रिटिश काळातील एक अप्रकाशित जाहिरात टाकेन, जर उत्सुकता असेल तर ... सिंहगड म्हणले म्हणजे प्रथम आठवतात तानाजी मालुसरे आणि त्यांनी गाजवलेला पराक्रम. इथे अनेकदा शशिकांत ओक आणि इतरांनी त्याबद्दल लिहिण्याचा आग्रह केला होता, पण दुर्दैवाने तानाजीच्या पराक्रमाबद्दल फार थोडे अस्सल तपशील आपल्यापर्यंत पोहोचले आहेत.

बापाचे मुलीस पत्र..

लेखक प्रियाभि.. यांनी शुक्रवार, 21/12/2018 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
पोरी, देतो तुला आज माझ्या प्रेमाची शिदोरी कर स्विकार प्रेमाने ठेव जपून तू उरी.. जरी सांगे माय-बाप तुला जगायची रीत शिकशील तुझी तूही पुढे जगाच्या शाळेत.. पोरी, अंतरी ग तुझ्या प्रेम राहो निरंतर थारा द्वेषाला नसावा दूर राहुदे मत्सर दुःख दाबून उरात ठेव मुखावर हसू परी नसावी शरम कधी ढाळण्या

EVM

लेखक चिगो यांनी गुरुवार, 20/12/2018 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
(डिस्क्लेमर : हा लेख EVM बद्दलची माहिती देणे व त्याबद्दलचे गैरसमज दुर करणे, ह्या हेतूने लिहीण्यात येत आहे. सदर माहिती ही लेखकाच्या निवडणुकांबद्दलच्या अनुभवांवर तसेच भारत निर्वाचन आयोगाद्वारे बनवलेल्या नियम, प्रोटोकॉल्स आणि निर्देशांवर आधारीत आहे. कुणाही वाचकाला जर ह्या विषयावर सखोल माहिती हवी असेल तर ती माहिती भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना नम्र विनंती आहे, कि त्यांनी त्यांना असलेल्या शंकांना कृपया राजकीय वळण न देता विचाराव्यात.

चित्रपट सृष्टीत एकाच कलाकाराचे , एकाच नावाचे दोन चित्रपट....

लेखक srahul यांनी गुरुवार, 20/12/2018 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट सृष्टीत ब्रेक मिळणे , त्यानंतर यश मिळणे , त्यानंतर दीर्घ काळ टिकणे यासाठी नशिबाची साथ लागतेच , पण त्याच बरोबर परिश्रमाची तयारी , बदलाला सामोरे जाण्याची तयारी हे गुण लागतात. अशा प्रकारे काही कलाकारांची प्रदीर्घ कारकीर्द झाली त्यात एक योगायोग असा झाला त्यांनी एकाच नावाचे दोन सिनेमे केले. मला सापडलेली हि यादी आणी काही नवीन असेल तर ऍड करा. १)नास्तिक (१९५४) अजीत , नलिनी जयवंत नास्तिक (१९८३)अमिताभ बच्चन , प्राण , हेमा मालिनी , नलिनी जयवंत २)अफसाना (१९५१) अशोक कुमार (दुहेरी भूमिका),वीणा, कुलदीप कौर अफसाना (१९६६) अशोक कुमार , प्रदीप कुमार , पद्मिनी ३)हिफाजत (१९७३)विनोद मेहरा , आशा सचदेव , अ

"मोहिम बागलाणची" भाग पहिला

लेखक दिलीप वाटवे यांनी बुधवार, 19/12/2018 00:42 या दिवशी प्रकाशित केले.

"मोहिम बागलाणची"

दिवस पहिला

मुल्हेर, मोरागड, हरगड

महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटाची म्हणजेच आपल्या सह्याद्रीची मुख्य रांग नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यापासून सुरु होऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या पारगडापाशी संपते. या मुख्य रांगेच्या उत्तरेकडे असणार्‍या बागलाण तालुक्यात सेलबारी आणि डोलबारी नावांच्या दोन उपरांगांवर महाराष्ट्रातील उंचच उंच आणि चढाईस दमवणारे असे काही किल्ले आहेत. त्या भागात अहिराणी भाषा बोलली जाते. अहिराणीत बारी म्हणजे डोंगररांग ओलांडणारी वाट किंवा खिंड.

कॉलेज

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी मंगळवार, 18/12/2018 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज आयुष्यात अल्लड जीवनातून संजस्याकडे पडलेल पाऊल नादान मनाला किशोरी जीवाला तारुण्याची लागलेली चाहूल गुरुजनांनच्या सावलीत लागलेलं कोमल झाड प्राध्यापकांच्या सहवासात झालेली मैत्रीची वाढ बालपणी मैदानाची लागलेली कास कॉलेज जीवनात त्यात स्पर्धेची आस सिनिअर रुपी नात्यानं पडलेली त्यात भर त्यांच्या सहवासातून भेटलेला चारित्र्याचा आदर शालेय सवंगाड्यांच्या सहवास फुललेल्या मैत्रीच्या बागा कॉलेज कट्टयावर त्याला भेटलेली हक्काची जाग

मुंबईचे धडे - १

लेखक मालविका यांनी मंगळवार, 18/12/2018 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
२००५ साली बी कॉम ची परीक्षा दिली नि मी नवीन कोर्स करिता कोकणातून मुंबईला येऊन दाखल झाले. ठाण्याला काकांकडे राहण्याची सोय झाली. स्टेशनपासून काकांचं घर अगदीच जवळ होतं. तशी मुंबईला राहायची आणि मुंबईची सवय करून घायची हि पहिलीच वेळ. याआधी कधीतरी फिरायला म्हणून कुणाबरोबर तरी मी मुंबई पाहिलेली. मुंबई बाहेरची असल्याने लोकल जिथपर्यंत जाते त्याला सगळ्याला मुंबई म्हणायचे. माझा क्लास विद्याविहार स्टेशन जवळ होता. तेव्हा रोज ठाणे ते विद्याविहार रोज लोकलचा प्रवास करावा लागणार होता.

अडनिडी मुलं-३

लेखक जेडी यांनी सोमवार, 17/12/2018 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन .