Skip to main content

अडनिडी मुलं-४

लेखक जेडी यांनी बुधवार, 26/12/2018 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी ९:०० च्या दरम्यान बेल वाजली. आज कचरा घेणारी बाई लवकर आली कि काय म्हणत मी कचऱ्याच्या दोन्ही बादल्या घेवूनच दरवाजात धावले आणि दार उघडताच काळजात धस्स झाले. माझ्या घरी पूर्वी काम करणाऱ्या आणि माझ्या अडीनिडीला धावून येणाऱ्या मावशी दारात उभ्या होत्या. घरात पावूल कि दारात पावूल त्यांनी रडायला चालू केल. मलाही राहवले नाही. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागलो. मावशी तर धायमोकलून रडू लागल्या. मी गपा मावशी गपा एवढेच बोलत होते आणि त्या कशी गप्प बसू ओ मी म्हणून रडत होत्या. माझ्या टीनाने असा काय गुन्हा केला असेल ओ, काय म्हणून माझ्या लेकराला अशी शिक्षा म्हणून अजूनच रडू लागल्या.

साडेतीन शहाणे!!!

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 26/12/2018 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
काल २५ डिसेंबर २०१८.याच दिवशी २००९ साली ३ इडीयट्स हा सिनेमा रिलीज झाला होता.काल या सिनेमाने १०व्या वर्षात पदार्पण केलं.सिनेमाने त्यावेळी भरपूर गल्ला जमवला.भरपूर प्रबोधन करण्याचाही प्रयत्न केला. "जे आवडतं,भावतं त्यातंच करियर करा" हा बहुमोल सल्ला या सिनेमाने दिला.आपणही यातल्या सल्ल्यांनी तीन तास का होईना भारावून गेलो.अजूनही बरेचसे प्रबोधनपर प्रसंग आहेत. या सिनेमातल्या प्रबोधनाची दुसरी बाजू मात्र कोणीच मांडली नाही.तर तीच मांडायला याच सिनेमातली काही पात्रं जमली.बघा ती काय म्हणताहेत.काय चाललंय त्यांचं!

श्री वसंत गावंड - घरा घरात पोहोचलेला कलाकार

लेखक जागु यांनी बुधवार, 26/12/2018 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
घाव सोसूनच एखादी कलाकृती जन्माला येते, घाव बसत असताना, चटके खात असतानाच ती सुबक होत असते. घडवणाराही योग्य असला की कलाकृती कशी सुबक सुंदर बनते व कलाकृती तयार झाली की ती जनमानसांत डोळ्यांत भरते, सुंदर दिसू लागते असेच काहीसे घडले गेलेले श्री वसंत लडग्या गावंड ह्या उरण - कुंभारवाडा येथील चित्रशिल्पकारा विषयी माहिती करून घेऊया. आपण रोजच्या व्यवहारात चलनी नाणी व नोटा पाहत असतो. नोटा व नाण्यांवरची चित्रशिल्पे आपले लक्ष वेधून घेत असतात.

प्रधान

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 26/12/2018 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
HR नावाचा जो काही प्रकार कोणत्याही कंपनीत असतो . त्याला डोकेदुखी सोडून दुसरं काही जमत नाही . म्हणजे , काही लोक असतात चांगले . शक्य तेवढी मदत करतात, माहिती देतात आणि पुढे काय होईल आणि काय नाही हे समजावून समोरच्याला शांत करतात. समोरचा कामगार .. (कामगार च कि . प्रोफाइल मध्ये जरी Senior Engineer असलं तरी शेवटी दिवसाच्या - आजकाल रात्र पाळीच्या रोजच्या हिशोबाने काम करणारे आम्ही कामगार ) का पेटलाय . आणि फक्त कंपनीचा फायदा न बघता त्याचाही कसा फायदा होईल हे सांगून देणारे काही दुर्मिळ प्राणी असतात काही कडे. आणि ते जिथे असतात तिथे कायम फायदाच दिसतो कंपनीचा . ..

पत्रकार परिषदेपासून दूर राहण्यामागील मुत्सद्देगिरी ...

लेखक mrcoolguynice यांनी मंगळवार, 25/12/2018 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी २०१७ डो ट्र : हा ( माझा ) रोनाल्ड रिगन नंतरचा सर्वात मोठा इलेक्टॉरेट कॉलेज विजय आहे. (३०४-३०६ च्या आसपास मते) पत्रकार : तुम्ही वरील दावा केला आज खरा, पण (माजी) राष्ट्रपती ओबामा यांनी २००८ मध्ये ३६५ मते मिळवून विजय मिळवला होता !! (पत्रकाराचा प्रश्न पूर्ण होण्या आधीच त्याला काटून) डो ट्र : मी रिपब्लिकन पार्टीच्या संधर्भात वक्तव्य केलं होतं हे ..... पत्रकार : (माजी) राष्ट्रपती ओबामा यांनी २०१२मध्ये ३३२, (माजी) राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश (रिपब्लिकन पार्टी) यांनी १९९८मध्ये ४२६ मते मिळवून (राष्ट्रपतीपदासाठी) विजय मिळवला होता !!... (पत्रकाराला काटून टाकण्याचा प्रयत्न हाणून पाडत ..

३१ डिसेंबर (विज्ञान कथा)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 24/12/2018 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षीच्या (२०१८) "संवाद" या दिवाळी अंकात छापून आलेली माझी विज्ञान कथा !! (निमिष सोनार) दिनांक: 31 डिसेंबर, युरोपातील एका भूमिगत प्रयोगशाळेत - "डॉक्टर कोहेन, खरं तर मी वेळ ही गोष्ट लांबी, रुंदी आणि उंची याप्रमाणे एक मिती आहे हे मानत नाही. वेळ ही मानवाने निर्माण केलेली गोष्ट आहे. घडलेल्या घटना क्रमाने स्मरणात ठेवण्यासाठी. पण काळ, अंतर आणि वेग यांच्यातल्या गुणोत्तराचा वापर मात्र मी वेगवान प्रवासासाठी करून घेणार आहे!', शास्त्रज्ञ डॉ. रमण म्हणाले. कोहेन आणि रमण यांनी एकत्र विज्ञानाचे नवनवीन शोध लावले होते. दोघे एकमेकांचे खास मित्र झाले होते.

मोदी[च] का?

लेखक राघव यांनी सोमवार, 24/12/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः या विषयावरील अनेक धाग्यांमधे हात धुऊन घेण्याची अजिबात ईच्छा नाही. सहज वाटलं म्हणून लिहिलंय. :-) ===================== बर्‍याच दिवसांपासून या चर्चा पाहतोय, धागे पाहतोय.. मोठं कौतुक वाटतंय.. मोदींचं!! लोक किती जागरूक झालेत नाही? माझ्यासारख्या, न्यूज पाहण्याचा / वाचण्याचा जाम कंटाळा असलेल्या माणसाला, मागच्या ४-५ वर्षात किती उत्सुकता असते आता.. पुढे काय याची! नाही, पुर्वी अगदीच नव्हती असं नाही.. पण हे सगळं असंच चालणार.. कुणी काssssही बदल करू शकणार नाही असं अगदी मनावर ठाम बिंबलं होतं! साधारण २००६-२००७ पासून मोदींचं नाव सतत कानावर पडू लागलं.

वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन : समारोप

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 24/12/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दि. ४/१०/२०१८ रोजी सुरु केलेली ही लेखमाला आज समाप्त करीत आहे. pict Alfred Nobel (१८३३- १८९६) हे कुशल अभियंता आणि संशोधक होते. त्यांची जन्मभूमी स्वीडन तर कर्मभूमी नॉर्वे होती. ते धनाढ्य होते. त्यांनी आपल्या मृत्युपत्राद्वारे मोठी संपत्ती मागे ठेवली. तिचा विनियोग ६ क्षेत्रातील मूलभूत संशोधन अथवा कल्याणकारी काम करणाऱ्या व्यक्तीस (अथवा संस्थेस) पारितोषिक देण्यासाठी केला जातो. ती क्षेत्रे अशी: १. भौतिकशास्त्र २.