Skip to main content

प्रपोज डे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 11/02/2019 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रपोज डे -------------- बेसावध,धुंद क्षणी मनात तिचा विचार आला तिच्या आठवणी ने वेडा जीव व्याकुळ झाला * ताटातूट झालेली ,ती तिच्या मार्गाने ,मी माझ्या वॉट्सपले भेटू यात का? संध्याकाळी एखाद्या * भेटणे तर असंभव होते मार्ग निराळे झालेले होते ती मेसेजली भेटू यात संध्याकाळी एखाद्या * मी पण म्हणालो भेटू यात संध्याकाळी एखाद्या माहीत होते, ना तिला वचन पाळणे शक्य होते, ना मला

[शशक' १९] - टर्मिनेशन लेटर

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 11/02/2019 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
आठवडाभर बेंगलोर मध्येच तळ ठोकून होतो, पूर्ण टीमला कामाला लावलं पण कॉन्ट्रॅक्ट मिळवलंच. मुबंईत उतरल्यावर फोन सुरु करताक्षणी वाजला "सर, सकाळी अख्या टीमला टर्मिनेशन लेटर मिळाली" रडवेल्या आवाजात सुबोध. "काय? काहीतरी घोटाळा झालाय, मी बघतो". साहेबाना फोन लावला, त्यांनी उचलाच नाही. टॅक्सी करून थेट ऑफिसला. मधेच टीम मधल्या दोघं तिघांचे फोन तेच सांगायला, बायकोचा फोन तर घेतलाच नाही. संताप संताप नुसता. मला न सांगता विचारता टीमला टर्मिनेट केलं. तिरमिरीतच साहेबांच्या ऑफिसत घुसलो जाब विचारायला साहेबानी बसायची खूण केली पाणी पुढं केलं.

[शशक' १९] - ते दोघे

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 11/02/2019 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्ती १ - रोज सराईतपणे दोघातीघांना "कापणे" हे त्याचे काम होते व्यक्ती २ - रोज दोघातीघांवर "संस्कार" करणे हे त्याचे काम होते व्यक्ती १ - थंड डोक्याने थंड वातावरणात नित्यनेमाने आपले कर्म करत होता व्यक्ती २ - निरपेक्ष भावाने अग्नीच्या सान्निध्यात नित्यनेमाने आपले धर्मपालन करत होता व्यक्ती १ - एखाद्या कसायाला लाजवेल इतक्या सराईतपणे तो कलेजी काढत असे व्यक्ती २ - एखाद्या आचाऱ्यास लाजवेल इतक्या सराईतपणे तो गोळे बनवत असे एकाच समाजातील दोन व्यक्ती ,एक धर्मीय , एक जातीय , आडनाव बंधुसुद्धा !

[शशक' १९] - ज्योतिष

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 11/02/2019 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुजी - "मुलाच्या कुंडलीत राजलक्षण आहेत, फक्त पाण्यापासुन जपा, खुप जपा" ... ... "आज्जी, सगळेजण जातात सोसायटीच्या पुलमध्ये पोहायला, दहा फुटावरुन उडीपण टाकतात. मीच का नाही जायचे?" "नको रे बाळा, जाउदे त्यांना, तु हा लाडु खा" "जाउदेना आई त्याला, पोहायला शिकला तर कसला धोका रहाणार नाही. मी पुर्णवेळ जवळ थांबेन." "नवसाने झालेले एकुलते पोर, खबरदार पाण्याजवळ नेलेस तर" ... ... 'छे, आता घरी विचारण्यात अर्थ नाही. आजी उगीचच घाबरते. सगळे मित्र हसतात मला.

[शशक' १९] - गिनी पिग

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 10/02/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
" प्रणव, दहावीत लिहिलेले निबंध हे माझं शेवटचं मराठी लेखन. कसा जिंकणार मी "कांदाभजी" संस्थळाच्या शशक स्पर्धेत?"-मी " पक्या, बिंधास लिही. जिंकशील" " प्रणव, प्रयत्न करून थकलोय रे, पण जमतच नाय" " ठीकाय, ह्या "खास"पेनने लिहून बघ. हे पेन नोबेल विजेते शास्त्रज्ञ नारगोळकरांना आजच मी बँकेत सही करायला दिलं होतं " " तुझ्या पेनने काय वेगळे दिवे लागणार? पण दे." . प्रणवचं पेन लिहायला घेतलं अन शशक झरझर सुचत गेली.

[शशक' १९] - ड्रॅक्युला

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 10/02/2019 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला त्या रक्त पिणाऱ्या ड्रॅक्युलाची गोष्ट माहितीय?" रियान म्हणतो. त्याचे नेहमीच लालसर दिसणारे डोळे आज अधिकच तांबारलेत असा भास मला होतो. ट्रान्ससिल्वानियाच्या राजप्रासादात राहणारा काऊंट ड्रॅक्युला मला चांगलाच माहितीय. "ही केवळ एक कथा आहे" मी म्हणते. "कुठल्याही कथेमध्ये काहीतरी सत्यता असतेच" बोलताना रियानचा एक दात लककन हलतो. "असं काही नसतं डियर" मी थोडीशी धास्तावूनच म्हणते. "तहान लागलीय मला, काहीतरी प्यावंसं वाटतंय".रियानचे डोळे लाल होऊ लागलेत. मी पाणी घेऊन येते. रियान आता झोपलाय, त्याच्या गोऱ्यापान गळ्यावर माझी नजर खिळून राहतेय. त्याचं ताजं गरम रक्त कधी एकदा पितेय असं मला झालंय.

राजमाची-डाऊन द मेमरी लेन

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 10/02/2019 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
साल २००२ - आम्ही ४ मित्र एकाच कंपनीत कामाला होतो. चौघेही सडेफटिंग होतो. त्यात आमच्या दोघांचा कॉलेजनंतरचा पहिलाच जॉब होता. रोज रोज तेच तेच काम करून वैतागलो होतो.एक दिवस टूम निघाली की या रविवारी कुठेतरी ट्रेकला जाऊया. पण सगळ्यांनाच ट्रेकिंगची सवय नव्हती, त्यामुळे ट्रेक असा पाहिजे की रूट माहितीचा हवा. ट्रेकची मजा आली पाहिजे आणि शिवाय फार कठीण नसावा. शनिवारी रात्री निघून रविवारी परत यायचे तर राजमाची बेस्ट पर्याय होईल असे सर्वानुमते ठरले आणि आम्ही कल्याण स्टेशनवर भेटलो.

एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 09/02/2019 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
हे दामोदरच्या सुता तुला कमळाचं वरदान एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान दिव्य तुझी संघभक्ती धन्य दाढी काया बालपणी गेलासी तू शाखेसी धराया हादरली ती जननी, थरथरले घरचे जन भाजपास येई मुर्छा लागे इलेक्शन अडवानीच्या रथावरती तुझे कलाकाम मंदिर प्रश्न उठवला, मिळे कमळा पंचप्राण मेक इंडियाच्या नावे रोम कधी लंका कुठे पिप्पाणी वाजवी, ड्रम कधी डंका सेल्फीची भरवी जत्रा अन हसती सर्व जन कोट तुला नऊ लाखांचा कुणी कधी घातला ? मश्रूमाचे सूप पिऊनी, झोला कुठे टाकला? खिशामध्ये अंबानी, अन अडाणी हे भगवान आले किती गेले किती संपले भरारा नेहरू गांधी सोडून काही उच्चारी चकारा गुलाबी आणल्या नोटा आम

[शशक' १९] - पूर्ण-अपूर्ण

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/02/2019 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
वैदेही बाल्कनीत उभी होती. रिमझिम पावसात एकमेकांना बिलगत, मस्ती करत चाललेले अविनाश आणि नैना तिला दिसलेत. दहा वर्षांचा भूतकाळ तिच्या इच्छेविरुद्ध पुन्हा एकदा तिला आठवला. अशाच एका पावसाळी सायंकाळी अविनाशसोबत भविष्याची स्वप्ने रंगवत असताना अचानकपणे त्याने तिला त्याचे विचार ऐकवलेत. "मूल नको" हे विचार तिच्या सुखी संसाराच्या कल्पनेत अजिबातच बसणारे नव्हते. दोन वर्षांपासूनचं त्यांचं नातं तिने तडकाफडकी संपवलं. पुढे नैनाने अविनाशला त्याच्या विचारांसह स्वीकारलं. सतीशशी लग्न करुन वैदेहीने संसार थाटला आणि दोन मुलांना जन्म दिला.

परग्रहवासी की ..... ?

लेखक अमेयसा यांनी शनिवार, 09/02/2019 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
"आपली गती कमी झाली म्हणजे आपण पोचलो का बाबा?" समोर दिसणाऱ्या निळ्या प्रकाशमान गोलाकडे बघत त्याने आपल्या वडिलांना विचारले. काही प्रकाशवर्षे दुरून आलेले ते यान आता एका बिंदू वर स्थिरावत होतं आणि आतिल प्रवासी आपापली उपकरणे घेऊन खालील महाद्विपाकडे जाण्यास सज्ज होत होते. "२ वर्षांपूर्वी तुम्ही इथेच आला होतात का? आणि माझे मित्र म्हणत होते की गेली कित्येक दशकं आपले लोक इथे येत आहेत. खरं आहे हे?" त्याचाच अजून १ प्रश्न. त्याचे वडील या वेळेस खाली जाणार नव्हते आणि फक्त यानाच्या व्यवस्थापन आणि देखरेखी साठी आले होते. त्यामुळेच या मोहिमेसाठी ते आपल्या मुलाला घेऊन आले होते.