लेखकप्रणयायांनी सोमवार, 15/04/2019 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
तू चंद्र माझा
शांत,शुभ्र, साजिरा
तूज स्पर्शिण्या तूज मागे धावणारे
उथळ अभ्र मी....
येवून कवेत तूझ्या
नीखळ उब मनी भरावी
प्रकाशावे मी एवढे
की लाजावी मजसमोर चांदणी....
- डॉ. सुधीर रा. देवरे
देशात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा मी पाचवी सहावीत असेल. या वयात आणीबाणीचा मला काहीच फरक पडणार नव्हता. पडला नाही. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. आमच्या विरगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका लहान गावाला वडिलांची बदली होती. वडील शाळेत पायी जात. तिकडूनही पायी यायचे. त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळेत एसटी नव्हती. पायी जायचं आणि वेळेवर शाळेला पोचायचं. म्हणून वडील पहाटे शाळेला निघत. ‘आणीबाणी असल्याने शाळेला उशीरा जाऊन चालणार नाही’ असं त्यांच्या बोलण्यातून कळत असे. पण आणीबाणी म्हणजे नेमकं काय हे ते समजण्याचं वय नव्हतं.
गावात किराणा दुकान होतं.
लेखकअन्या बुद्धेयांनी सोमवार, 15/04/2019 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
14.04.2019
गेल्या महिन्यात 6 दिवस सायकलसफर झाल्यावर आता परत पाय फुरफुरायला लागले होते. 10-12 दिवसांपूर्वी नमिता दामलेचा लेख वाचनात आला ज्यात तिच्या माथेरान राईडबद्दल लिहिले होते.. वाचून सुरसुरी आलीच. या महिन्यात तो घाट सर करायचं ठरवून टाकलं. आणि त्यासाठी आजचा मुहूर्त पक्का झाला.
'सकाळी लौकर उठून' या शब्दांनी मला व्यायाम, फिजिकल ऍक्टिव्हिटी वगैरे बाबत भारी छळलं आहे. एकदा गादीतून बाहेर पडलो की ओके पण तोवर फारच अवघड लढाई असते. काल शाळूमित्रमैत्रिणी सोबत gt करून घरी यायलाच 12 होऊन गेले होते. त्यामुळे 5:40 चा गजर बंद करण्यासाठीच होता. पण दुसरा गजर 6:40 ला झाल्यावर उठलोच.
लेखकसिक्रेटसुपरस्टारयांनी सोमवार, 15/04/2019 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
मला तुझी आठवण यायला कारण लागत नाही,
झोप लागावी म्हणून दिवसभर केलेल्या दगदगीचा शीण,
पाठ अंथरुणाला टेकताच वैरी होतो,
मी त्याला धरून ठेवायचं म्हटलं तरी निसटून जातो,
डोळ्यांच्या कडा ओल्या होणं,
मग जरा कमी कमी आवाजातले हुंदके,
मग उशीत डोकं खुपसून हमसाहमशी रडणं,
असे सगळे सोपस्कार पार पडल्यावर
गोठलेली बोटं लिहू लागतात..