Skip to main content

वन नाईट स्टयांड -आजचे वास्तव

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 22/06/2019 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
वन नाईट स्टयांड -आजचे वास्तव -------- चिन्मय चित्र एका मल्टि न्याशनल कंपनीत मोट्या हुद्द्यांवर काम करत होता बुद्धिमान व दिसायला स्मार्ट होता कंपनीच्या पाच ब्यांचं होत्या - बाणेरच्या ब्यांचं मध्ये काम असल्याने तो त्या ब्यांचं मध्ये गेला कामिनी प्रधान तिथे काम करत होती कामिनी ३५-३६ वर्षांची आकर्षक व्यक्तिमत्वाची ललना होती चिन्मय च तिच्या कडेच काम होते तो तिच्या सौंदर्या न घायाळ झाला होता कामिनी खूप आकर्षक होती दिसायला तुम्ही खूप सुंदर आहात दिसायला चिन्मय म्हणाला ती काहीच बोलली नाही योग् असेल तर भेटू पुन्हा एकदा ती काहीच बोलली नाही मात्र चेहे-यावर संमतीदर्शक हास्य होते - दोन महिन

सावज

लेखक कलम यांनी शनिवार, 22/06/2019 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
शहराबाहेरचं ते तळं खूप शांत आणि गूढ असं वाटायचं. रोज कामावरून परत येताना रमेश थोडा वेळ आपली कार रस्त्याकडेला थांबवी आणि दुरूनच त्या तळ्याकडे पाही. दिवसभराच्या कंटाळवाण्या कामानंतर त्या शांत तळ्याकडे पाहताना त्याला खूप चांगलं वाटे. कधीकधी सूर्यास्ताच्या तयारीत असलेले पिवळे, केशरी आकाश तर कधी ताऱ्यांनी सजलेले काळेभोर आकाश, कधी कृष्णमेघ तर कधी निरभ्र निळं आभाळ त्या तळ्याच्या पाण्यात स्वतःला पाहायला धडपडे. एका शुक्रवारी रमेशनं घरी आल्यावर प्रीतीला तयार व्हायला सांगितलं. "चल आज मी तुला एका खूप वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. लवकर तयार हो." "आज काय विशेष? आणि कुठं जायचं आहे आपण? सांग आधी.

सँडविच ढोकळा

लेखक श्वेता२४ यांनी शनिवार, 22/06/2019 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. खूप दिवसात पाककृती टाकायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आज माझी एक अत्यंत आवडती पाककृती इथे सादर करायचीच हे ठरविले होते. आज तुम्हाला मी सँडविच ढोकळ्याची पाककृती सांगणार आहे. साहित्य - तयार इडलीचे पीठ ३ वाटी बेसन पीठ २ वाटी सायट्रिक अॅसिड १/२ चमचा+१चमचा मीठ+२ चमचे साखर+१वाटी पाणी हे सर्व विरघळून १ वाटी साधे पाणी २ चमचे खायचा सोडा हिरवी खोबर्याची चटणी (जरा तिखट) कडीपत्ता, सुक्या मिरच्या,फोडणी चे साहित्य कोथिंबीर सजावटी करीता तेल ५-६ चमचे तयारी कृती- या ढोकळ्याचे तीन भाग असतात. पांढरा ढोकळा, चटणी व पिवळा ढोकळा.

तरल भावनेचं चित्र : मासुम

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 22/06/2019 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
'लकडी की काठी काठी काठी का घोडा' हे गाणं न ऐकलेला माणूस विरळाच म्हणावा लागेल. लहानपणी रविवारी रंगोली मध्ये कित्येक वेळा हे गाणं ऐकलं होतं. तेव्हा त्यातलं त्यात उर्मिला मातोंडकर आणि 'घर से निकलते हि वाला' जुगल हंसराज होता इतकंच काय ते त्या गाण्याचं कौतुक होतं आणि विषय तिथेच संपत होता. कट टू : करंट जिंदगी गेले कित्येक दिवस 'मासुम' पहायचं डोक्यात होतं, पण कधी वेळ जमत नव्हती तर कधी अर्धवट पाहिल्या जात होता. सरतेशेवटी काल योग जुळून आला. १९८३ मध्ये आलेला मासुम 'शेखर कपूर' चा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट.

दोसतार - २२

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 22/06/2019 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी सकाळ समजून बराच लवकर जागा झालो होतो. आणि रात्री तीन वाजता अंघोळ केली होती. आता यापुढे झोपणे शक्यच नव्हते. गजर होईपर्यंत तरी काहीतरी करुया म्हणून इंग्रजीचे पुस्तक काढले. सरांनी सांगितलेला धडा वाचून तरी पाहूया. काही समजलंच तर चांगलंच आहे. आणि आईने विचारलं काय करतो आहेस तर सांगता येईल की अभ्यास करतोय म्हणून. ती निदान सहल तरी रद्द करणार नाही. ते ऐकून. पुस्तक उघडले आणि वाचू लागलो. "वन्स अपॉन अ टाईम.

नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 21/06/2019 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज! नाती म्हटलं की आपल्या मानत रक्ताची नाती उभी राहातात. पण ही रक्ताची नाती मुळात निर्माण होतात ती एका विश्वासाच्या नात्यामुळेच. पती-पत्नीचं नातंच मुळी केवळ प्रेम आणि विश्वास यावर उभं राहातं. अर्थात पुढे जाऊन त्यात प्रेम किती आणि विश्वास किती हे मोजणं अवघड जातं. अनेकदा अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रेम किंवा विश्वास उरतोच असं देखील नाही. तर लग्नानंतर निर्माण झालेल्या अनेक नात्यांच्या गुंतागुंतीमुळे हे पती-पत्नीचं नातं सांभाळून घेतलं जातं किंवा टिकवलं जातं. सुरवातीच्या काळातले गुलाबी ढग संपता-संपता नवीन पाहुण्याची चाहूल असते.

बिरादरीची माणसं - मनोहर काका

लेखक लोकेश तमगीरे यांनी शुक्रवार, 21/06/2019 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
भामरागड पुलावरून पाणी असतांना गावातील लोकांना घरी आश्रय द्यायचा असो किंवा रणरणत्या उन्हात तेंदूपत्ता तोडतांना होरपळून गेलेल्यांची तहान शमवायची असो…… कुणाचे दुःख कमी करायचे असो की कुणाचा आनंद द्विगुणित करायचा असो…… जन्म दाखला, बँक अकाउंट, मनी विथड्रॉव्हल, किराणा, बाजार करणे.. इत्यादी लोकांच्या कुठल्याही कामासाठी आपली दुचाकी घेऊन नेहमीच तयारीत असणारी ही व्यक्ती. चांगल्या कामासाठी "नाही" हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो ….. हो अगदी बरोबर ओळखलं..."डॉ.

त्यांची लँग्वेज वेगळीय!

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 21/06/2019 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
*इ.स.२०३० मधल्या इयत्ता दुसरीतल्या दोन मुलांचे फोनवरचं संभाषण!* चिन्मय: अरे अन्वय तुला माहिताय का? या मोठ्या लोक्सची लँग्वेज काही वेगळीच असते. अन्वय: म्हणजे? चिन्मय: अरे आपल्याला तो कम्पल्सरी सब्जेक्ट नै का? मराठी? त्यात आपण नंबर्स कसे प्रोनन्स करतो? म्हणजे २०‍१ ला आपण वीस आणि एक म्हणतो किंवा ४९ ला चाळीस नऊ म्हणतो ना? अन्वय: हो बरोबर! चिन्मय: अरे पण हे मोठे लोक्स तसं नै म्हणत.ते २०१ ला दोनशे एक म्हणतात.

माझे आजी आजोबा

लेखक chittmanthan.OOO यांनी गुरुवार, 20/06/2019 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आजी आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला नशीब लागत असे म्हणतात. आजकाल जनरेशन गॅप मुले प्रत्येक मुलाला आज्जी आजोबांचे प्रेम मिळतेच असे नाही. पण मी नशीबवान आहे कारण मला माझ्या आजी आजोबांची संगत मिळाली. मला आज्जी चे प्रेम ज्यास्त मिळाले आणि अजूनही मिळतेच आहे. आजोबांचा सहवास थोडा कमी मिळाला कारण मी सातवीत असताना ते गेले.त्यांना मी लाडाने आबाजी म्हणायचो. ते दहा वर्षे पार्किन्सन्स ने आजारी होते. शेवटचे दिवस तर इतके हाल झाले की काय बोलायला नको. मी आजी आजोबांच्या खोलीत झोपत असल्याने होणारे हाल बघितले होते. माझ्या आजीने त्यांची खूप सेवा केली .