Skip to main content

अंधाधुंद

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 12/07/2019 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
जरा जास्तच दिस झाले आपल काही बोलण झाल नाही. पण आता का करता जी उनच अस तापल होत का काही लिहूशाच वाटत नव्हत. वरुन लगनसराईचा टाइम तवा टायमच नव्हता. म्या इचार केला पाउस पडून जाउ दे मंगच बोलू. पाउस बी असा दडी मारुन बसला का बोलाच काम नाही. अख्या मिरग गेला पण येक थेंब पावसाचा पता नाही. आता कोठ दोन पाणी झाले. पऱ्हाटी टोबली आन म्हटल आता तुम्हाले सांगतो मायी गोष्ट. मायी लय मोठी पंचाइत झालती राजेहो. आजकाल आमच्यासारख्या गाववाल्यायले शिनेमे पायन कठीण होउन गेल. लय बेक्कार दिस आले पाहा. पिक्चर पायला तर डोक्याले झिणझिण्या आल्या. नाही म्हणाले साहा महिने तरी झाले असन.

कुत्रत्वाचं नातं

लेखक इरामयी यांनी शुक्रवार, 12/07/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
काही समस्या या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादाला एक संतापयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे. प्रतिसाद लिहिणाऱ्यांचा (श्री. बाप्पू) राग मला समजू शकतो आणि त्यांचं मत चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही.

प्रस्थापितांचे सामाजिक भान

लेखक सर टोबी यांनी शुक्रवार, 12/07/2019 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखात प्रस्थापित म्हणजे ज्यांनी जीवनातील अनिश्चितता संपवून स्थैर्य प्राप्त केले आहे असे सर्व जण. आता यातील प्रत्येक जण जाणीव पूर्वक समाजाकरिता काही करेलच असे नाही. परंतु ज्या देशात पदोपदी तुम्हाला जीवनाशी झगडणारे लोक दिसतात तेथे प्रस्थापितांकडे आपसूकच 'टॉर्च बेअरर' या अर्थाने बघितले जाते. आणि म्हणून त्यांचे सामाजिक भान असणे किंवा नसणे हे देखील इतरांसाठी महत्वाचे असते. तर हा असा प्रस्थापित एकूणच समाजासाठी आणि देशासाठी कळत नकळत महत्वाची भूमिका बजावत असतो. या समाजाने जर पुरोगामी भूमिका पत्करली तर इतर समाज घटक देखील अशा गोष्टींचे अनुकरण करतात.

घनदाट गर्द रेशमी केशकुंतल

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/07/2019 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
घनदाट गर्द रेशमी केशकुंतल नेत्रास कोरले काजळ कि सोमल तनुत रातराणीची मादक दरवळ गात्रात मदनाची बेफाम सळसळ * नजर, कधि लाजरी, कधि नाचरी रतिरुप,नखशीकांत तु लावण्य परी वाकलेली लज्जेने तु अबोध रमणी रुप चमके,जशी नभी शुक्रचांदणी * वसने ,गर्भ रेशमी अंगी ल्याली तव उरास काचे ,भर्जरी काचोळी देहात रानवारा,उसळे उधाण लाटा गालास खळी,अशी तु लावण्यकळी * अबोल पौर्णीमा, अन धुंद चांदणी जवळ श्रुंगार वेडी,बेधुंद रागीणी नाचति वक्षावर, चकोर मंडले बेभान मुग्ध ति कुजबुज अन चोरटे अलिंगन , * रोम रोम नशेने फुलले,श्वासात श्वास भिनले.. एक मेकाच्या सहवासात,बहरुन यौवन आले तारुण्य अन यौवनाचा प्राशितो मी कण नी कण ओंजळीत दिले मी त

काल धरण बांधिले

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 12/07/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
काल धरण बांधिले खेकड्यांनी हो तोडिले येरू म्हणे बघा नीट विठू चरणीची वीट सृष्टीचा जो तोले भार त्यासी विटेचा आधार युगे अठ्ठावीस ठेला विठू विटेवरी भला वीट अजूनी अभंग बघणारे होती दंग मूळ माल जर नीट (जशी विठ्ठलाची वीट) तर फिजूल बोभाट नको खेकडी खटपट
काव्यरस

डोक्याला शॉट [प्रतिपदा]

लेखक गड्डा झब्बू यांनी शुक्रवार, 12/07/2019 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
चिन्मय बेडवरुन उठला बेसिन जवळ जाऊन वोश घेतला... दाढी आणि अंघोळ करायचा कंटाळा आल्याने तोंड पुसून केस विंचरून वरचे कपडे उतरवून तसाच घराबाहेर पडला.... वरचे कपडे उतरवून म्हणजे रात्री झोपताना थंडी वाजत होती म्हणून हाफ टी शर्टवर फुल टीशर्ट आणि थ्रीफोर्थ वर जीन्स चढवली होती ते वरचे कपडे उतरवून... तर सांगायचा मुद्दा काय कि चिन्मय कपडे उतरवून घराबाहेर पडला आई काशी यात्रेला गेली होती ल्लोळत पडायचा कंटाळा आला म्हणून पडली स्वारी घराबाहेर ...

पोपट

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 11/07/2019 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
पशुपक्षी आणि माणूस यांचे जग स्वतंत्र असले तरी काही पशू आणि पक्षी माणसांच्या आसपासच, माणसांच्या सहवासातच वावरणे पसंत करतात. वने आणि जंगले हेच आपले जग याची त्यांना जाणीवही नसते. कुत्रामांजरे तर मानवी जगरहाटीचा अविभाज्य भाग आहे. हळुहळू अन्य काही पशुपक्ष्यांनाही मानवी सहवासाची ओढ आणि आवड वाढू लागली असून वने आणि जंगले सोडून मानवी वस्त्यांवर फेरफटके मारण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

जाहिरातींची (लागली) "वाट"

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 11/07/2019 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
(टीव्हीवर नेहमी लागणाऱ्या काही जाहिरातींची मी लावलेली "वाट" मूळ जाहिराती पाहिलेल्या असतील तरच वाचतांना मजा येईल! हा प्रयोग कसा वाटला ते सांगा!) *** नवीन लग्न झालेल्या जोडप्याकडे नवऱ्या मुलाचा म्हणजे राहुलचा मित्र अजय भेटायला येतो. त्याला समोर एक बाळ रांगतांना दिसतं. अजय म्हणतो, "काय हो वाहिनी, हे कुणाचं बाळ? आणि राहुल कुठेय?" वाहिनी रडू लागते, "अहो भावजी! काय सांगू तुम्हाला? आम्ही किराण्यात आणलेला संतूर साबण ह्यांनी आताच चुकून ऑरेंज सोन पापडी समजून खाल्ला आणि ते क्षणार्धात बाळ बनले!" अजय म्हणतो, "आरं आरं वाहिनी! काय झालं हे!

आमच्या वेळेस असं होतं??

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 11/07/2019 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीच्या पालकांचं बरं होतं. मुलं जास्त प्रश्न विचारायचे नाहीत आणि विचारले तरीही पालक दरडावून चूप बसवत. कारण बरेचदा पालकांनाही उत्तरं माहिती नसायची, इंटरनेट नव्हते त्यावेळेस, लायब्ररीत जाऊन पुस्तकांत बरेचदा उत्तरं शोधावी लागायची. अर्थात जीवनातील ज्या प्रश्नांची उत्तर गुगल देऊ शकत नाही मी त्याबद्दल बोलत नाही आहे! त्यावेळची बहुतेक लहान मुलं सुद्धा एखाद दुसऱ्या दरडावण्याने चूप बसत, त्यांचे मनातले कुतूहल या पालकांच्या धाकापायी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी घाबरून पायात मान खाली घालून जाऊन बसायचं आणि आणखी कधी मान वर करून प्रश्न विचारायची संधी मिळते का ते शोधत बसायचं.

उपवासाचा शिरा खास आषाढी एकादशीनिमित्त by Namrata's CookBook :९

लेखक Namokar यांनी गुरुवार, 11/07/2019 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ वाटी निवडलेली वरई/भगर १ वाटी साखर तूप केळी चारोळ्या ,काजू ,बदाम वेलची पूड मीठ दूध(३००मि.) कृती : १. वरई/ भगर धुऊन चाळणीत पाणी निथळायला ठेवा २. दूध गरम करायला ठेवा ३. कढईत ३ चमचे तूप घ्या ,तूप गरम होत आलेकी त्यामध्ये वरई/ भगर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या. ४.