Skip to main content

'पागोळी वाचवा'-अंमलबजावणी

लेखक सुनिल प्रसादे यांनी गुरुवार, 01/08/2019 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
'पागोळी वाचवा अभियान' अंमलबजावणी करताना - 'पागोळी वाचवा अभियान' जसं जसं पुढे सरकत आहे, तसं तसं लोकांनी त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आमलात आणण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरवात केली आहे. एखाद्या गोष्टीचा विचार करणं, ती समजून घेणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं वेगळं. एखादी गोष्ट प्रत्यक्षात करायला सुरुवात केली की त्यातले बारकावे समोर येतात आणि काहीवेळा संभ्रमाच्या स्वरूपात आपल्यासमोर उभे ठाकतात. 'पागोळी वाचवा अभियान' ची अंमलबजावणी सुरू करणारे काही लोक ह्याचा अनुभव सध्या घेत आहेत.

किवी काजू रोल by Namrata's CookBook : १३

लेखक Namokar यांनी गुरुवार, 01/08/2019 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: २ तास लागणारे जिन्नस: २ किवी १/२ वाटी साखर १/२ वाटी मिल्क पावडर १ वाटी काजू (जाडसर बारीक करून घ्या) सुक्या खोबऱ्याचा किस तुप खाण्याचा हिरवा रंग क्रमवार पाककृती: १. किवीची साल काढून घ्या २. किवीचे छोटे तुकडे करुन मिक्सर करुन घ्या ३.

गुजरात ट्रिप बद्दल माहिती हवी ahe

लेखक MipaPremiYogesh यांनी गुरुवार, 01/08/2019 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दिवाळी झाल्यावर मी गुजरात ट्रिप चा विचार करत आहे. काही माहिती हवी आहे: साधारण प्लॅन असा आहे - पुणे -> अहमदाबाद -> जुनागढ -> गीर -> दीव -> वडोदरा (स्टेशन ऑफ युनिटी) -> पुणे १. ह्या साठी किती दिवस प्लॅन करावा? मी ६ रात्री असा विचार करतोय २. आम्ही तिघांचं जण (बायको आणि मुलगा ४ वर्षांचा) असणार आहोत, तर अहमदाबाद हुन कॅब करावी असा विचार करत आहे साधारण कॉस्टली जाईल पण इतर काही ऑपशन दिसत नाहीये. असल्यास सांगावा ३. हॉटेल्स सांगावीत अजून काही टिप्स असतील तर नक्की सांगा.

युगांतर आरंभ अंताचा! भाग १७

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 01/08/2019 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
निपुत्रिक कुंतीभोजला शुरसेनाची दत्तक मिळालेली कन्या एक वरदानच होतं. तिच्या साऱ्या इच्छा पुर्ण करत, संस्कारांचे बाळकडूही तिला त्याने दिले होते. कुंती भोज राजाची लाडकी कन्या म्हणून त्याच्याच नावावरून सगळे तिला कुंती म्हणू लागले. राजमहालात खेळत बागडत ती मोठी होऊ लागली. एके दिवशी राजा कुंतीभोज चिंतेत बसलेले तिने पाहिले. "काय झालं पिताश्री?" "काही नाही, कुंती. अगं दुर्वासा ऋषींकरता एक सेवक पाठवयचा आहे." "का?" "ते तपश्चर्येला बसणार आहेत." "मग त्यात काय चिंताकारक आहे? पाठवून द्या." "त्यांनी तुझ्या करता विचारले आहे." "मी जाईन की मग." "खरचं जाशील? त्यांच्या कुटीत?

राखी बैल दिवे आरसा निवत

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/08/2019 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे गावात राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गावातला बामन राख्या बांधायला यायचा. ‘उद्याची राखीपौर्णिमा’ म्हणत घरातल्या लहान मुलांना- पुरुषांना राख्या बांधायचा. या राख्या रंगवलेल्या दोर्‍याच्या आणि लाल- पिवळ्या कापसाच्या छोट्या छोट्या गोंड्यांच्या असत. या बदल्यात त्याच्या झोळीत आई सुपड्यातून बाजरी द्यायची. एकादशीच्या आदल्या दिवशीही बामन यायचा. आणि दारातूनच ‘उद्याची एकादशी’ म्हणायचा. बर्‍याच लोकांना दुसर्‍या दिवशी एकादशी आहे, हे माहीत नसायचं. त्या काळात सगळ्याच लोकांच्या घरात भिंतीवर कॅलेंडरं नव्हती.

जगजीतसिंग ... Face to Face

लेखक अमर विश्वास यांनी गुरुवार, 01/08/2019 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
जगजीतसिंग ... Face to Face काल जगजीतचा Face to Face हा अल्बम ऐकला . हल्लीच्या स्मार्ट जमान्यात (फोन वगैरे ... ) प्ले लिस्ट वगैरे प्रकार जोरात असल्यामुळे बरेचदा एखादा अल्बम सलग असा ऐकलाच जात नाही. पूर्वी कॅसेट असताना सलग ऐकावेच लागायचे .... तर हा Face to Face अल्बम. त्याकाळी जगजीतच्या अल्बमची नावे इंग्लिश असायची. InSearch , Insight, Cry वगैरे .... हा त्यातलाच एक अल्बम. १९९४ सलाला ... २४ वर्षांपूर्वीचा ... एकूण आठ गज़ल (त्यातल्या काही खर तर नज्म) अल्बमची सुरवात होते सबीर दत्त यांच्या नज्म ने .

एक राजकीय सूड : बँकांच्या राष्ट्रीयकरणाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष : दूरगामी वाताहत

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 01/08/2019 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
Nationalisation Of banks 29 जुलै 1969 रोजी केलेल्या लोकसभेतल्या आपल्या भाषणात इंदिरा गांधी यांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची भलामण करताना सांगितले की शेती, निर्यात आणि लघु उद्योगांना चालना देण्याच्या भव्य उद्देशाने हे पाऊल त्यांनी उचलले आहे. स्वातंत्र्यानंतर चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण हा आजवर घेतलेला सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय असावा किंवा कदाचित सर्वात मोठा आर्थिक आघात. प्रत्यक्षात या तीनही क्षेत्रात कितना तीर मारा ?

साहिब बिवी और गुलाम

लेखक महासंग्राम यांनी गुरुवार, 01/08/2019 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी दूरदर्शन वर दुपारी 12 वाजता जुने चित्रपट लागायचे, तेव्हा एका रविवारी गुरुदत्त फिल्म फेस्टिवल सुरु असतांना, एका नितांत सुंदर ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट लागला होता, 'साहीब बिवी और गुलाम'. गुरुदत्तची निर्मिती आणि त्याचा जवळचा मित्र अब्रार अल्वी यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट मनात अजून घर करून आहे, तो मिनाकुमारीच्या सौंदर्यामुळे.

गणेश लेखमालिका २०१९ - झलक पहिली!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 01/08/2019 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा यायला उणापुरा एक महिना राहिलाय मंडळी. बाप्पा आल्यावर जे उत्साहाचं वातावरण असतं, त्याची भूल सगळ्यांनाच पडते. गणपतीच्या आगमनाने सगळीकडे आनंद, मांगल्य, उत्साह भरून ओसंडून वाहतो. अगदी 'नभात भरला, दिशांत फिरला, जगात उरला, मोद विहरतो चोहीकडे...' असं उत्साहाचं वातावरण भारून राहिलेलं असतं! पाहुणाच असा गोजिरवाणा असतो! हळूहळू मिपावरसुद्धा गणपती उत्सवाचा माहौल रंग भरायला लागेल.