Skip to main content

रामगड किल्ला

लेखक अभिजित भिडे यांनी शुक्रवार, 02/08/2019 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
रामगड म्हणजे शोले सिनेमातील रामगड नव्हे तर कोकणातील एक दुर्ग आहे. कणकवली आचरा मार्गावर कणकवलीपासुन 10 कीमी वर हा गढीवजा दुर्ग आहे. आमच्या एका ट्रेकर मित्राला महाराष्ट्रातले असे कमी प्रसिद्ध पण ऐतिहासिक मूल्य असलेले दुर्ग शोधून सर करण्याचा ध्यास आहे. त्याने अशाच एका चिंब ऑगस्ट महिन्यात रामगड ला जायचा बेत आखला अणि आमच्यासारखी चार समउत्साही मंडळी लगेच तयार झाली. बारामाही आसने सहजगत्या उपलब्ध असणाऱ्या डबल डेकर एक्सप्रेस मुळे एकाच दिवसात परत येण्याचे आरक्षण केले . ठरलेल्या दिवशी भल्या पहाटे ठाण्याहून ट्रेन पकडली.

सरसर सरसर आली सर

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 02/08/2019 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
सरसर सरसर आली सर ------------------------------------ सरसर सरसर आली सर सरसर सरसर आली सर सरसर सरसर आली सर भरभर भरभर छत्री धर धरू कशी ? सुटलाय वारा छत्री उलटी झाली तर ? सरसर सरसर आली सर लवकर रेनकोट अंगावर घालू कसा ? घालूनही जर आतून सगळा भिजलो तर ? सरसर सरसर आली सर छत्री नको रेनकोट नको धाराच झेलू अंगभर पाऊस होऊ क्षणभर सरसर सरसर आली सर ---------------------------- बिपीन

विळखा -५

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 02/08/2019 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
विळखा -५ आज आमच्या आईला अति दक्षता विभागातून तिच्यासाठी खास खोलीत (स्पेशल रुम) आणण्यात आले. तिच्या शल्यक्रियेत आणि शल्यक्रियेच्या नंतर काय काय गुंतागुंती होऊ शकतील याची मला पूर्ण कल्पना होती. यामुळे काल रात्री सुद्धा मी शांतपणे झोपू शकलो नव्हतो. गेले काही दिवस चिंतेमुळे झोप सुद्धा पहाटे लवकर मोडत असे.आज पहाटे सुद्धा पाच वीस ला जाग आली आणि नंतर झोप लागली नाही ( अन्यथा मी सकाळी साडे सातला फार कष्टाने उठणारा माणूस आहे) सुदैवाने यातील कोणतीही गंभीर गुंतागुंत होता शल्यक्रिया सुरळीत झाली आणि तिची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे हे पाहून आज मी जास्त शांत पणे हे लिहू शकतो आहे.

युनिटी इज स्ट्रेंथ

लेखक लोकेश तमगीरे यांनी शुक्रवार, 02/08/2019 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
गोपनार.....भामरागड तालुक्यातील १२१ गावांपैकी एक माडिया आदिवासीबहुल गाव. साधारणतः २२०-२५० पर्यंत लोकसंख्या असलेलं गाव. हेमलकसाहून १३ किलोमीटरचा कुठे पक्का तर कुठे कच्चा रस्ता ओलांडला की कुक्कामेटा फाटा येतो. या फाट्याहून डावीकडे साधारणतः ८-९ किलोमीटरची जंगलवाट आहे. वाटेत ३ मोठ-मोठे नाले आहेत. ६ महिने हा रस्ता सुरळीत चालू असतो. पण एकदा का पाऊस पडला की, मग ४-५ महिने कुठलीही दुचाकी जाऊ शकत नाही. कुक्कामेटा गाव ओलांडलं की समोर वाटेत लाहेरी नदीचं एक मोठं पात्रं लागते. ते लाकडी डोंग्याने पार केल्यावर लष्कर गाव येतं. लष्कर हून २.५ किलोमीटर अंतर गाठलं की अखेरीस गोपनार गाव येते.

युगांतर- आरंभ अंताचा भाग 18

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 02/08/2019 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
हस्तिनापुरात अंबालिकापुत्र पंडुचा राज्याभिषेक झाला आणि राजगादी सजली. भीष्माचार्य मनातून निश्चिंत झाले. धृतराष्ट्र शूरत्वाचं, पांडू धर्माचं आणि विदूर बुद्धीचं प्रतिक! पंडु आणि धृतराष्ट्राचे बंधुत्व त्यांच्यात कोणाला द्वेष पसरवायला जागाच देत नव्हते. दासीपुत्र विदूरची निष्ठा पाहून दोघांच्या मनात त्याच्या बद्दलही आदर वाढला होता. न्यायदानाच्या वेळी पंडु आधी विदुराचा सल्ला ऐकायचा. अंधत्व ही एक बाधा नसती तर धृतराष्ट्र जेष्ठ भाऊ असल्याच्या अधिकाराने त्यालाच राजगादी प्राप्त झाली असती, असं राहून राहून अंबिकेला वाटायचं. 'पंडु राजा म्हणल्यावर त्याच्याशी विवाह करायला कोणतीही राजकन्या होकार देईल.

दिव्यांची कहाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 02/08/2019 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) ) ऐका दीपांनो तुमची कहाणी. कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’ ‘काय झाले?’ ‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’ सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही.

आहे पिटुकली पण कामाला दमदार

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 02/08/2019 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅड्रिनल ग्रंथी आणि तिची हॉर्मोन्स शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशीना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्स ही एक महत्वाची आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून ५० हून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. या ग्रंथींपैकी थायरॉइड, स्वादुपिंड आणि जननेंद्रिये ह्या अगदी परिचित ग्रंथी. याव्यतिरिक्त ज्या ग्रंथी आहेत त्या सामान्यांना सहसा माहित नसतात.

आमच्या सीसीडीय आठवणी..

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 02/08/2019 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सीसीडीचं (कॅफे कॉफी डे) प्रकरण जोरात आहे म्हणून नाहीतर हे लिखाण तसं सीसीडी, बरिस्ता आणि तत्सम सगळ्या प्रकारांना उद्देशून आहे. आम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये असताना शहरात सीसीडीचं पहिलं आउटलेट सुरु झालं. तेंव्हापासून ते नंतर कितीतरी वर्ष "हे आपल्यासाठी नाही" हे डोक्यात पक्कं बसलं होतं. कॉलेजसमोरच्या मामाच्या टपरीवर दोन रुपयात कटिंग चहा अन छोटा पारले जीचा पुडा घेणाऱ्या आमच्यासारख्यांना सीसीडीत जाऊन दीडशे रुपयाची कॉफी पिणे कधीच झेपणारे नव्हते. अगदी कमवायला लागल्यावरसुद्धा सीसीडीत जाऊन उधळावं असं कधीही वाटलं नाही. चहा किंवा कॉफी हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे.

दोसतार - २३

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 02/08/2019 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा :http://misalpav.com/node/44712
ज्ञानेश्वर माउली... ज्ञान राज माउली तुकाराम " त्यानी वारीत वारकरी नाचतात तशी पावलेही टाकली. त्यांच्या आसपासच्या दोन तीन वर्गांनी त्यांचे अनुकरण केले आमच्या सहलीला आता " शाळेची शिस्तीत निघालेली मुले, प्रभात फेरी , गणपतीची मिरवणूक, कुठल्याशा महाराजांची पालखी , आणि वारी" असे काहिसे संमिश्र स्चरूप आले होते. या घोषणांच्या नादात आम्ही गावाबाहेर कधी आलो आणि यवतेश्वरच्या हिरव्यागार रस्त्याला कधी लागलो ते समजलेही नाही.
यवतेश्वर तसे गावाच्या अगदी जवळचे ठिकाण.

वारी

लेखक मायमराठी यांनी गुरुवार, 01/08/2019 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
त्यागाने धजलेले, भक्तीत चूर, देह हे सजलेले । धुळीने नटलेले, समर्पणां आतुर पाय हे वळलेले । नामाने माखलेले, वारीचे काहूर हृदयीं ह्या उठलेले । मातीने रंगलेले, भजनांचे सूर नभीं या दंगलेले । माऊलीने भारलेले, भक्तांचे ऊर कीर्तनीं या न्हालेले । पंथ भिजलेले, भक्तीने महामुर, जीव हे चिंबओले । ध्यास ल्यालेले, जरी क्षणभंगुर आयुष्य विठुरायांत मुरलेले । - अभिजीत