Skip to main content

३३ कोटींची मुक्ती

लेखक मायमराठी यांनी मंगळवार, 13/08/2019 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांबरोबर हॉटेलात मनसोक्त हादडंपट्टी करताना, रस्त्यात उभी अतिशय कृश अशी सवत्स धेनु, आमच्याकडे, आमच्या खाण्याकडे बघताना दिसली.

एक महाराष्ट्रीय स्त्री जेव्हा देशाची लाज काढते ? :(

लेखक माहितगार यांनी सोमवार, 12/08/2019 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
पाकीस्तान कडून भारतीय पत्रकारांना इनफ्ल्युएन्स करण्याचे प्रयत्न कसे केले जातात याचा पाकीस्तानच्या माजी राजदुत अब्दुल बासीत याने उघड गौप्य स्फोट केला आहे.

युगांतर - आरंभ अंताचा भाग २७

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 12/08/2019 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
युगांतर - आरंभ अंताचा! भाग २८ नंदघरी राहायला यशोदेने रोहिणीला बोलावून घेतले तेव्हापासून नंदाचे घर बलराम आणि कृष्णाच्या किलबिलाटाने भरून गेले होते. कृष्णाच्या दैवी चमत्काराच्या कैक वार्ता हवेच्या लहरींसोबत सर्वत्र पसरत होत्या. त्याच्या निळ्या रुपाची आणि विशाल काळभोर नेत्रांची भूल पडणार नाही अशी एक गोपिका गोकुळी मिळाली तर नवल! गोपिकांच्या पाण्याच्या घागरी फोडण्यापासून ते कोणाचाही घरात घुसून शिंकाळ्यातलं लोणी मित्रांसोबत वाटून खाण्यापर्यंत घडलेल्या प्रत्येक गोष्टींची तक्रार करायला गावभरच्या बायका नंदच्या घरी रांग लावत असतं. यशोदेचा दिवस त्या तक्रारी ऐकून कृष्णाला शोधण्यात जायचा.

सावज (भाग १)

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 12/08/2019 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकांच्या नजरेतच ती गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत . तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला. ================================================== " करायला सगळं काही करता येत पण त्यासाठी मोबदला मोजावा लागतो आणि मोबदला नेहमी पैशात असत नाही तो कधीकधी वेळ , समर्पण , आणि कधीकधी ...

धुरंधर

लेखक खिलजि यांनी सोमवार, 12/08/2019 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
पेटता पेटता विझलो कधी माझे मलाच कळले नाही दिला होता शब्द खरा पण काय ते नीट आठवलेच नाही या स्मृतीला कोण जाणे कुणाचा विखारी दंश झाला जो तो ओळखीचा असूनही इथे मलाच परका झाला कोणता हात धरू मी ? कोणता सोडून देऊ ? या हातांच्या विळख्यातच माझा नक्की कोणता ? तोच कळेनासा झाला समजत होतो धुरंधर स्वतःला पण या हळव्या हृदयाने घात केला मेंदूने बरेच समजावून पहिले त्यास पण हळूहळू तोही त्या हृदयात गेला इथेच घेतली समाधी मनाने इथेच माझा अंत झाला हाच तो विखारी दंश होता ज्याने धुरंधर परागंदा झाला {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

रॉबिन विलियम्स

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 12/08/2019 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ ची ती सकाळ काहीशी भकासच होती, हॉलिवूडच्या माझ्या अत्यंत आवडत्या नटांपैकी एक असणाऱ्या रॉबिन विलियम्सला घेऊन गेलेली ती सकाळ होती. हॉलिवूड चे चित्रपट पहायचं वेड लागलं त्या काळात पहिल्या काही चित्रपटांत त्याचा 'गुड मॉर्निंग व्हिएतनाम' होता. आर्म्ड फोर्सेस रेडिओ मध्ये RJ म्हणून काम करणारा तो Goooooooood morning Vietnam! म्हणत सगळ्यांचा मूड फ्रेश करण्याची पद्धत जाम आवडून गेली होती. लगे रहो मुन्नाभाई मध्ये विद्या बालन ने ती हुबेहूब कॉपी केलीये.

पुण्यात (अर्थात) विम्बल्डन !

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 12/08/2019 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच क्षमा मागतो कि हि काही पाककृती नाही .. मग इथे का लिहिलंय असा प्रश्न विचारलं.. कारण खाण्याशी संदर्भ आहे म्हणून! तर सांगायची गोष्ट अशी कि फळ भाजी इत्यादी मोसमपणाने खाद्योत्सव असतात , आंबे, हुरडा, इत्यादी हे काही नवीन नाही ...त्यावरून एक आयडिया ची कल्पना आली, बघूया कोना उद्योजकाला भावतीय का ते. डिसेंबर महिन्यात प्रथमच आयुष्यात महाबळेश्वर परिसरात मधुर स्टरबेरीचं आस्वाद घेतला त्या नंतर पुण्यनगरीत बालेवाडी टेनिस ची भारतातील एकमेव अशी जी ऐटीपी टूर्नामेंट असते ती पहिली,,, अर्थात तिथे सगळं झाकपाक मामला , स्टेटस सिम्बल म्हणून पण जनता हजर होती आणि माझा लक्ष खाद्य विभाग कडे गेलं...

युगांतर-आरंभ अंताचा भाग २७

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 11/08/2019 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैव आणि शाप एकाच घराण्याला गिळंकृत करू पाहत होते. एकीकडे कुंती वनवास भोगत होती आणि दुसरीकडे तिचा चुलत भ्राता वासूदेव, कारावास ! माता पित्यांपासून दूर देवकीनंदन कृष्ण गोकुळात वाढत होता आणि त्याचा आत्मबंधु युधिष्ठिर आणि सोबत वायुपुत्र भीम राजमहालापासून दूर वनातल्या कुटीत. कुंतीने मंत्रशक्तीने इंद्राला पाचारण केले. काळंभोर ढगांची गर्दी झाली आणि शुभ्र विजेचा झोत येत तेजस्वी रुप समोर आले. "प्रणाम इंद्रदेव!" "कुंती, कश्या पुत्राची अपेक्षा आहे तुला?" "तो....जो मानव म्हणून उत्कृष्ट असेल.

तत्त्वमसि ।

लेखक मायमराठी यांनी रविवार, 11/08/2019 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
" तत्त्वमसि" पहिल्या घटक चाचणीचा शेवटचा पेपर देऊन शाळेच्या बसमधून येताना गार्गी आणि व्योम मनातल्या मनात कोकणातल्या आजी-आजोबांकडेच जातोय असं समजत होते. आता चतुर्दशीपर्यंत सुट्टी. आज पॅकिंग, उद्या भल्या पहाटे प्रयाण, गावात पोचल्यावर सजावटीची धामधूम, विहिरीत व ओढ्यात डुंबणे, आजीकडून खायचे प्यायचे चोचले पुरवून घेणे, आजोबांकडून अमर्याद लाड करून घेणे आणि अनंत गोष्टी या दोघांच्या मनात कोवळ्या गवतासारख्या तरारून येत होत्या. गार्गी ९वीत आणि व्योम ६ वीत, अभिषेक आणि अर्चना यांची गोंडस मुलं. नोकरी मुंबईत आणि गाव कोकणात या पठडीतील एक मध्यमवर्गीय कुटुंब. तसं आजकाल मध्यमवर्गीय कोण?

आनंदाचे डोहीं आनंद तरंग।

लेखक टर्मीनेटर यांनी रविवार, 11/08/2019 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतः आनंदी, हसतमुख राहणे आणि आसपासच्या सर्व व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद, हास्य पाहणे कोणाला नाही आवडत? पण नेहमीच आनंदी, हसतमुख राहणे इतके सोपे नाही.