Skip to main content

डिप्रेशन - भाग 2

लेखक nishapari यांनी बुधवार, 14/08/2019 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
डिप्रेशन विषयावर मायबोलीवर काढलेल्या धाग्यावर 2 - 3 प्रतिसाद लिहिले , तेच या धाग्यात इथे देत आहे .. डिप्रेशन असलेल्या व्यक्तीने आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करून , थोडक्यात आपल्या आयुष्याच्या पॉजिटिव्ह बाजूकडे पाहून - अनेकांच्या तुलनेत आपण किती सुदैवी आहेत हे पाहून आनंदी राहावं असं बहुधा अनेकांना वाटतं . साधारण याच विचारसरणीतून - " तुला काय कमी आहे ? घर - पैसाअडका आहे , देवाने धडधाकट शरीर दिलं आहे ...

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३०

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 14/08/2019 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
भीमाला शुद्ध आली तेव्हा तो नागलोकी होता तेही सैनिकांच्या पहाऱ्यात. "महाराज, हा आम्हाला सापडला तेव्हा मृच्छीत होता. गुप्तचर वगैरे असेल म्हणून याला रक्षक नागांनी दंश केला तर हा शुद्धीत आला." "दंश केल्यावर शुद्धीत आला?" "हो, महाराज." "याचा अर्थ त्याने आधीच विष प्राशन केले होते." "नाही, मी तर खीर खाल्ली होती." भीम म्हणाला. 'चेहऱ्यावरचे तेज पाहून तो कुणी सामान्य तर वाटत नाही.' नाग महाराजांनी भीमला विचारलं, "कोण आहेस तू?" "मी कुंतीपुत्र भीम. भीष्माचार्यांचा पौत्र." "कुंती? हस्तिनापुरातून आला आहेस?" "हो." नागमहाराजांनी भीमाला जवळ घेतलं. "आजोळी स्वागत आहे तुझं." "आजोळ?" "हो. मी तुझा मातामह आहे.

आसिंधू

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 14/08/2019 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
स्वार्थापायी त्यांनी देशाचे केले तुकडे नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ दुखडे मानाचा तो भगवा.... नि हक्काची भूमाता आसिंधू अखंड आमुचा, आरक्त जाहला होता काळ्या मातीच्या पायी लाली रक्ताची होती.... ते दृष्य शवांचे होते, ती जमीन केशरी होती.... ना धीर सोडला आम्ही, ना त्यांनी केली पर्वा कष्ट उपसले कोणी, कोणाची झाली चर्चा! मातीत रुजवला त्यांनी पुन्हा नव्याने मत्सर पानोपानी लिहिले असत्य अधर्मी अक्षर! ना रंग आता तो आहे, ना गंध तिथे मातीला! नापाक अधर्मी हेतू नि कपट असे साथीला हातात कटोरा तरीही, धमकवती दुसऱ्याला अणू रेणूस धमकावे जणू लांघून मर्यादेला.... @मधुरा #14August
काव्यरस

प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ? (Beyond the 'Rainwater Harvesting')

लेखक सुनिल प्रसादे यांनी बुधवार, 14/08/2019 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ? (Beyond the 'Rainwater Harvesting') भाग - एक. -------------- 'रेनवॉटर हार्वेस्टिंग' ही इसवीसनपूर्व बारा हजार वर्षांचा इतिहास असलेली संकल्पना आहे. माणसं तेव्हापासून हे करत आली आहेत. 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'च्या आजपर्यंतच्या व्याख्येमध्ये पावसाचे जमिनीवर पडलेले पाणी गोळा करणे आणि ते साठवणे ह्या दोनच गोष्टींचा समावेश आहे. आपल्या देशातही आपण 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'ची कामं वेगवेगळ्या पद्धतींनी मागील अनेक वर्षे करत आलो आहोत. परंतु ते करत असताना आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे ह्याचा आपण फार गंभीरपणे विचार केला आहे असं दिसतं नाही.

कविता: बिबट्याचे मनोगत

लेखक bhagwatblog यांनी बुधवार, 14/08/2019 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस भरपूर पर्यटनाची मज नाही सोस माणसा सोबत संघर्षात नाही मौज भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत ओळखीचे कुणीच नाही म्हाडात तर घर सुद्धा घ्यायचे नाही नाशिक पाहण्यात तर मला रस नाही माणसं भेटण्याचा मला आनंद नाही हिंस्त्र तरी अन्न साखळीचा हिस्सा जंगल हिरावून तुम्हीच दिला घुस्सा वनक्षेत्र खालावले साखळी तुटली आत्ता मात्र भूख सुद्धा प्रखर वाढली शोधतो व्यक्तीला, जो प्रश्न सोडवेल शोधतो स्वतःला, जिथे उत्साह सापडेल शोधतो स्वप्नांना, तिथे आसरा भेटेल शोधतो जागेला, जिथे भोजन मिळेल नोंद: बिबट्याचे जंगल सोडून अन्ना साठी शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे.
काव्यरस

"नारळी पौर्णिमा स्पेशल" ओल्या नारळाच्या पोळ्या by Namrata's CookBook : १५

लेखक Namokar यांनी बुधवार, 14/08/2019 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: १ तास लागणारे जिन्नस: ओलं खोबर (२५०ग्रॅ. ) गूळ/साखर(१५० ग्रॅ. ) वेलची पुड तुप गव्हाचे पीठ (१५० ग्रॅ. ) तेल पाणी मीठ क्रमवार पाककृती: १. सगळ्यात आधी कणिक मळून घेऊ २. एका परातीमध्ये गव्हाचे पीठ ,त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्या ,लागेलतसे पाणी घालून कणिक मळून घ्या ३.

ज्वारीच्या लाह्या by Namrata's CookBook : १४

लेखक Namokar यांनी बुधवार, 14/08/2019 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
खरतर नागपंचमीसाठी ही पाककृती लिहायची होती पण काही अडचणींमुळे जमले नाही लागणारा वेळ: १ दिवस लागणारे जिन्नस: साहित्य: १ कप ज्वारी २ कप पाणी क्रमवार पाककृती: १. पाणी गरम करा २. ज्वारी गरम पाण्यात १५ मिनिटे भिजवा ३.

रसम पुरी

लेखक रमेश आठवले यांनी मंगळवार, 13/08/2019 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्वजण पाणी पुरी आवडीने खातो. दक्षिण भारतात जेवणात रसम वाढतात, आणि काही हॉटेलात रसम वडा असा प्रकार ही मिळतो. ह्या रसम ची द्रवता पाणी पुरीतल्या पाण्या सारखी असते. आज माझ्या पत्नीने घरी रसम बनवले होते. एम टी आर चे मद्रास रसम चे पॅकेट वापरले . त्यावर दिलेल्या कृती प्रमाणे हे रसम बनवले. त्याच्यात चिंच आणि गुळाचे पाणी घालायलाही सांगितले आहे. त्यांनी मसूर डाळ वापरायला सांगितले आहे. पण आपण साधे वरण किंवा बेसन वापरून हे रसम बनवु शकतो.पाणी पुरीच्या पुरी मध्ये हे रसम नेहमीच्या पाण्या ऐवजी घालून खाल्ले. हा वेगळा उपक्रम मला आवडला. आपणही अजमावून पहा

भित्यापाठी ब्रम्हराक्षस

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 13/08/2019 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
भित्यापाठी ब्रम्हराक्षस ------------------------------------------------------------------------------------------------ नदीकाठचं वातावरणच वेगळं असतं. त्याचं सौंदर्य दिवसा वेगळं भासतं तर रात्री वेगळं. दिवसा लोकांची लगबग चालू असते . आयाबाया धुणं धूत असतात . पोरं धबाधब पाण्यात उड्या घेत असतात ,डुंबत असतात . कुठे कोणी गुरं खंगाळत असतं . दिवसा लख्ख प्रकाशात नजर लांबवर जाते . कुठे एखादा चुकार खंड्या असतो तर कुठे बगळ्यांची माळ. पण नदीकाठचं वातावरण वेगळंच असतं; विशेषतः जेव्हा लोकांची गजबज नसते तेव्हा .प्रेमीजनांना तर फारच प्रणयरम्य भासणारं.

युगांतर - आरंभ अंताचा भाग २९

लेखक मृणालिनी यांनी मंगळवार, 13/08/2019 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
"महामहीम, एक दु:खद वार्ता आहे...." "बोल." "महामहीम, वनातून संदेश आला आहे." काहीतरी अघटित घडलेले असल्याचा अंदाज आला आणि भीष्माचार्य आसनावर रोवून बसले. आणि दसा कडे पाहू लागले. "पंडुंचे देहावसान झाले." "पंडु....." जोरात किंचाळून शेजारी उभी असलेली अंबालिका कोसळली. 'पिताश्री, चित्रांगद, विचित्रवीर्य..... आणि आता पंडु? हृदयाच्या निकटचे आप्तजन! हस्तिनापुरा, पाहतो आहेस ना हा नियतीचा खेळ? माझा शिष्य..... पंडु! या भीष्माला 'तातश्री' म्हणून मनापासून आदर देणारा....हस्तिनापुरच्या सीमा विस्तारत नेणारा......